मुंबई - आयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धा आणि आस्मितेचा विषय आहे. त्यामुळे लवकरच आम्ही आयोध्येला जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Breaking News : लवकरच अयोध्येचा दौरा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Breaking news in Maharashtra today
22:08 March 14
लवकरच अयोध्येचा दौरा करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
21:43 March 14
विविध मागण्यांसाठी शेतकरी, आदिवासींचा मुंबईकडे मोर्चा, आंदोलनकर्त्यांशी सरकार बुधवारी चर्चा करणार
मुंबई - कांदा उत्पादकांना 600 रुपये प्रति क्विंटल तात्काळ आर्थिक मदत, शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा यासह आपल्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ हजारो शेतकरी आणि आदिवासींनी मंगळवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला.
21:30 March 14
ओडिशातून मुंबईत आणलेला 30 किलो गांजा पोलिसांनी पकडला
मुंबई - गुप्त माहिती मिळाल्यावर, 12 मार्च रोजी प्रतिबंधात्मक आयुक्तालय, मुंबई यांनी ओडिशातून येणारी एक घरगुती कुरिअर खेप रोखली. तपासणी केली असता मालामध्ये 30 किलो गांजा असल्याचे आढळून आले. पुढील तपास चालू आहे.
20:26 March 14
धायरीमधील कंपनीला भीषण आग
पुणे - धायरीमधील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. सध्या अग्निशामन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
19:53 March 14
महाराष्ट्रात समाजातील कोणताही घटक सुखी नाही - आदित्य ठाकरे
मुंबई - आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकार कुचकामी असल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की, जुनी पेन्शन योजनेसाठी संबंधित सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्रात समाजातील कोणताही घटक सुखी नाही. अनेक समित्या स्थापन झाल्या. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अजून व्हायचा आहे. हे जनतेच्या हिताचे नाही.
19:33 March 14
सरकार चर्चेसाठी तयार, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा - मुख्यमंत्री
मुंबई - सरकार चर्चेसाठी तयार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केले. सरकार चर्चेसाठी सकारात्मक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जनतेचा विचार करावा. जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी कर्मचाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केली.
19:26 March 14
फेसबुक 10 हजार कर्मचारी कमी करणार - झुकरबर्ग
वॉशिंग्टन - फेसबुक त्यांचे 10 हजार कर्मचारी कमी करणार आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी असा संदेश कर्मचाऱ्यांना दिला आहे. तसेच प्रस्तावित 5,000 खुली पदेही भरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. रॉयटर्सच्या हवालाने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
18:06 March 14
कर्मचाऱ्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे - उद्धव ठाकरे
मुंबई - जुनी पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तर चूक काय? देशातील काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. कर्मचाऱ्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
18:05 March 14
विनापरवाना राहणाऱ्या 4 बांगलादेशींना ATS ने नवी मुंबईतून केली अटक
मुंबई - महाराष्ट्र एटीएसने नवी मुंबईतून वैध कागदपत्रांशिवाय चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली. मोहम्मद झीनत शेख, मो. सुमोद सिकंदर, रिपा जन्नत शेख आणि मुन्नी शिकदार अशी त्यांची नावे आहेत. त्यांना नवी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
17:17 March 14
उद्धव ठाकरेंविरोधातील मालमत्तेसंदर्भातील गौरी भिडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशा मागणीची गौरी भिडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तसेच कोर्टाने याचिकेवर गंभीर सवाल उपस्थित केला. एवढेच नाही तर कोर्टाने गौरी भिडेंना 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.
16:33 March 14
मालाडच्या पश्चिम उपनगरातील निवासी भागात वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला बिबट्या
मुंबई - मालाडच्या पश्चिम उपनगरातील निवासी भागाजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या मंगळवारी पकडला, अशी माहिती वन अधिकाऱ्याने दिली. दिंडोशीतील म्हाडा वसाहतीजवळ अलीकडेच बिबट्या दिसल्याच्या तक्रारी वनविभागाला मिळाल्या होत्या. परिसरात सापळा लावण्यात आला होता, असे ते म्हणाले.
16:16 March 14
माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना ईडी न्यायालयात
मुंबई - माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे यांना ईडी न्यायालयात अधिकाऱ्यांनी हजर केले आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात आज त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.
16:12 March 14
माजी मंत्री हसन मुश्रीफ साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्या वकिलासह ईडी कार्यालयात
मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्या वकिलासह ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.
16:03 March 14
जाचक अटींविरोधात पाटणमधील शेतकरी बॅरिकेटस् तोडून घुसले प्रांत कार्यालयात, पोलिसांची धक्काबुक्की
सातारा - पश्चिम घाट, बफर झोन, कोअर झोनच्या जाचक अटी, निर्बंध आणि जंगली प्राण्यांचा उपद्रव असह्य झाल्याने पाटण तालुका मानवी हक्क संरक्षण समितीच्यावतीने मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकर्यांनी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी प्रांत कार्यालयाच्या गेटवर बरिकेटस् लावून मोर्चा अडवला. निवेदन स्वीकारण्यासाठी बराचवेळ अधिकारी बाहेर न आल्याने संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह शेतकरी बॅरिकेटस् तोडून आत घुसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मोर्चेकरी प्रांत कार्यालयात घुसल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. आंदोलकांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली. अखेर प्रांताधिकार्यांसह वन अधिकार्यांना बाहेर येऊन निवेदन स्वीकारावे लागले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघात शेतकऱ्यांनी प्रशासनाला हिसका दाखवला.
15:53 March 14
राज्यातील ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षासंदर्भातील आजची सुनावणी संपली
नवी दिल्ली - राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भातील आजची सुनावणी आणि युक्तीवाद संपला आहे. शिंदे गटाच्यावतीने आज युक्तीवाद करण्यात आला. त्यामध्ये ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी, नीरज कौल, मनिंदर सिंह यांनी प्रामुख्याने युक्तीवाद केला. आता या प्रकरणी उद्या युक्तीवाद होणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता पुन्हा कोर्टात युक्तीवाद सुरू होईल. सुरुवातीला शिंदे गटाला एक तास देण्यात आला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी शेवटचा युक्तीवाद करतील. त्यानंतर कोर्ट कधीही या प्रकरणाचा निर्णय देऊ शकते.
15:48 March 14
राज्यव्यापी कर्मचारी संप मागे, जुन्या पेन्शन योजनेसाठी बैठकीनंतर संप मागे घेण्याची घोषणा
मुंबई - राज्यव्यापी कर्मचारी संप मागे
जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेल्या संप बैठकीनंतर मागे घेण्याची घोषणा
कर्मचाऱ्यांचे नेते संभाजी थोरात यांनी केली घोषणा
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर घोषणा
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून दोन दिवसात या संदर्भात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात अहवालाअंति चर्चा करणार
मुख्यमंत्र्यांनी दिले संपकऱ्यांना आश्वासन
15:38 March 14
स्वतःच्या पक्षाविरुद्ध बोलण्याला पक्षशिस्तीच्या नावाखाली पूर्णपणे आळा घालता येईल का - मनिंदर सिंह यांचा सवाल
नवी दिल्ली - शिंदे गटाच्या वतीने सध्या ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह यांचा युक्तीवाद सुरू आहे. ते म्हणाले की, निवडून आलेल्या उमेदवारांचा एक हक्क म्हणजे गरज पडल्यास स्वतःच्या पक्षाविरुद्ध बोलणे. पक्षशिस्तीच्या नावाखाली याला पूर्णपणे आळा घालता येईल का? तसेच अपात्रतेची टांगती तलवार ही गोष्ट घटनात्मक बाब होऊच शकत नाही, असाही युक्तीवाद सिंह यांनी केला. मूळ अपात्रतेची याचिका उपसभापतींच्या हाती होती. या न्यायालयाने आता अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घ्यावा, असे म्हणण्यासाठी राणा संदर्भातील निकालाचं संदर्भ देणे अयोग्य आहे, असा युक्तीवाद सिंह यांनी केला.
15:22 March 14
घाटकोपरमध्ये अनैतिक संबंधातून महिलेची हत्या
मुंबई - घाटकोपरमध्ये अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
15:18 March 14
बहुमत गमावले हे माहीत असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला - जेठमलानी
नवी दिल्ली - वकील महेश जेठमलानी म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आधीच्या सर्व गोष्टींमुळे राजीनामा दिला असे म्हणणे म्हणजे विश्वासार्हतेची सीमा गाठल्यासारखे होईल. वास्तविक बहुमत गमावले हे माहीत असल्याने त्यांनी राजीनामा दिला. ते स्वेच्छेने पायउतार झाले. त्यामुळे बहुमताचा विश्वास असलेल्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली राज्यपाल नवीन सरकार स्थापन करू शकतात.
15:07 March 14
लोकशाहीमध्ये बहुमताचे तत्व अत्यंत महत्वाचे - महेश जेठमलानी
नवी दिल्ली - लोकशाहीमध्ये बहुमताचे तत्व अत्यंत महत्वाचे आहे. बहूमत डावलून कुणीही सत्तेवर राहू शकत नाही. या केसमध्ये ठाकरे यांच्याकडे बहूमत नाही असे स्पष्ट दिसते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. वास्तविक अपात्रतेचा प्रश्न बहूमत गमावल्यामुळेच निर्माण झाला होता. त्यानंतर इतर घटनाक्रम घडला.
15:01 March 14
संवैधानिक तरतुदीनुसार विधानसभेने तयार केलेले नियम डावलने हे योग्य नाही - जेठमलानी
नवी दिल्ली - महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरू आहे. ते म्हणाले की, संवैधानिक तरतुदीनुसार विधानसभेने तयार केलेले नियम डावलने हे योग्य नाही. आमदारांना हे नियम लागू होतात, तेच टाळले जात असतील तर त्याला काय म्हणावे, असा युक्तवाद जेठमलानी यांनी केला. अपात्रतेचे नियम अनिवार्य आहेत आणि सभापती किंवा उपसभापतीनी त्यांचे उल्लंघन केल्यास ते न्यायालयीन पुनरावलोकनासाठी योग्य ठरतात, असेही मत जेठमलानी यांनी मांडले.
14:51 March 14
उपसभापती केवळ घटनात्मक बाबींमध्ये निर्णय घेऊ शकतात संघटनात्मक नाही - महेश जेठमलानी
नवी दिल्ली - उपसभापती केवळ घटनात्मक बाबींमध्ये निर्णय घेऊ शकतात, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. मात्र संघटनात्मक बाबींमध्ये ते काही करु शकत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, सर्व आमदार प्रतिनिधी सभेचे सदस्य आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. यावर सरन्यायधीश म्हणाले की हा मुद्दा तर कौल यांनी मांडला आहे. तर संदर्भासाठी ही माहिती देत असल्याचे जेठमलानी यांनी स्पष्ट केले.
14:33 March 14
महापालिकेची चूक झाली म्हणून सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापिकेची रक्कम कापता येणार नाही - हायकोर्ट
मुंबई - महापालिकेची चूक झाली म्हणून सेवानिवृत्तीनंतर मुख्याध्यापिकेची रक्कम कापता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल.
14:28 March 14
179 (c) नियमानुसार नोटीस दिल्यापासून उपसभापती हे उपसभापती म्हणून काम करू शकत नाहीत - जेठमलानी
नवी दिल्ली - जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरू झाला आहे. ते म्हणाले की, 179 (c) नियमानुसार नोटीस दिल्यापासून उपसभापती हे उपसभापती म्हणून काम करू शकत नाहीत. यामध्ये नियम 181 अन्वये प्रतिबंधित करता येत नाही. अशावेळी नियम 11 नुसार कामकाज करावे लागते.
14:15 March 14
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे. जेवणाच्या ब्रेकनंतर ही सुनावणी सुरू झाली आहे. केनियातील सुप्रीम कोर्टाच्या मुख्यन्यायाधीशांसह इतर न्यायाधीशही कोर्टात उपस्थित आहेत.
13:47 March 14
चार वर्षाच्या बालकाचा विहिरीत पडून मृत्यू
वर्धा - चार वर्षाच्या बालकाचा घरच्याच विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
13:41 March 14
दहिसर चेक नाका परिसरात झोपडपट्टीला भीषण आग
मुंबई - शहरातील दहिसर चेक नाका परिसरात झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. सव्वाबारा वाजता अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. झोपडपट्टी परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवरील बांबूंना आग लागल्यामुळे परिसरात आग पसरली.
13:24 March 14
नितीन देशमुख यांचे पाणी प्रश्नावर आंदोलन, ऐकायला तयार नाहीत-शंभुराजे देसाई
नितीन देशमुख पाणी प्रश्नावर आंदोलनाला बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेण्यास सांगितली. त्यांच्या काही कामांना स्थगिती दिली असल्याने ते उपोषणाला बसले आहेत. मी त्यांना सांगितले या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन त्यावर उच्चित निर्णय घेऊ. पण ते ऐकायला तयार नाहीत. पण आम्ही आमच्या परीने त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याचे शंभुराजे देसाई यांनी सांगितले.
13:21 March 14
जुन्या पेन्शन योजनेवरून विरोधकांचा विधानपरिषेदत सभात्याग
जुन्या पेन्शन योजनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी विधानपरिषद दिवसभरासाठी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
13:20 March 14
सपा नेते अबू आझमी व भाजप आमदार नितेश राणे यांच्यात विधान भवन परिसरात शाब्दिक चकमक
लव जिहाद प्रश्नावरून सपा नेते अबू आझमी व भाजप आमदार नितेश राणे यांच्यात विधान भवन परिसरात शाब्दिक चकमक झाली आहे.
13:06 March 14
नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने सरकार हरभरा खरेदी करणार
मुंबई - नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने सरकार हरभरा खरेदी करणार आहे. दोन लाख 56 हजार 117 शेतकऱ्यांना खरेदीसाठी नोंद केली आहे. राज्यात 552 केंद्रांवर खरेदी करणार असल्याचे विधानसभेत आज सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
13:03 March 14
एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा एफआयआर कशा - परब यांच्या वकिलांचा हा युक्तीवाद आला कामी
मुंबई - राज्य घटना कलम 221 नुसार एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा एफआयआर कशा केल्या जातात, हा मुद्दा परब यांचे वकील अमित देसाई यांनी उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने गंभीरपणे विचार करत अनिल परब यांना दिलासा अखेर दिला.
12:51 March 14
हायकोर्टाचा कारवाईपासून परब आणि मुश्रीफ यांना दिलासा
मुंबई - सोमवारपर्यंत अनिल परब यांच्यावर कोणतीही कारवाई नको असे मुंबई हायकोर्टाने सांगितले आहे. त्यांना हात देखील लावू नका अशी सूचना कोर्टाने तपास यंत्रणांना केली आहे. तसेच हसम मुश्रीफ यांनाही मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला आहे. ईडीच्या कारवाईपासून पुन्हा मुश्रीफ यांना संरक्षण मिळाले आहे. दोन आठवड्यांची त्यांना मुदत मिळाली आहे. मुश्रीफ अटक पूर्व जामिनासाठी अर्जही करू शकतात. अंमलबजावणी संचालनालयाच्या वकिलांची बाजू अमान्य करत हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
12:43 March 14
शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरू
नवी दिल्ली - शिंदे गटाच्या वतीने आता ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरू.
12:38 March 14
आमदार पाठिंबा काढून घेतात तेव्हा राज्यपालांनी कारवाई करु नये का - कौल
नवी दिल्ली - कौल म्हणाले की, राज्यपाल केवळ त्यांच्यासमोरील पुरावे पाहतील. त्यांना आणि निवडणूक आयोगासारख्या कठोरतेने चौकशी करण्यास सांगितले जाऊ शकत नाही. जेव्हा मोठ्या संख्येने आमदार पाठिंबा काढून घेतात तेव्हा त्यांनी कारवाई करु नये असे म्हणणे योग्य आहे का, असा सवाल कौल यांनी केला.
12:33 March 14
बहुमत चाचणी हीच खरी लोकशाहीची लिटमस टेस्ट - कौल
नवी दिल्ली - शिंदे गटाचे वकील कौल यांनी सांगितले की, घटनात्मकदृष्ट्या तीन मूलभूत तत्त्वे आहेत. त्यामध्ये राज्यपाल राजभवनात हेडकाऊंट करु शकत नाहीत. ते एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन शक्य तितक्या लवकर बहुमत चाचणी घेऊ शकतात. कारण तीच खरी लोकशाहीची लिटमस टेस्ट आहे.
12:26 March 14
न्यायालयाने कुठे हस्तक्षेप करावा आणि कुठे करु नये यासंदर्भात न्यायमूर्तींचा कौल याना कळीचा प्रश्न
नवी दिल्ली - घटनापीठातील न्यायमूर्ती शाह यांनी कौल यांनी अडवून एक प्रश्न केला. ते म्हणाले की, तुमचा युक्तीवाद असा आहे की, केवळ अपवादात्मक प्रकरणांमध्ये (जसे की राणा प्रकरणामध्ये), न्यायालय अपात्रतेच्या टप्प्यावर हस्तक्षेप करू शकते. इतर प्रकरणांमध्ये नाही, हे सभापतीच्यावर सोपवले पाहिजे. यावर लगेच कौल म्हणाले की, घटनेत तशी तरतूद आहे.
कौल : राज्यघटनेत तशी तरतूद आहे.
12:13 March 14
सभागृहामध्ये सभागृह नेताच पक्षाची भूमिका ठरवत असतो - कौल
नवी दिल्ली - कोर्टात शिंदे गटाचे वकील नीरज कौल जोरदार युक्तीवाद करत आहेत. ते म्हणाले की, सभागृहामध्ये सभागृह नेताच पक्षाची भूमिका ठरवत असतो. तोच सर्व घटनात्मक पदांशी संपर्कात राहून त्यांना पक्षाची भूमिका सांगत असतो. त्यामध्ये काहीही अयोग्य नाही.
11:54 March 14
कोर्टाने सर्व बाबी ठरवणे हे योग्य होणार नाही - शिंदे यांचे वकील कौल
नवी दिल्ली - शिंदे याच्या वतीने ज्येष्ठ वकील एन के कौल सध्या युक्तीवाद करत आहेत. ते म्हणाले की, ठाकरे गटाचा कायदेशीर युक्तिवाद असा आहे की सुप्रीम कोर्टाने संवैधानिक प्राधिकरणांच्या संपूर्ण संवैधानिक यंत्रणेला बायपास केले पाहिजे आणि स्पीकरने निर्णय न घेता कोर्टाने स्वतःहून सर्व बाबी ठरवाव्यात. मात्र हे सर्व कायद्याच्या विरोधात आहे.
11:51 March 14
कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवणे म्हणे विनयभंग नाही
कोणत्याही लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवणे म्हणजे तिच्या विनयशीलतेचा अपमान करण्यासारखे नाही, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २८ वर्षीय तरुणाची शिक्षा रद्द करताना केली. 12 वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.
11:51 March 14
भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार नाराज-अजित पवार
एकनाथ शिंदे सरकार शिवसेनेच्या 40 आमदारांची काळजी घेण्यासाठी निधीची उधळपट्टी करत आहे. तर भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार नाराज असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
11:51 March 14
ठाणे जिल्ह्यात आग लागून निवासी इमारतीतील 22 विद्युत मीटर जळून खाक
ठाणे जिल्ह्यातील कळवा टाउनशिपजवळ मंगळवारी पहाटे एका इमारतीच्या मीटर रूमला आग लागली. आगीत किमान 22 विद्युत मीटर जळून खाक झाल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिली.
11:40 March 14
निर्णय झाला नाही म्हणून कुणीही सदस्य अपात्र ठरत नाही - साळवे
नवी दिल्ली - हरिश साळवे यांनी शिंदे सरकारची बाजू भक्कम करण्यासाठी आज युक्तीवाद केला. ते म्हणाले की, विश्वासदर्शक ठराव प्रत्यक्षात झाला असता तर काय झाले असते. या न्यायालयाने कधीही असा निष्कर्ष काढला नाही की सदनात सुरू असलेल्या एखाद्या व्यक्तीला आव्हान देण्यास प्रकरण प्रलंबित राहिल्यामुळे ती व्यक्ती कायदेशीररित्या अपात्र ठरते, जोपर्यंत पात्र होत नाही.
11:37 March 14
पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्याने चिडलेल्या नवऱ्याने वाहने पेटविली!
पुणे- पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्याने चिडलेल्या नवऱ्याने बायकोच्या गाडीसह परिसरातील आठ ते दहा दुचाकी आणि चार चाकी गाड्या पेट्रोल टाकून पुण्यात पेटविल्या आहेत. कोंढव्यातील अश्रफ नगर परिसरातील अलिप टावर समोरील धक्कादायक प्रकार आहे. टेरेन्स जॉनच्या पत्नीचे पोलिसांत तक्रार जॉनच्या विरोधित तक्रार दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज दिला होता.
11:37 March 14
पुणे -बंगळुरू महामार्गावर वृक्ष पुनर्रोपणावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला

सातारा - अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. तासवडे (ता. कराड) येथे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या रूंदीकरणात तुटणाऱ्या झाडाची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून घेऊन त्यांचे पुनर्रोपण ते करत असताना वहागाव येथे ही घटना घडली आहे. झाडाच्या एका फांदीवरील पोळे उठले आणि मधमाशांनी सयाजी शिंदेंसह इतरांवर हल्ला केला. मात्र, त्यांना मोठी दुखापत झालेली नाही. ते सुखरूप आहेत. किरकोळ उपचारासाठी ते कराडमधील सह्याद्री रूग्णालयात दाखल झाले आहेत.
11:34 March 14
हसन मुश्रीफ यांनी ईडी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका, सुनावणीला सुरुवात
हसन मुश्रीफ यांनी ईडी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. थोड्याच वेळात न्यायालय काय म्हणते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
11:10 March 14
जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारची भूमिका काय आहे-अजित पवार
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. जुन्या पेन्शनबाबत तातडीने मार्ग काढावा. जनतेचे हाल होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
11:09 March 14
ठाकरे गटानंतर काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख भाजपमध्ये करणार प्रवेश
काँग्रेसचे माजी मंत्री, माजी खासदार अनंतराव देशमुख आपल्या मुलासह आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
10:39 March 14
जे जे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम, मागण्या होईपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांनी दिला इशारा
मुंबई - जुनी पेन्शन योजना लाग लागण्यासाठी राज्याती शासकीय निमशासकीय १८ लाख कर्मचारी आज पासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपामध्ये मुंबईतल्या जे जे रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी संपात उतरले आहेत. याआधी संप केला पण काहीच उपयोग झाला नाही. यामुळे जे जे रुग्णालयात घोषणाबाजी करून कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे जे जे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
10:04 March 14
काँग्रेसने देशाची माफी मागावी आणि केंब्रिजचे रडगाणे थांबवावे-अनुराग ठाकूर
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. कलेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराची कला काँग्रेसला माहीत आहे. ते देशाविरुद्ध मोहीम चालवत आहेत. त्यांनी देशाची माफी मागावी आणि केंब्रिजचे रडगाणे थांबवावे, केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी म्हटले आहे.
10:03 March 14
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता सोनिया गांधी संसदेत हजर
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा आज दुसऱ्या दिवस आहे. काँग्रेस खासदार आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी या संसदेत पोहोचल्या आहेत.
09:24 March 14
पतीने पत्नीची गळा आवळून केली हत्या, पोलिसांसमोर आरोपीचे आत्मसमर्पण
नालासोपारा येथील वलई पाडा येथे सोमवारी प्रभुनाथ रामगोपाल विश्वकर्मा याने पत्नी अनिताची गळा आवळून हत्या केली. खून केल्यानंतर तो कामावर गेला आणि नंतर सायंकाळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पुढील तपास सुरू असल्याचे पेल्हार पोलिसांनी सांगितले.
09:15 March 14
संपाचे पडसाद रुग्णांवरही, नागपुरात शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या
सरकारी रुग्णालयांत सरकारी कर्मचाऱ्यांचे पडसाद उमटू लागले आहेत. नागपुरात शस्त्रकिया पुढे ढकलल्या आहेत.
09:14 March 14
पुण्यात ससूनमध्ये परिचारिकांचा संपात सहभाग
राज्यात निमसरकारी व सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. पुण्यात ससूनमधील परिचारिकांचा संपात सहभाग आहे.
08:33 March 14
पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण, पसरत आहे साथ
पुण्यात H3N2 चे २२ रुग्ण आढळले आहेत. साथ पसरत असल्याने चिंता वाढली आहे.
08:32 March 14
अखेर बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचा मृत्यू, वाचविण्याचे प्रयत्न ठरले निष्फळ
बोअरवेलमध्ये ५ वर्षीय बालक पडल्यांतर वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, बालकाचा मृत्यू झाला आहे.
06:51 March 14
बोअरवेलमध्ये ५ वर्षीय बालक पडला, वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डीत उसाच्या शेतातील बोअरवेलमध्ये ५ वर्षीय बालक पडला आहे. बोअरवेलमध्ये अडकेल्या मुलाला वाचवण्यासाठी शर्थींचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
06:48 March 14
जम्मू काश्मीरमध्ये शिफारशीवर नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जाणार- मनोज सिन्हा
काही लोकांकडून जम्मू-काश्मीरमधील भरती प्रक्रिया रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात होता. तर काहींनी सत्तेत असताना संपूर्ण यंत्रणेला हाय-जॅक केले होते. सरकार निष्पक्ष आणि पारदर्शक भरती करणार आहे. शिफारशीवर नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर नोकऱ्या दिल्या जातील, असे जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.
06:47 March 14
पुणे विमानतळावर गोंधळ घालणाऱ्या महिलेला अटक
पुणे विमानतळावर रविवारी सकाळी एका 24 वर्षीय महिलेने गोंधळ घालत सीएसआयएफ अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या महिलेला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे.
06:46 March 14
अमेरिकन बँकिंग प्रणाली सुरक्षित-जो बायडेन यांचा दावा
अमेरिकेत सिलिकीन व्हॅलीमधीली दोन बँका बंद पडल्यानंतर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशा स्थितीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकन बँकिंग प्रणाली सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
06:26 March 14
Maharashtra Breaking News: राज्यातील तब्बल १८ लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर, शिंदे सरकार आज तोडगा काढणार?
मुंबई : शिंदे फडणवीस सरकारने जुन्या पेन्शनबाबत निर्णय न घेतल्याने आजपासून सरकारी, निमसरकारी, शिक्षक, आरोग्य, पालिका आदी सर्व विभागातील तब्बल १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच इतर मागण्यांसाठी मुख्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सोमवारी बैठक झाली. या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसल्याने सरकारी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांनी संपावर जावू नये, असे राज्य सरकारने आवाहन केले आहे.