नवी दिल्ली - आज संध्याकाळच्या सुमारास दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Breaking News : दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के
22:38 March 21
दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के
22:37 March 21
ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधून अंमली पदार्थांची तस्करी प्रकरण; तिघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी
मुंबई - गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये कथित तस्करी केल्याप्रकरणी 15 किलो केटामाइन आणि 23,000 व्हायग्रा गोळ्या जप्त केल्याप्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक केली. अभय वसंत जडये, बाबासाहेब बाजीराव काकडे, शितेश सुरेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हे तिघेही मुंबई विमानतळाच्या मालवाहू मालावर क्लिअरिंग सेवा आणि माल बुकींग करण्यासाठी अधिकृत खाजगी कंपनीत काम करतात. सर्व आरोपी १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. मुंबई पोलिसांनी दानिश मुल्ला आणि कैलास राजपूत यांच्यासह तीन वाँटेड आरोपींविरुद्ध लुक आऊट सर्कुलर (LOC) जारी केले आहे. राजपूतवर अंमली पदार्थांशी संबंधित अनेक खटले आहेत आणि तो प्रमुख ड्रग्ज पुरवठादार असल्याचे मानले जाते.
18:15 March 21
साताऱ्यातील शू-मार्टमध्ये गोळीबार, कामगार जखमी
सातारा - पुणे बंगळुरू महामार्ग लगत असलेल्या शू-मार्टमध्ये गोळीबार झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. शेंद्रे (ता. सातारा) येथील प्रसिद्ध प्रियंका शू-मार्टमध्ये ग्राहकाने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. गोळी लागून एक कामगार देखील जखमी झाला आहे. सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ग्राहकाने गोळीबार केला आहे की चुकून फायर झाला आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
17:39 March 21
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना अपघात; सिन्नरचे तिघे युवक ठार
सोलापूर : आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. अपघातात सिन्नर (जि नाशिक)येथील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे. पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला आहे. निखिल रामदास सानप, अनिकेत बाळासाहेब भाबड, अथर्व शशिकांत खैरनार अशी मृतांची नावे आहेत.
16:32 March 21
गडकरींना धमकी दिलीच नाही, कॉलरचा दावा
नागपूर - नितीन गडकरी यांच्या कार्यालयात जयेश पुजारी नावाच्या एका व्यक्तीचे तीन कॉल आले होते. हा नंबर मंगळुरू येथील एका महिलेचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिच्याशी देखील संवाद साधला. संबंधित कॉल तिच्या मैत्रिणीने किंवा जयेश पुजारीने केला होता, याबाबत शोध घेत असल्याचे नागपूरचे डीसीपी राहुल मदने यांनी सांगितले. तसेच आपण शेअरची मागणी केली, धमकी दिली नाही असे कॉलरने म्हटल्याची माहिती पोलिसांनी दिली.
16:02 March 21
सुरक्षेसाठी दाखल खा. राजन विचारे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई - सुरक्षेच्या कारणास्तव दाखल केलेली खा. राजन विचारे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात राजन विचारे याचिका दाखल करणार आहेत. शासनाची बाजू न्यायालयाने ग्राह्य मानली. मात्र विचारे यांचे वाकिल यांची बाजू नोंदली गेली. नियमानुसार जेवढे हवे तेवढे सुरक्षा रक्षक नाहीत. ही बाब वकील नितीन सातपुते यांनी जोरदारपणे मांडली. मात्र न्यायमूर्तींनी शासनाची बाजू ग्राह्य मानली आणि याचिका फेटाळली.
15:24 March 21
हसन मुश्रीफ यांना ईडीने पुन्हा बजावले समन्स; २४ मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश
मुंबई - साखर कारखान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने पुढील चौकशीसाठी २४ मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मागील आठवड्यात ईडीने त्यांची सुमारे 10 तास चौकशी केली होती. आतापर्यंत ईडीने त्यांची दोन वेळा चौकशी केली आहे.
14:21 March 21
दिल्ली अर्थसंकल्पाला केंद्राची अखेर मंजुरी
दिल्ली राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार होता. हा अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रखडला होता. या अर्थसंकल्पाला आज केंद्राने अखेर मंजुरी दिली आहे.
14:20 March 21
ठाणे जिल्ह्यातील वेश्याव्यवसायासाठी वापरल्या जाणार्या स्पा सेंटरमधून तीन महिलांची सुटका
ठाणे जिल्ह्यातील वेश्याव्यवसायासाठी वापरल्या जाणार्या स्पा सेंटरमधून पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली केली आहे.
14:19 March 21
मालमत्ता कर नाही भरल्यास नळ जोळणी तोडण्यात येणार
लातूर महानगरपालिकेने नागरिकांकडून प्रलंबित मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. ही मोहिम 31 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. थकबाकी नाही भरल्यास नळ जोळणी तोडण्यात येणार असल्याचा इशारा मनपाने दिला आहे.
14:17 March 21
लातूरमध्ये अधिकाऱ्यांनी रोखले तीन बालविवाह
लातूरमध्ये तीन अल्पवयीन मुलींचे लग्न लावून लावण्यात येत असताना अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे बालविवाह रोखण्यात आले आहेत.
13:51 March 21
अंतराळात शस्त्रास्त्रे बनवण्याची शर्यत सुरू.. अंतराळ क्षमता विकसित करण्याची गरज-एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी
अंतराळात शस्त्रास्त्रे बनवण्याची शर्यत आधीच सुरू झाली आहे. युद्ध जमीन, समुद्र, वायु, सायबर आणि अवकाश या सर्व क्षेत्रांमध्ये पसरणार आहे. देशाच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अंतराळ क्षमता विकसित करण्याची गरज असल्याचे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी म्हटले आहे.
13:50 March 21
हिंदुत्वावर ट्विट केल्याने कन्नड अभिनेता चेतन कुमारला अटक
कन्नड अभिनेता चेतन कुमार याला बंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुत्व हे खोट्या बाबीवर असल्याचे ट्विट चेतन कुमार याने केले होते. त्यानंतर हे ट्विटर व्हायरल झाले. बजरंग दलाचे शिवकुमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
13:49 March 21
अर्थसंकल्प मंजुरीचे प्रकरण दिल्ली सरकारकडेच प्रलंबित-अनुराग ठाकूर
दिल्ली नायब राज्यपालांनी काही निरीक्षणांसह 2023-24 साठी वार्षिक अर्थसंकल्प मंजूर केला आहे. फाइल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. दिल्ली सरकारने राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गृहमंत्र्यांलया कडे फाइल पाठवली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने आपली निरीक्षणे दिल्ली सरकारला कळवली आहेत आणि 17 मार्चपासून उत्तराची वाट पाहत आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. दिल्ली सरकारकडे प्रलंबित आहे. त्यासाठी केंद्र सरकारला दोष देणे चुकीचे आहे, असल्याचेही अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.
13:47 March 21
वकील सदावर्ते यांच्यावरील बार काउन्सिलचा कारवाई सुरुच राहणार
वकील सदावर्ते यांना शिस्तभंग कारवाईच्या बाबतचे नियमांचे उल्लंघन करता येणार नाही. बार काउन्सिलने केलेल्या कारवाईबाबत वकील सदावर्ते यांना उच्च न्यायालयाने दिलासा नाही. बार काउन्सिलची कारवाई सुरूच राहणार आहेत. वकील सदावर्ते यांच्या मुलीबाबत समाज माध्यमात व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबतची याचिका न्यायालयाने रद्द केली आहे.
13:32 March 21
विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब
गतिमान सरकार आहे असं सांगितलं जातं तर कर्नाटकबाबत गतिमान राहत नाही. आपल्या बसवर हल्ले होतात. मराठी माणसावर हल्ले असतील तर तातडीने निर्णय घ्या, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली. विरोधकांच्या घोषणाबाजीने विधानपरिषदेत गोंधळ झाला. विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले आहे.
12:47 March 21
नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन करण्यात आला आहे. यापूर्वी कर्नाटकमधून धमकीचा फोन करण्यात आला होता.
12:40 March 21
पानसरे खून प्रकरणी वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामीनाविरोधातील अर्ज सरकारने घेतला मागे
मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणात कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. आरोपी वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील केलेला अर्ज महाराष्ट्र सरकारने मागे घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात याची आज सुनावणी झाली.
12:34 March 21
कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडून राऊतांच्या टीकेला उत्तर देताना पवारांचे नाव, राष्ट्रवादी आक्रमक
खासदार संजय राऊत यांनी कृषीमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे भुसे सभागृहात उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी पवारांचे नाव घेतल्याने अजित पवार संतप्त झाले. पवारांचे नाव घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले आहेत.
12:15 March 21
पंतप्रधान मोदी अदानींच्या चुकांना पाठीशी घालत आहेत - पटोले
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हेतू स्पष्ट आहे की त्यांना चुकांना पाठीशी घालायचे आहे. तसेच निरपराधांना तुरुंगात पाठवायचे आहे. मेहुल चोक्सीला इंटरपोलची नोटीस काढण्यात मदत करून पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे राहुल गांधी यांनी दाखवून दिले, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. राहुल गांधी यांना पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंध जाणून घ्यायचे आहेत. त्यांना भारत आणि जगभरातून कंत्राटे आणि पैसा का दिला जात आहे, हाही एक मोठा प्रश्न आहे. अदानी मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यासाठी राहुल गांधींचा कसा छळ केला जातो हे जनता पाहत आहे, असा घणाघातली नाना पटोले यांनी केला.
11:52 March 21
मुंबईचे सर्व रस्ते काँक्रीटचे करून सर्व सुविधा पुरवणार - मुख्यमंत्री
मुंबई - मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीट करणार आहेत. उद्यानांमध्ये लाईट पिण्याचे पाणी शौचालय यांची व्यवस्था करणार आहे. मुंबईतील सर्व उद्यानांचा डीपीआर तयार करावा असे महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. पूर्व दुर्गती आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूला अद्ययावत शौचालय उभी करण्याचे निर्देशही दिले आहेत. उद्यानांमध्ये सुरक्षा पुरविण्याबाबतही निर्णय झाला आहे. सर्व उद्यानांचा स्वतंत्र डीपीआर करण्याचा सूचना देण्यात आल्यात. मुंबईतील आमदारांनी उद्यानांबाबत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित मुद्यावर उत्तर देताना मुख्यंत्र्यांनी ही माहिती दिली.
11:47 March 21
अवैध दारूच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी माहिती देणाऱ्यांचे महाराष्ट्र सरकार करणार नेटवर्क
महाराष्ट्र सरकार अवैध दारूच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी माहिती देणाऱ्यांचे नेटवर्क तयार करण्याचा विचार करत आहे, असे राज्य विधानसभेत सांगण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात सरकार उचलत असलेल्या विविध उपाययोजनांची यादी केली.
11:46 March 21
नालासोपारा शहरातील सेंट्रल पार्कमध्ये तरुणाचा आढळला मृतदेह
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहरातील सेंट्रल पार्कमध्ये एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. सोमवारी काही स्थानिकांनी हा मृतदेह एका बाकावर पडलेला दिसला आणि पोलिसांना याची माहिती दिली.
11:43 March 21
मुंबईतील मँचेस्टर दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न-जितेंद्र आव्हाड
गुढीपाडवा आनंदाचा सण आहे. मात्र, मुंबईत दुःखाचा दिवस आहे. मुंबईतील मँचेस्टर दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हान यांनी केला. मुंबईत टेक्सटाईल्सचे कार्यालय दिल्लीत हलविण्यात येणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी आरोप केला आहे.
11:42 March 21
ठाणे जिल्ह्यातील गोडाऊनची आग १३ तासानंतर आटोक्यात
ठाणे जिल्ह्यातील एका गोडाऊन कॉम्प्लेक्समध्ये लागलेली आग मंगळवारी पहाटे 13 तासांनंतर आटोक्यात आली. स्टोरेज इन्व्हेंटरीमध्ये ज्वलनशील साहित्य होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
11:40 March 21
अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला अटक
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या ब्लॅकमेल आणि खंडणी प्रकरणी बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला पोलिसांनी अटक केली आहे. निर्मलने अनिल जयसिंघानी यांना लपून मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे.
10:55 March 21
विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांची घोषणाबाजी
विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. झोपलेले सरकार जागा होऊ दे जनतेचा पाडवा गोड होऊ दे, अशा घोषणा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिल्या आहेत. बळीराजाला मदत कराव, अशी विरोधकांकडून मागणी केली जात आहे.
10:38 March 21
पंजाबला शांतता, बंधुता आणि विकासाची गरज-बलजीत सिंग दादुवाल
असे कोणतेही पाऊल उचलू नये ज्यामुळे जगभरातील शीख समुदायावर परिणाम भोगावे लागणार आहेत. पंजाबला शांतता, बंधुता आणि विकासाची गरज असल्याचे बलजीत सिंग दादुवाल यांनी म्हटले.
10:36 March 21
राहुल हे सध्याचे भारतीय राजकारणातील मीर जाफर-संबित पात्रा
राहुल गांधींना संसदेत माफी मागावी लागणार आहे. ते नेहमीच देशाची बदनामी करतात. राहुल हे सध्याचे भारतीय राजकारणातील मीर जाफर आहेत. त्यांनी देशाचा अपमान केला आणि परकीय शक्तीला देशात हस्तक्षेप करण्यास सांगितले. हे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचे सातत्यपूर्ण 'षडयंत्र' आहे. त्यांचा संसदेत सहभाग कमी असताना त्यांना कोणीही बोलू देत नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.
10:35 March 21
तुम्ही दिल्लीकरांवर नाराज का आहात, अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून दिल्लीचा अर्थसंकल्प थांबवू नका, अशी विनंती केली आहे. देशाच्या 75 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प थांबवण्यात आला आहे. तुम्ही दिल्लीकरांवर नाराज का आहात, असे केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे.
10:35 March 21
लोकल सेवा १० ते १५ मिनिटाने धावण्यास सुरुवात
गोरेगाव, भाईंदरसह मुंबईच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. लोकल सेवा १० ते १५ मिनिटे उशीरा धावत आहे.
10:06 March 21
तालिका अध्यक्ष सुनील भुसार यांची वेळेत पोहोचण्यासाठी उडाली धांदल
तालिका अध्यक्ष सुनील भुसार यांची विधानभवनात जाण्यासाठी धावपळ उडाली आहे. उशीर झाल्याने गेटवरूनच त्यांनी पळायला सुरुवात केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
09:40 March 21
पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणात पंजाब सरकार करणार मोठी कारवाई
जानेवारी २०२२ मध्ये पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तत्कालीन डीजीपी सिद्धार्थ चट्टोपाध्याय, तत्कालीन डीआयजी इंदरबीर सिंग आणि तत्कालीन एसएसपी फिरोजपूर हरमनदीप सिंग हंस यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
09:34 March 21
निवडणुका कधीही घ्या, आम्ही तयार- संजय राऊत
निवडणुका कधीही घ्या, आम्ही तयार आहोत, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे.
09:33 March 21
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली G20 चे लोकशाहीकरण झाले-देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली G20 चे लोकशाहीकरण झाले आहे. ती एक लोकचळवळ बनली आहे. नागरी समाजाची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण सरकारकडे कायदेशीर अधिकार आहेत. परंतु नागरी समाजाला नैतिक अधिकार आहेत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सिव्हिल 20 (G20) च्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले आहे.
08:59 March 21
मुंबईत अवकाळी पावसाचा धुमाकूळ
मुंबईत अवकाळी पावसाने नागरिकांना जेरीस आणले आहे. जेजे फ्लायओव्हरवर पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने मुंबईकराची सकाळी चांगलीच धांदल उडत आहे.
07:51 March 21
येत्या 3-4 तासांत मुंबई विभागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता
येत्या 3-4 तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई विभागाच्या हवामान खात्याने हा अंदाज वर्तविला आहे.
07:42 March 21
बिअर बारची तोडफोड आणि दरोडा टाकल्याप्रकरणी नऊ जणांना अटक
नागपूर शहरातील बिअर बारची तोडफोड आणि दरोडा टाकल्याप्रकरणी नऊ जणांना सोमवारी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. आरोपींनी लाठ्या आणि शस्त्रे घेऊन बारमध्ये घुसून हाणामारी केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
07:41 March 21
नितीन गडकरींबाबत सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणात गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबाबत सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणे एका व्यक्तीला भोवले आहे. नागपूर पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
07:15 March 21
अॅमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपात, मंदीची लाट?
अॅमेझॉनमध्ये पुन्हा नोकर कपात होणार असल्याने कॉर्पोरेट जगतात चिंता निर्माण झाली आहे. जागतिक मंदीची लाट येत असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.
07:13 March 21
ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांनी भारतीय समुदायाच्या नेत्यांची घेतली बैठक
ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि उपउच्चायुक्त सुजित घोष यांनी रविवारी उच्चायुक्तालयावरील हल्ल्यासंदर्भात संबंधित भारतीय समुदायाच्या नेत्यांची इंडिया हाऊस येथे बैठक घेतली. खलिस्तान समर्थकांनी भारतीय दुतावासामधील भारताचा ध्वज काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने याविषयी ब्रिटन सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे.
06:44 March 21
अनिल जयसिंघानी आणि अनिक्षाला आज कोर्टात हजर करण्यात येणार
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षाला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पत्नीलाचा ब्लॅकमेलिंग केल्याने हे प्रकरण देशभरात चर्चेत आले आहे.
06:35 March 21
Maharashtra Breaking News : राज्यातील तब्बल 35 टक्के जंगल हे एकटे चंद्रपूर जिल्ह्यात, आज होतोय जागतिक वन दिवस साजरा
मुंबई : पर्यावरणाला वाचविण्यासाठीचे सर्वात मोठे आव्हान जगासमोर उभे टाकले आहे. दरवर्षी जगातील वनक्षेत्रात मोठी घट होत चालली आहे. यामुळे मानवी अस्तित्वासमोर मोठया समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण बदल, जागतिक तापमानात वाढ, कार्बन उत्सर्जन, प्रदूषण अशा अनेक समस्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे वनसंवर्धनाबाबत जागृती आणि प्रसार व्हावा या उद्देशाने 21 मार्च रोजी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक वन समृद्धी चंद्रपूर जिल्ह्याला लाभली आहे. राज्यातील तब्बल 35 टक्के जंगल हे एकटे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. मात्र या जंगलाचे देखील आता विघटन सुरू झाले आहे.