ETV Bharat / state

राज्यात ५८३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण रुग्णसंख्या १० हजार ४९८ - maharashtra corona updates

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांची नोंद, राज्यातील रुग्णसंख्या १० हजार ४९८; आज १८० रुग्णांना घरी सोडले
राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांची नोंद, राज्यातील रुग्णसंख्या १० हजार ४९८; आज १८० रुग्णांना घरी सोडले
author img

By

Published : Apr 30, 2020, 9:17 PM IST

Updated : May 1, 2020, 8:53 AM IST

मुंबई - राज्यात कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ४५ हजार ७९८ नमुन्यांपैकी १ लाख ३४ हजार २४४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर १० हजार ४९८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६८ हजार २६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १० हजार ६९५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या आता ४५९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे २०, तर पुणे शहरातील ३ आणि ठाणे शहरातील २ रुग्ण आहेत. याशिवाय नागपूर शहरात १ आणि रायगडमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १९ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत, तर १३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ७०६१ (२९०)
ठाणे: ४८ (२)
ठाणे मनपा: ४१२ (६)
नवी मुंबई मनपा: १७४ (३)
कल्याण डोंबिवली मनपा: १६३ (३)
उल्हासनगर मनपा: ३
भिवंडी निजामपूर मनपा: १७
मीरा भाईंदर मनपा: १२६ (२)
पालघर: ४१ (१)
वसई विरार मनपा: १२८ (३)
रायगड: २४
पनवेल मनपा: ४१ (२)

ठाणे मंडळ एकूण: ८२४४ (३१३)
नाशिक: ६
नाशिक मनपा: २०
मालेगाव मनपा: १७१ (१२)
अहमदनगर: २६ (२)
अहमदनगर मनपा: १६
धुळे: ८(२)
धुळे मनपा: १७ (१)
जळगाव: ३० (८)
जळगाव मनपा: १० (१)
नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: ३१५ (२७)
पुणे:६३ (३)
पुणे मनपा: १११३ (८२)
पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
सोलापूर: ७
सोलापूर मनपा: ९२ (६)
सातारा: ३२ (२)

पुणे मंडळ एकूण: १३७९ (९६)
कोल्हापूर: ९
कोल्हापूर मनपा: ५
सांगली: २८
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: २
रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ५३ (२)
औरंगाबाद:२
औरंगाबाद मनपा: १२९ (७)
जालना: २
हिंगोली: १५
परभणी: ०
परभणी मनपा: २

औरंगाबाद मंडळ एकूण: १५० (७)
लातूर: १२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ०
नांदेड मनपा: ३

लातूर मंडळ एकूण: १९ (१)
अकोला: १२ (१)
अकोला मनपा: २७
अमरावती: २
अमरावती मनपा: २६ (७)
यवतमाळ: ७९
बुलढाणा: २१ (१)
वाशिम: २

अकोला मंडळ एकूण: १६९ (९)
नागपूर: ६
नागपूर मनपा: १३२ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: ०
चंद्रपूर मनपा: २
गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १४३ (२)
इतर राज्ये: २६ (२)
एकूण: १०,४९८ (४५९)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७३३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ९२ सर्व्हेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ४२.११ लाख लोकसंख्येचे सर्व्हेक्षण केले आहे.

Last Updated : May 1, 2020, 8:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.