मुंबई - शिंदे सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पाठिंबा दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा वाढला. अजित पवार गटाचे मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणून आठवडाभर राहिले. गेल्या तीन दिवसांपासून शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाच्या बैठकांचा खल झाला. परंतु, एकमत न झाल्याने दिल्ली गाठावी लागली. अखेर विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाला चार, भाजप चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाला दोन खाती दिली जाणार आहेत. शिंदे गटाचे चार आमदार यामुळे नवे मंत्री होणार आहेत.
पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मंत्रीपदासाठी इच्छुकांच्या अंतर्गत विरोधामुळे विस्तार लांबला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या तीन दिवसांपासून बैठका घेतल्या. तिघांमध्ये एकमत न झाल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबात प्रकरण गेले. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शाह यांची भेट घेऊन खाते वाटपावर तोडगा काढल्याचे समजते.
शिंदे गटाचे चार नवे मंत्री- राजकीय सुत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा नवा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार शिंदे गटाला, चार भाजपला चार आणि पवार गटाला दोन खात्यांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले, अनिल बाबर आणि रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या नावाची शिफारस केली आहे. चौथ्या जागेसाठी संजय रायमूलकार यांचा विचार सुरू आहे. सत्ता स्थापनेपासून मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले संजय शिरसाठ यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. शिरसाट यांच्याकडे महामंडळाची जबाबदारी सोपवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे अनुकूल असल्याचे समजते.
नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे मंत्रिमंडळात स्थान नाही- मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना स्थान मिळावे अशी मागणी राज्यात सहकार सत्ता स्थापन झाल्यापासून सुरू आहे. शिंदे गटात सुरुवातीला यामिनी जाधव आणि लता सोनवणे यांच्याकडे मंत्रिमंडळाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी चर्चा सुरू होती. नीलम गोऱ्हे आणि मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महिला नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र नव्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाकडून एकाही महिलेला स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते.
Maharashtra Cabinet Expansion News: मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, शिंदे गटाचे चार आमदार होणार नवे मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या 8 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटले. अद्याप खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाचा विरोध आहे. त्यामुळे सध्या हे मंत्री बिनखात्याचाच कारभार हाकत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.