ETV Bharat / state

Ashish Deshmukh Suspends : माजी आमदार आशिष देशमुखांवर अखेर कारवाई ; पक्षातून केले निलंबित

काँग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना राज्यातील पक्ष नेतृत्वाविरोधात जाहीर वक्तव्य केल्याबद्दल प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आहे. माजी आमदाराविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई जाहीर करणाऱ्या पक्षाच्या नोटीसमध्ये देशमुख यांच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे.

Ashish Deshmukh
आशिष देशमुख
author img

By

Published : Apr 7, 2023, 8:15 PM IST

Updated : Apr 7, 2023, 9:12 PM IST

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे आता त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. काँग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित केले आहे. कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने ही कारवाई केली आहे. तसेच आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा : काँग्रेसचे नागपूरचे माजी आमदार आशिष देशमुख हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासूनच त्यांच्या निलंबनाची चर्चा सुरू होती. आशिष देशमुख हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा असतानाच अखेर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत आशिष देशमुख यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेतला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : मुंबईत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक झाली. या बैठकीत आशिष देशमुख यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या नोटिशीला देशमुख यांनी तीन दिवसात उत्तर द्यावं, असे निर्देश शिस्तपालन समितीने दिले आहेत. या नोटीसीचे उत्तर येईपर्यंत ते काँग्रेसमधून निलंबीत असतील.

काय म्हणाले होते देशमुख? : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाबाबत केलेले वक्तव्य ओबीसी समाजाच्या भावना दुखावणारे आहे, त्यामुळे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, असे वक्तव्य देशमुख यांनी केले होते. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत. नागपुरात 16 एप्रिलला माविआची वज्रमुठ सभा होत असताना राहुल गांधी यांची नागपूर मध्ये 21 ते 25 दरम्यान सभा करणे म्हणजे वेगळी चूल मांडण्यासारखे असल्याचे देशमुख म्हणाले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाना पटोले यांना महिन्याला एक खोका मिळत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता.

'माफी मागणार नाही' : आपली वक्तव्य ही पक्ष विरोधी नाहीत. आपण नेहमीच पक्षाच्या हिताची भूमिका घेत आलो आहे. त्यामुळे आपण केलेल्या कुठल्याच वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल गांधी नाही, म्हणून मी माफी मागणार नाही. ओबीसी समाजाकडून आपल्याला भरभरून मते मिळाली आहेत. त्यामुळे ओबीसी समाज दुखावला गेला असून आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असेही आशिष देशमुख म्हणाले होते.

हेही वाचा : Pune LokSabha By Elections : पुणे लोकसभा पोटनिवडणूक चंद्रकांत पाटलांनी लढवावी; आमदार रवींद्र धंगेकर यांचा टोला

Last Updated : Apr 7, 2023, 9:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.