सातारा - पोहण्यासाठी गेल्यानंतर नदीपात्रात बुडालेल्या सुरेश बंडू होगले या ऊसतोड मजुराच्या मृतदेहाचा शोध शोधणाराचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोरेगावमधून समोर आली आहे. दत्तात्रय बाबासाहेब बर्गे, असे मृताचे नाव असून ते चांगले जलतरणपटू होते. या घटनेने कोरेगाववर शोककळा पसरली आहे.
Breaking News : कोरेगावातील वसना नदीत बुडलेल्या ऊसतोड मजुराचा मृतदेह शोधणाऱ्याचाही बुडून मृत्यू - आजच्या मराठी बातम्या
23:02 October 28
कोरेगावातील वसना नदीत बुडलेल्या ऊसतोड मजुराचा मृतदेह शोधणाऱ्याचाही बुडून मृत्यू
20:24 October 28
जयंत पाटील, भुजबळ, मुंडे, राऊत, थोरातांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली
- महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली
- ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंबाची सुरक्षा कायम तर वरून सरदेसाई अणि वड़ेटिवर यांच्या सुरक्षेत कपात
- मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ
- जयंत पाटील छगन भुजबळ धनंजय मुंडे यांच्या सुरक्षित देखील कपात
- संजय राऊत नवाब मलिक अनिल देशमुख यांची सुरक्षा राज्य सरकारने हटवली
19:32 October 28
कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमिवर 24 तास विठ्ठल दर्शन आजपासून सुरू
सोलापूर - कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमिवर 24 तास विठ्ठल दर्शन आजपासून सुरू झाले आहे. आषाढीप्रमाणेच कार्तिकी वारीला वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येने येतात. या पार्श्वभूमीवर पांडुरंगाच्या दर्शनासाठी ताटकळत बसावे लागू नये यासाठी शुक्रवार म्हणेजच आजपासून 24 तास दर्शनासाठी मंदिर सुरू राहणार आहे. मंदिर समितीने ही माहिती दिली.
19:14 October 28
मोबाईल, चेन, दुचाकी पळविणारी टोळी जेरबंद, 21 मोबाईलसह दुचाकी जप्त
नांदेड - शहराच्या विविध भागात एकट्या जाणाऱ्या नागरिक-महिलांचे मोबाईल त्याचबरोबर गळ्यातील चेन पळविणे दुचाकी पळविणाऱ्या टोळीला वजिराबाद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी 21 मोबाईल, दुचाकी असा तीन लाखाचा ऐवज जप्त केला आहे.
18:19 October 28
शिंदे गटाचा शिवसेना शाखेचे नाव बदलण्याचा सपाटा, रामचंद्रनगरच्या शाखेचे नाव बदलले
ठाणे - ठाण्यातील रामचंद्र नगर येथील शिवसेनेच्या शाखेचे नाव बदलण्यात आले. शिवसेना शाखा नाव बदल करून बाळासाहेबांची शाखा असे नाव करण्यात येत आहे. ठाण्यातील अनेक ठिकाणी आता शाखेच्या नावात बदल करण्यात येत आहे.
17:41 October 28
बंबिहा गँगच्या चार नेमबाजांना अटक
मोहाली - एजीटीएफ, पंजाब पोलिसांचे काउंटर-इंटेल, उधम सिंग नगर पोलिस आणि स्पेशल सेल दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाईत काशीपूर इंग्लंडमधील एका ७० वर्षीय वृद्धाच्या खळबळजनक हत्येमध्ये सामील असलेल्या बंबिहा गँगच्या चार नेमबाजांना अटक केली. झिरकपूर-मोहाली डीजीपी यांनी ही माहिती दिली.
17:13 October 28
शेजारच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राची प्रगती संथ गतीने - जयंत पाटील
मुंबई - टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. मात्र राज्याचे प्रमुख कोणत्याही प्रकारचे हालचाल करत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. राज्यात बेरोजगारीची समस्या आहे. शेजारच्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राची प्रगती संथ गतीने सुरू आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन चार महिने होवून अजून जनतेच्या हिताचे निर्णय झाले नाहीत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.
16:49 October 28
तब्बल 5 वर्षानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा मंजूर
मुंबई - नगरविकास विभागाने तब्बल 5 वर्षानंतर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा विकास आराखडा आज मंजूर केला. मीरा-भाईंदर क्षेत्रातील जमीन आता विकास क्षेत्रामध्ये येणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या या विकास आराखड्याला दिली मंजुरी.
16:23 October 28
जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी दोघांना अटक,पाच मूर्तीही ताब्यात
जालना - जालन्यातील जांब समर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणी जालना पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या राम पंचायतनच्या पाच मूर्ती ताब्यात घेतल्या आहेत.
15:55 October 28
दहशतवादाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढण्याची गरज - मुख्यमंत्री शिंदे
मुंबई - दहशतवादाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. 26/11 ला जे घडले ते या देशात कोणीही विसरू शकत नाही. आमचे पंतप्रधान सर्व काही करण्यास सक्षम आहेत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत असे ताजमहाल पॅलेस, मुंबई येथे बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे याबाबतची ग्वाही दिली.
15:07 October 28
बोरिवलीत तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला, 4-5 वाहने ढिगाऱ्याखाली अडकली
मुंबई - बोरिवली येथील वझिरा नाका परिसरात एका तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून 4-5 वाहने खाली अडकली. कोणालाही दुखापत झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलिस पोहोचले आहेत.
14:44 October 28
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला 'राष्ट्रवादी पुन्हा' चे गाणे
पुणे - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज पुण्यात दिवाळी निमित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. भाजपकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या स्वागतावेळी डीजेवर भलतेच गाणे लागले. यामध्ये पाटील यांच्या स्वागताला राष्ट्रवादी पुन्हा हे गाणे लागल्याचे ऐकू येत होते. त्यामुळे आयोजक भांबावून गेले.
14:25 October 28
माझगावच्या अहमद बिल्डिंगमधील एका घराला आग
मुंबई - माझगाव येथील महापुरुष मंदिर मार्ग अहमद बिल्डिंग मधील एका घराला आग लागली आहे. आगीच्या ठिकाणी अग्निशमन दल दाखल झाले आहे. आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
14:18 October 28
अरविंद केजरीवाल यांचा बोलविता धनी कोण - नाना पाटोले
नांदेड - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बोलविता धनी कोण आहे, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. भारतीय चलनावर कुणाचे फोटो असावेत याला आमचा विरोध नाही. मात्र आधी रुपयांचे झालेले अवमूल्यन थांबायला हवे अशी अपेक्षा पटोले यांनी व्यक्त केली आहे.
14:07 October 28
खरे-खोटोपणा तपासून सोशल मीडियावर मेसेज शेअर करावे - पंतप्रधान
नवी दिल्ली - बनावट बातम्यांविरूद्ध जागरूकता निर्माण करण्याच्या गरजेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भर देण्या सांगितले. कारण सोशल मीडियाला कमी लेखले जाऊ शकत नाही असे ते म्हणाले. त्यातून निर्माण होणार्या खोट्या बातम्या अराजकता निर्माण करू शकतात. सोशल मीडियावर मेसेज शेअर करण्यापूर्वी लोकांनी तथ्य तपासावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
13:45 October 28
महेंद्रसिंह वाघेला यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
गांधीनगर - गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
13:00 October 28
गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी)चे ट्विटर हँडल हॅक, प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे
मुंबई - गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी) चे ट्विटर हँडल हॅक करण्यात आल्याची माहिती त्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर प्रवास करणार्या प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी GRP जबाबदार आहे. त्यांचेच ट्विटर हँडल हॅक झाल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे.
12:16 October 28
राज्य सरकारचे इंजिन निकामी - आदित्य ठाकरे
मुंबई - माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. हे सरकार आल्यानंतर राज्याबाहेर गेलेला टाटा-एअरबसचा चौथा मोठा प्रकल्प आहे. राज्य सरकारचे इंजिन निकामी झाले आहे. जरी केंद्र चांगले काम करत असले तरी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे मी मुख्यमंत्र्यांकडून एकदाही ऐकले नाही. आम्ही सत्तेत असतो तर महाराष्ट्रासाठी वेदांत फॉक्सकॉन प्लांट कायम ठेवला असता. आता तोही गेला आणि एअरबसही गेली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
12:02 October 28
भारतातील कोरोना पुन्हा वाढला, दिवसाला दोन हजारच्यावर कोरोनाग्रस्तांची नोंद
नवी दिल्ली - आज सकाळी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांत समोर आलेली कोरोनाची नवीन रुग्णसंख्या जाहीर करण्यात आली आहे. नवीन समोर आलेल्या रुग्णांमुळे देशातील एकूण बाधितांची संख्या 4,46,49,088 झाली आहे.
09:38 October 28
मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक
मुंबई रेल्वे पोलिसांचे ट्विटर अकाउंट हॅक, मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांनी ट्विटर वरून दिली माहिती
09:12 October 28
कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
सातारा - कोयना धरण परिसराला शुक्रवारी सकाळी ६:३४ मि. भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झाली नसल्याचे सातारा जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.Conclusion:
08:13 October 28
चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना पोलिसांनी केली अटक
मुंबई : चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांना पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे. पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना काल अंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
07:14 October 28
कुर्ला परिसरातील एका गोदामाला
मुंबई : कुर्ला परिसरातील एका गोदामाला लेव्हल-२ ची भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
06:47 October 28
तस्करीचे सोने घेऊन जाताना मुंबई विमानतळावर दोघांना अटक
मुंबई : मुंबई विमानतळ कस्टम्सने ( Mumbai Airport Customs ) काल दुबईहून आलेल्या 2 भारतीय महिला प्रवाशांना अडवले. तपासणी केल्यावर असे आढळून आले की, दोघेही त्यांच्या पायाभोवती गुंडाळलेले 2.65 किलो 24 केरेट सोने मेणाच्या स्वरूपात घेऊन जात होते. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या सतर्कतेमुळे बेकायदा एवढे मोठे सोने घेऊन जाणाऱ्या दोन प्रवाशांना त्यांनी सीताफिने अटक केली. पुढील तपास कस्टम विभाग करीत आहे.
06:46 October 28
आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांना विचारलं, कृषी मंत्री कोण? शेतकरी म्हणाले...गद्दार गद्दार
पुणे:- राज्याचे कृषी मंत्री कोण? ते कुठे आहेत.. असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विचारले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांना गद्दार गद्दार अशा सुरात त्यांना उत्तर दिले. राज्यातील परिस्थिती अशी असेल तर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार ही विचार करण्याची गोष्ट आहे. कुणी जरी तुमच्या सोबत नसेल तरी शिवसेना नेहमी तुमच्या सोबत असेल. उद्धव साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कर्जमाफी केली होती. शेतकऱ्यांना मदत पोहचवली होती. असे होत असताना आताच्या सरकारने तशीच मदत शेतकरी बांधवांना दिली पाहिजे.अस मत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
06:15 October 28
Maharashtra Breaking News Live
बारामती - तालुक्यातील बारामती मोरगाव रस्त्यावर फोंडवाडा ( Baramati Morgaon road ) येथे अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला ( Three died on the spot in an accident ) आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाच्या बाजूने येत चालत येत असलेले दशरथ साहेबराव पिसाळ (वय 62 रा. फोंडवाडा, माळवाडी, तालुका बारामती) त्याच वेळेस मोरगावकडून बारामतीकडे दुचाकीवर निघालेले अतुल गंगाराम राऊत (वय 22 रा. करावागज ता. बारामती) तसेच त्यांची आई नंदा राउत या तिघांचा मृत्यू झाला.