मुंबई - डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्याकरिता अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतुदी अपुऱ्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयानेच मार्गदर्शन तत्त्वे आखावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका डॉ. राजीव जोशी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या सुनावणीत कोरोना संकटाच्या अत्यंत कठीण काळात डॉक्टर रात्रंदिवस काम करत आहेत. पीपीई कीट घालून सेवा देत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरणही देत बसावे लागत असेल तर अशी छळवणूक होता कामा नये', असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले.
MAHACORONA UPDATES : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - MAHACORONA UPDATES
16:17 June 11
कोरोना संकटाच्या अत्यंत कठीण काळात रात्रंदिवस झटत आहेत डॉक्टर - उच्च न्यायालय
15:23 June 11
नियमांचे उल्लंघन प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाजपाची मागणी
बुलडाणा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांच्या विविध कार्यक्रमासाठी बुलडाण्यात उपस्थित राहून या कार्यक्रमात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गर्दी झाल्याने संचार बंदी व कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुलडाण्यात गर्दी जमविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष एड.आकाश फुडकरांनी पोलिसांना केली आहे.गुन्हे न दाखल झाल्यास या विरोधात जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
06:29 June 11
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 3,08,358
फ्रंटलाईन वर्कर - 3,64,466
जेष्ठ नागरिक - 12,71,482
45 ते 59 वय - 12,73,530
18 तर 44 वय - 6,71,795
स्तनदा माता - 2,330
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 3,034
एकूण - 38,93,995
06:29 June 11
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या, असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.
06:28 June 11
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत गुरुवारी 69 हजार 713 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 61 हजार 969 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 744 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 38 लाख 93 हजार 995 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 30 लाख 91 हजार 794 लाभार्थ्यांना पहिला तर 8 लाख 2 हजार 201 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 8 हजार 358, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 64 हजार 466, ज्येष्ठ नागरिकांना 12 लाख 71 हजार 482, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 12 लाख 72 हजार 530 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 6 लाख 71 हजार 795, 2 हजार 330 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 3 हजार 34 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
06:10 June 11
राज्यात गुरुवारी १२,२०७ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई - राज्यात गुरुवारी १२,२०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ११,४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,०८,७५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.४५% एवढे झाले आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी ३९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.