पुणे : शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत. महाराजांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत - पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे. काश्मीरच्या किरण व तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.
Breaking News : काश्मीरमध्ये भारत - पाकिस्तान सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - Maharashtra latest news today
19:18 February 14
काश्मीरमध्ये भारत - पाकिस्तान सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
21:23 February 13
मध्य मुंबईत मोठ्या प्रमाणावर चरस विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या कक्ष 4ने केली अटक
मुंबई : काळाचौकी येथील रे रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूस असलेल्या सिमेंटच्या जुन्या पडक्या गोडाऊन जवळ मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ४ने मोठी कारवाई करत 1 किलो 298 ग्रॅम चरस जप्त केले आहे तसेच चार पुरुषांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने अटक केलेल्या आरोपींची नावे खलील मस्तानअली शेख (वय ५७), मेहबूब मोहम्मद शफात मंसुरी (वय ५७), सलीम मस्तानअली शेख (वय ५८), गणेश मणी हरिजन(वय ४०) अशी आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
21:23 February 13
आश्वासनानंतर शीव रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास मागे
मुंबई - मुंबई महापालिकेच्या सायन येथील रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियागार सहाय्यक पदाची परिक्षा घेण्यात आली. त्यात काही ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना नापास करण्यात आले. त्याविरोधात आजपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र पालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदुर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली आहे.
19:52 February 13
पंतप्रधांनवरील आरोपांसंदर्भात लोकसभा सभापतींना पुराव्यांसह पत्र - राहुल गांधी
वायनाड (केरळ) - राहुल गांधी यांनी सांगितले की, संसदेतील त्यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आला आहे. ते म्हणाले की, मी कोणाचाही अपमान केला नाही. मी जे काही बोललो त्याबाबत मला पुरावे दाखवण्यास सांगण्यात आले आणि त्यांनी काढलेल्या प्रत्येक मुद्द्यांसह मी लोकसभा अध्यक्षांना पुराव्यासह पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करुन काही प्रश्न उपस्थित केले होते.
19:43 February 13
उद्यापासून मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गावर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मेट्रो धावणार
मुंबई - उद्या व्हलेंटाईन डेपासून मेट्रोने मेट्रो लाइन 2A आणि 7 मार्गावर रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी रात्री 10 वाजेपर्यंतच मेट्रो धावत होत्या. प्रवाश्यांच्या मागणीनुसार एमएमआरडीएचा निर्णय अंधेरी ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो आता रात्री 11:30 वाजेपर्यंत धावेल. मुंबई मेट्रोचे कामकाजाचे तास वाढवले आहेत. त्यामुळे मुंबई मेट्रोने मेट्रो लाइन 2A आणि 7 वरील प्रवश्यांना याचा फायदा होईल .अर्थात पाहिले दोन महिने प्रयोगिकरित्या उशिरापर्यंत मेट्रो धावणार.
19:08 February 13
असत्याचा आधार घेऊन फडणवीस वक्तव्य करतील असे कधी वाटले नाही - पवार
मुंबई - फडणवीस हे सुसंस्कृत आणि सभ्य आहेत. पण असत्याचा आधार घेऊन ते असे वक्तव्य करतील असे कधी वाटले नाही अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे. पवार यांची फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी नुकत्याच केलेल्या विधानाच्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे.
18:29 February 13
शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच अजित पवारांसोबतचा शपथविधी - देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा स्पष्टोक्ती
मुंबई - शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच पहाटेचा शपथविधा झाला होता असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एवढेच नाही तर महामंडळांच्या अध्यक्षांसदर्भातही पवारांशी बोलणे झाल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा पुन्हा एकदा केला आहे. यापूर्वी दोनवेळा फडणवीस यांनी यासंदर्भात खुलासा केला होता.
18:23 February 13
उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपी म्हणतो 'मी कट्टर सुन्नी मुस्लिम, मला जामीन द्या'
मुंबई - अमरावतीमधील औषध दुकानदार उमेश कोल्हे हत्येतील आरोपी युसूफ खानने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. आपण तबलीगी जमातजा सदस्य नाही. आपण कट्टर सुन्नी मुस्मिम असल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळ आपल्याला जामिन मिळावा अशीही विनंती कोर्टात केली आहे.
17:57 February 13
देशाचा जानेवारीसाठी किरकोळ महागाई दर 6.52 टक्के
नवी दिल्ली - जानेवारीसाठी किरकोळ महागाई दर हा 6.52 टक्के राहणार आहे. तर ग्रामीण महागाई दर हा 6.85 टक्के तर शहरी महागाई दर 6.00 टक्के आहे.
17:44 February 13
दिल्लीच्या महापौर निवडणुकीत नामनिर्देशित सदस्य मतदान करू शकत नाहीत - सुप्रीम कोर्टाची स्षष्टोक्ती
नवी दिल्ली - महापौर निवडणुकीशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, नामनिर्देशित सदस्य महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले आहे. नामनिर्देशित सदस्य निवडणुकीला जाऊ शकत नाहीत अशी घटनात्मक तरतूद अगदी स्पष्ट आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
17:14 February 13
सायबर फसवणुकीत ठाण्यातील युवकाला 10.55 लाख रुपयांचा गंडा
ठाणे - शहरातील एका 28 वर्षीय युवकाला एका सायबर फसवेगिरी करणाऱ्याने तब्बल 10.55 लाख रुपयांना गंडवले आहे. त्याला मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष या सायबर फ्रॉडस्टरने दाखवले होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
16:53 February 13
मालाडच्या जळीतग्रस्तांना खास बाब म्हणून मदत द्यावी - आ. सुनिल प्रभू
मुंबई - मालाड पूर्व, जामरूषी नगर येथील झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत बाधित कुटुंबांना खास बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. बाधित कुटुंबांचे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी स्थलांतर करावे, अशा स्वरुपाचे पत्र त्यांनी दिले आहे.
16:37 February 13
हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्या सरकार तयार, पुढील सुनावणीत नावे सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टामध्ये अदानी-हिंडेनबर्ग वादाची सुनावणी सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात अदानी-हिंडेनबर्ग वादावरील सुनावणीदरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, भविष्यात गुंतवणूकदारांचे संरक्षण कसे करता येईल आणि SEBI परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम आहे हे सुचवण्यासाठी समिती नेमण्यास सरकारला हरकत नाही. समितीसंदर्भात केंद्राला शुक्रवारी माहिती देण्याचे आदेश सुप्रमीन कोर्टाने दिले.
16:29 February 13
महिला प्रीमियर लीग यास्तिका भाटियाला मुंबईने घेतले 1.5 कोटी रुपयात
महिला प्रीमियर लीग लिलावात यास्तिका भाटियाला मुंबईने 1.5 कोटींना विकत घेतले.
15:58 February 13
हुंड्यासाठी छळामुळे वांद्रेमध्ये महिलेची आत्महत्या
मुंबई - पिंकी अभिषेक चावला नावाच्या महिलेने पती अभिषेक चावला आणि सासरे चंद्रभान चावला यांच्याकडून हुंड्यासाठी केलेल्या छळामुळे वांद्रे येथे आत्महत्या केली. महिलेच्या कुटुंबीयांनी फिर्याद दिल्यानंतर पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.
15:51 February 13
अंडर-19 कर्णधार शफाली वर्माला दिल्ली कॅपिटल्सने घेतले 2 कोटी रुपयांत
महिला प्रीमियर लीग लिलावात भारताची अंडर-19 कर्णधार शफाली वर्माला 2 कोटी रुपयांत दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे.
15:41 February 13
मविआचे चांगले काम रोखणाऱ्या ‘गद्दारांना’ धडा शिकवण्याची वेळ - अजित पवार
राज्यात 'देशद्रोह्यांना धडा शिकवण्याची वेळ' आली आहे अशा आशयाचे वक्तव्य शिंदेंच्या बंडखोरीवर अजित पवार यांनी केले आहे. पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे चांगले काम रोखणाऱ्या ‘गद्दारांना’ धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे म्हटले. ते पिंपरी-चिचंवडमध्ये सभेत बोलत होते.
15:25 February 13
महिला प्रीमियर लीग लिलावात यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला दिले 2.6 कोटी
महिला प्रीमियर लीग लिलावात रेणुका सिंगला बेंगळुरूने 1.6 कोटींना विकत घेतले. तर यूपी वॉरियर्सने दीप्ती शर्माला 2.6 कोटींना खरेदी केले.
15:21 February 13
महिला बचत गटांना फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर 'हनुमान चालीसा' म्हणण्यापासून पोलिसांनी रोखले
नागपूर - महिला बचत गटांच्या सदस्यांना त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात हनुमान चालीसा म्हणण्यासाठी जात असताना नागपूर पोलिसांनी त्यांना रोखले. वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या सदस्यांनी फडणवीस यांचे गाव असलेल्या नागपूर शहरात आठवडाभरापासून निदर्शने केली आहेत. राज्य सरकारने मानधन रोखले आहे, असा त्यांचा दावा आहे. या आक्रमक महिलांचा पवित्रा पाहिल्यानंतर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या कार्यालयात शहर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
15:05 February 13
महिला प्रीमियर लीग - स्मृती मानधनाला बंगळुरूने घेतले 3.40 कोटींना विकत
महिला प्रीमियर लीग लिलावात स्मृती मानधनाला बंगळुरूने घेतले 3.40 कोटींना विकत
14:58 February 13
महिला प्रीमियर लीग लिलाव - हरमनप्रीत कौरला १.८ कोटी रुपयांना मुंबईने घेतले विकत
मुंबई - महिला प्रीमियर लीग लिलाव सुरू आहे. यामध्ये हरमनप्रीत कौरला मुंबईने १.८ कोटी रुपयांना विकत घेतले.
14:55 February 13
महिला प्रीमियर लीग लिलाव - दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये हरमनप्रीत कौरसाठी बोली सुरू
दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये हरमनप्रीत कौरसाठी बोली सुरू झाली आहे. हरमनप्रीत कौर आता ब्लॉकवर आहे. तिला किती मिळतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
14:52 February 13
महिला प्रीमियर लीग लिलाव - स्मृती मानधनासाठी मुंबई आणि बेंगळुरूमध्ये चुरस
मुंबई - महिला प्रीमियर लीग खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. त्यामध्ये स्मृती मानधनासाठी मुंबई आणि बेंगळुरूमध्ये चुरस सुरू झाली आहे. स्मृती मानधना 50 लाख रुपयांच्या ब्लॉकवर गेली आहे.
14:22 February 13
सुप्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांचे वृद्धापकाळाने निधन
मुंबई - सुप्रसिद्ध चित्रकार ललिता लाजमी यांचे आज मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. 90 वर्षांच्या ललिता लाजमी यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रख्यात सिने दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या त्या भगिनी होत्या. तसेच 'रुदाली' चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी या त्यांच्या कन्या होत्या.
14:16 February 13
बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यापेक्षा अतिक्रमणाचा मुद्दा अधिक विचारपूर्वक सोडवावा : मुंबई उच्च न्यायालय
मुंबई - केवळ अतिक्रमणांच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित संस्थांचे कान उपटले आहेत. अतिक्रमण केले असे लेबल लावून लोकांना विस्थापित करणे हा त्यावरील उपाय नाही. बुलडोझर लावून अतिक्रमण काढले हे तर योग्य नाही. त्याउलट या समस्येकडे अधिक विचारपूर्वक लक्ष दिले पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पश्चिम रेल्वे, मुंबई नागरी संस्था आणि MMRDA यांच्याकडे कोणतेही पुनर्वसन धोरण असल्यास, त्याची कोर्टाला माहिती द्यावी अशीही सूचना कोर्टाने केली.
13:42 February 13
गडचिरोली आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट
गडचिरोली - जिल्ह्यातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी भोजनाचा निर्वाहभत्ता वाढवून देण्याची मागणी केली असता, हा मुद्दा सरकार दरबारी मांडण्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
13:37 February 13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक दौऱ्यादरम्यान चित्रपट कलाकार, खेळाडूंची घेतली भेट
12 फेब्रुवारी रोजी कर्नाटक दौऱ्यावर असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट कलाकार, खेळाडू आणि स्टार्टअप जगतातील व्यक्तींची भेट घेतली. संवादादरम्यान त्यांनी पुनीत राजकुमार यांचीही आठवण काढल्याचे सूत्रांनी सांगितले
12:54 February 13
मुंबईत विमानतळावरून बेपत्ता 69 वर्षीय अनिवासी भारतीयाचा उपनगरात शोध
मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेपत्ता झालेल्या एका 69 वर्षीय अनिवासी भारतीयाचा उपनगरात शोध लागला आहे. दोन सजग नागरिकांच्या मदतीने 12 दिवसांनंतर तो त्याच्या मुलीसोबत परत आला आहे, असे पोलिसांनी सांगितले,
12:52 February 13
मालाड येथील आगीत एका मुलाचा मृत्यू
मुंबई - मालाड येथील आगीत एका मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रेम तुकाराम बोरे १२ वर्षे असे मृताचे नाव आहे. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी स्थानिक लोकांनी या मुलाला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले होते. रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली
12:41 February 13
राज्यसभेत आजही अदानी मुद्यावर गदारोळ, धरखर यांचा सदस्यांना इशारा
नवी दिल्ली - राज्यसभेत मुद्दाम अडथळे निर्माण केले जात आहेत. हा सभागृह चालवण्याचा मार्ग नाही. आम्ही आधीच खूप वेळ वाया घालवला आहे. सभागृहात घोषणाबाजीने व्यत्यय आल्यास, लोकांच्या अपेक्षेनुसार कडक धोरण राबवून काम करण्यास मला भाग पडेल, असा इशारा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखर यांनी दिला.
12:36 February 13
धारावी गर्भवती महिलेच्या खून प्रकरणी पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल
मुंबई - धारावी येथे 11 फेब्रुवारीला रोशनी सरोज नावाच्या 24 वर्षीय गर्भवती महिलेची तिच्या पतीने हत्या केली होती. पोलिसांनी पती कन्हैयालाल सरोजला हत्येप्रकरणी अटक केली होती. हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप रोशनीच्या वडिलांनी केला आहे. सासरच्यांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
12:17 February 13
मुंबईतील पोलीस सहआयुक्तांना मध्यरात्री अज्ञात व्यक्तीचा फोन, कॉलरचा शोध सुरू
मुंबई : मुंबईतील पोलीस सहआयुक्तांना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अज्ञात कॉलरला शोधण्याचे तपासकार्य देखील पोलिसांनी जलद गतीने सुरू केले आहे.
12:09 February 13
एमपीएससी उमेदवारांचा 17 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा
मुंबई - नवीन अभ्यासक्रम पॅटर्नबाबत अधिकृत भूमिका जाहीर करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा एमपीएससी उमेदवार 17 फेब्रुवारीपासून पुन्हा आंदोलन करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांना एमपीएससीकडून अधिकृत भूमिकेची अपेक्षा व्यक्त करुन विद्यार्थी पुन्हा संतप्त झाले आहेत.
11:46 February 13
मालाड परिसरात भीषण आग, 50 हून अधिक वस्त्या जळून खाक
मुंबईतील मालाड परिसरात भीषण आग लागली आहे. मालाड पूर्व येथील आंबेडकर नगर येथील झोपडपट्टीला भीषण आग लागली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक तासापासून आग विझवण्याचे काम सुरू आहे, मात्र अद्यापपर्यंत अग्निशमन दलाचे पथक पोहोचलेले नाही. 50 हून अधिक वस्त्या जळून खाक झाल्या आहेत. या परिसरात सुमारे 300 वस्त्या असून, आग सातत्याने वाढत आहे.
11:44 February 13
जम्मू आणि काश्मीरच्या मतदारसंघांची पुनर्रचनेवरील आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी सीमांकन आयोग स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
11:19 February 13
गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसाकडून अटक
एका कॉलरने पुण्यातील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली. कॉलरने सांगितले की त्याचे नाव पनयम शिवानंद आहे आणि तो हैदराबादचा आहे. चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. कॉलरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
11:15 February 13
राहुल गांधींनी संसदेत संसदेत सांगितलेले काही असंसदीय नाही-मल्लिकार्जुन खरगे
राहुल गांधींनी संसदेत जे काही सांगितले ते आधीच सार्वजनिक क्षेत्रात होते. त्यात असंसदीय काहीही नाही. त्यामुळे ते नोटीसला त्यानुसार उत्तर देतील, असे काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधींना मिळालेल्या लोकसभा सचिवालयाच्या नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे.
10:30 February 13
नवी मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमुळे तुळजापूरला जाणे होणार सहजशक्य
नवी मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसमुळे यात्रेकरूंना तुळजा भवानी मंदिरात जाण्यासाठी सुलभ कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
10:25 February 13
एरोइंडिया हे भारताच्या विस्तारित क्षमतेचे उदाहरण-पंतप्रधान नरेंद्र मोदी
एरोइंडिया हे भारताच्या विस्तारित क्षमतेचे उदाहरण आहे. जवळपास 100 राष्ट्रांच्या उपस्थितीमुळे भारतावर जगाचा विश्वास वाढल्याचे दिसून येते. भारत आणि जगातील 700 हून अधिक प्रदर्शक सहभागी होत आहेत. याने मागील सर्व विक्रम मोडीत काढल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
10:21 February 13
गुगल पुणे कार्यालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकी प्रकरणात हैदराबादमधून एकाला अटक
गुगलच्या मुंबई कार्यालयात गुगल पुणे कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आला होता. बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथून एकाला अटक करण्यात आली आहे
10:12 February 13
गुगलचे पुण्यातील ऑफिस बॉम्बने उडविण्याची धमकी, संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू
गुगलचे पुण्यातील ऑफिस बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. संपूर्ण इमारतीची तपासणी सुरू आहे.
09:47 February 13
रश्मी शुक्लांसह तीन आयपीएस अधिकार्यांची डीजीपी पदावर बढती
मुंबई भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला आणि महाराष्ट्र केडरच्या इतर दोन आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने पोलीस महासंचालक (डीजीपी) पदावर बढती दिली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
09:47 February 13
सदोष परीक्षा पद्धतीमुळे खासगी कोचिंग क्लास वाढत आहेत, शिक्षणतज्ज्ञांचे मत
सदोष परीक्षा पद्धतीमुळे खासगी कोचिंग क्लासेस आणि परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपीला जन्म दिला आहे, असे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 वर शनिवारी जालना येथील एका महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
09:20 February 13
टॉवर वॅगेन ट्रेनने कर्मचाऱ्यांना उडविले, चार गँगमनचा मृत्यू
टॉवर वॅगेन ट्रेनने लासलगावजवळ गँगमन कर्मचाऱ्यांना उडविले आहे. या अपघातात चार गँगमनचा मृत्यू झाला आहे.
07:42 February 13
एअरफोर्स स्टेशनवर एरो इंडिया 2023 चे पंतप्रधान करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेंगळुरूमधील येलाहंका येथील एअरफोर्स स्टेशनवर एरो इंडिया 2023 चे उद्घाटन करणार आहेत.
07:40 February 13
नवी दिल्लीत कारमपुरा परिसरात भीषण आग
नवी दिल्लीत कारमपुरा परिसरातील मोती नगर पोलीस ठाण्याजवळील एका कारखान्यात काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या 27 गाड्या घटनास्थळी हजर आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.
07:09 February 13
Breaking News in Maharashtra : बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही-बाळासाहेब थोरात
मुंबई : एच.के.पाटील यांच्याशी चर्चा करून पक्ष सुधारण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही आम्ही बोलणार आहोत. हे सर्व काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी एच. के. पाटील यांच्या भेटीनंतर दिली आहे.
मी त्यांच्या बाळासाहेब थोरात दुखावलेल्या भावना मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांच्यापर्यंत पोहोचवल्या. हा कौटुंबिक प्रश्न आहे आणि लवकरच सोडवला जाईल. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांच्या सीएलपी नेतेपदाच्या राजीनाम्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी दिली आहे.