मुंबई - राज्यात आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहे. या बदल्यांवरून विरोधी पक्षाने टीका केली आहे. आघाडी सरकारने गेल्या महिन्याभरात 31 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानंतरही पुन्हा आज 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या -
अरविंद कुमार यांची नियुक्ती मुंबईच्या महाराष्ट्र पेट्रो केमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर पेट्रो केमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार यांची नियुक्ती, महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या अपर मुख्य सचिव व विशेष कार्य अधिकारी म्हणून करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोग मुंबईच्या सचिव सीमा व्यास यांची नियुक्ती प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी 1 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय या रिक्त पदावर तर ओ. पी. गुप्ता यांची नियुक्ती प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई पोलिसांचं पुढचं पाऊल; पेट्रोलिंगसाठी 'क्यूआर कोड'चा वापर
हेही वाचा - कोण म्हणालं? छत्री असूनही पावसात भिजल्याचं भांडवल केलं जातंच की...!