ETV Bharat / state

Breaking News Live : दारू पिऊनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केली, अविनाश जाधव यांचा आरोप - Etv Bharat Marathi news

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 8, 2022, 6:38 AM IST

Updated : Nov 8, 2022, 9:41 PM IST

21:40 November 08

दारू पिऊनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रेक्षकांना मारहाण केली, अविनाश जाधव यांचा आरोप

ठाणे - हर हर महादेव सिनेमाच्या वेळी आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दारू पिऊन प्रेक्षकांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.

21:13 November 08

मुंबई पोलिसांनी कॉमेडियन वीर दास, नेटफ्लिक्सविरुद्ध नोंदवला एफआयआर

मुंबई : एका निर्मात्याच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी स्टँड-अप कॉमेडियन वीर दास, इतर दोन व्यक्ती आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix विरुद्ध कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. प्रसिद्ध थिएटर निर्माते अश्विन गिडवाणी यांनी त्यांच्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, ऑक्टोबर 2010 मध्ये त्यांच्या कंपनीने वीर यांच्याशी एक शो तयार करण्यासाठी करार केला होता.

20:01 November 08

५० खोके बोलणार तर नोटीस धाडणार, शिंदे गट आक्रमक

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटावर ५० खोकेचा आरोप करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यात याची चर्चा आहे. सततच्या आरोपामुळे शिंदे गटाची प्रतिमा डागाळत असल्याने शिंदे गटाकडून मानहानीची कायदेशीर नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

19:59 November 08

विधवेला पतीच्या इंशुरन्सचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने 64 लाखाला लुटले

नवी मुंबई - मराठी भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेत अमराठी विधवेला पतीचे इन्शुरन्सचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने 64 लाखाला लुटण्यात आले आहे. किरण रवी, भास्कर शंकर लांडगे, निखिल संजय थोरवे आणि सॅम्युअल विजय संपत अशी या चार आरोपींची नावे आहेत. 18 ऑगस्ट 2022 रोजी वाशी पोलीस ठाण्यात या आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

19:19 November 08

राज्यातील सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई - आज सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या मंत्र्यांना वाय + बरोबरच एस्कॉर्ट सुरक्षा प्रदान करण्यात येईल. सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे.

18:39 November 08

सिलेंडर स्फोटात ५ जण जखमी, ४० ते ४५ वाहने जळून राख

मुंबई - विलेपार्ले येथे आज सकाळी सिलेंडर स्फोटामुळे ५ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आज पुन्हा याच विभागात आग लागली आहे. विलेपार्ले पूर्व येथील पश्चिम दृतगती मार्गावर अंधेरी पार्ले पुलाखाली सहारा हॉटेल येथे उभी असलेली ४० ते ४५ वाहने आगीत जळून राख झाली आहेत. यात भंगाराच्या आणि आरटीओने पकडलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

18:09 November 08

मनसेकडून हर हर महादेवच्या खास शोचे आयोजन

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसने काल हर हर महादेव चित्रपटात गोंधळ घातल्यानंतर आज मनसे कडून खास शोचे आयोजन केले आहे. नागरिकांसाठी हर हर महादेव चित्रपटाचा विशेष शो ठेवण्यात आला आहे. अमेय खोपकर या चित्रपटाला उपस्थित असणार आहेत.

17:27 November 08

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही - सुप्रिया सुळे यांची सत्तार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

मुंबई - मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर आता खा. सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काही ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले. याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.

16:52 November 08

भंगार वाहून नेणाऱ्या वाहनाला आग

मुंबई - विलेपार्ले पूर्व सहारा हॉटेल येथे पश्चिम दृतगती मार्गावर एका भंगार वाहून नेणाऱ्या वाहनाला आग लागली आहे. मुंबई अग्निशमन दल घटनस्थळी रवाना झाले आहे.

16:39 November 08

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

नागपूर - ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षपदी द्वादशीवार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र निवडीच्यावेळी झालेल्या बैठकीत चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव पुढे आलेच नाही. त्यामुले अध्यक्षपदासाठी चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

15:34 November 08

रामदास कदम यांची जीभ घसरली, अनिल परब यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका

रत्नागिरी - एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची अनिल परबांबाबत बोलताना जीभ घसरली आहे. त्यामुळे आता रामदास कदम हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना परब यांच्याविषयी त्यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली. त्यांनी माझ्या मुलाला खूप त्रास दिला आहे, असे कदम म्हणाले. इतरही अर्वच्य भाषा वापरली. त्यावरुन वादंग पेटण्याची शक्यता आहे.

15:30 November 08

अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढत जोडेमारो आंदोलन

लातूर - कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढत जोडेमारो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचे लातूरात आज पडसाद उमटले.

15:21 November 08

सत्तार वक्तव्य प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, कारवाईची मागणी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

14:26 November 08

बाळासाहेबांची सून जयश्री कालेलकर-ठाकरेंचे निधन

मुंबई - दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची मोठी सून जयश्री कालेलकर-ठाकरेंचे आज सकाळी सात वाजता निधन झाले. सुप्रसिध्द मराठी नाटककार मधुसूदन कालेलकर यांची ती मुलगी. तर जयदेव ठाकरेंच्या त्या पहिली पत्नी होत्या.

13:01 November 08

सत्तार यांच्याविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात मुंबईत गुन्हे

मुंबई - मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण, अदिती नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक प्रमुख मेहबूब शेख आणि १५ पदाधिकाऱ्यांवर कफ परेड पीएस येथे आयपीसीच्या १४३ सह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

12:54 November 08

वादग्रस्त वक्तव्याचे बारामतीत तीव्र पडसाद, गाढवाला सत्तारांचे छायाचित्र लावून निदर्शने

बारामती - शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बारामतीत उमटले. सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. गाढवाला सत्तारांचे छायाचित्रे लावून निदर्शने करण्यात आली.

12:24 November 08

ज्ञानवापी मशिदीच्या आवारात शिवलिंग पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलली

वाराणसी (उत्तर प्रदेश) - वाराणसीतील एका जलदगती न्यायालयाने मंगळवारी हिंदू बाजूने दावा केलेल्या 'शिवलिंग'ची पूजा करण्याच्या याचिकेवरील प्रकरणाची सुनावणी १४ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. संबंधित न्यायाधीश आज फास्ट ट्रॅक कोर्टात बसणार नसल्याने या प्रकरणाची सुनावणी १४ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.

12:18 November 08

परंडा शहरात मराठा आरक्षण महामोर्चा

उस्मानाबाद - मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह परंडा शहरात मराठा आरक्षण महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मराठा महामोर्चाला छत्रपती संभाजी महाराज चौक परंडा इथून सुरुवात झाली आहे. तर कोटला मैदान परंडा येथे मोर्चाची सभा होणार आहे.

11:44 November 08

साडेपाच लाखांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या

लातूर - शहराच्या विविध भागात रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या पाठीमागून येऊन दमदाटी करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या तिघांना लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. तीनही आरोपी 20-25 वर्ष वयोगटातील आहेत. त्यांची नावे प्रफुल प्रकाश पवार (वय 23 वर्ष, रा. गिरवलकर नगर,लातूर), विशाल विष्णू जाधव (वय 26 वर्ष,रा.पंचवटी नगर, लातूर), महेश नामदेवराव नरहारे (वय 20 वर्ष,रा.महाळग्रा, ता.चाकूर) अशी आहेत.

11:17 November 08

काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील केरळ येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी नागपूर येथून नांदेडला गेलेले काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

11:14 November 08

पुल दुर्घटनेने गुजरातच्या नावाला लाज आणली, पी चिंदबरम यांची टीका

पुल दुर्घटनेने गुजरातच्या नावाला लाज आणली आहे. सगळ्यात धक्कादायक घटना म्हणजे या दुर्घटनेबद्दल सरकारच्यावतीने कोणीही माफी मागितलेली नाही. कोणीही जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला नाही, अशी टीका काँग्रेसचे खासदार पी चिदंबरम यांनी केली आहे.

10:20 November 08

भारत जोडो यात्रेला नांदेडमधून सुरुवात

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह नांदेड, महाराष्ट्र येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली.

10:14 November 08

राजनाथ सिंह यांनी लालकृष्ण आडवाणी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

10:04 November 08

लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंची घेतली भेट

सांगली येथे एका कार्यक्रमात लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

09:37 November 08

हर हर महादेव चित्रपटाबाबत न बोलण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना आदेश

हर हर महादेव चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मनसेच्या सर्व प्रवक्त्यांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत. चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्रकरणाला राष्ट्रवादीकडून जातीय रंग दिला जात असल्याने काहीच न बोलण्याची भूमिका घेण्यात आल्याची राजकीय चर्चा आहे.

चित्रपटाबाबत दिग्दर्शक अभिजित देशपांडेच भूमिका मांडणार

अभिजीत देशपांडे अकरा वाजता अंधेरीत घेणार पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेतून मांडणार आपली भूमिका

09:24 November 08

ठाणे खाडी पुलाजवळ अज्ञात व्यक्तींची दगडफेक

ठाणे खाडी पुलाजवळ रात्री ८.३५ च्या सुमारास रेल्वे हद्दीबाहेरून काही अज्ञात व्यक्तींनी लोकल ट्रेनवर दगडफेक केली. एका पुरुष प्रवाशाच्या नाकाला दगड लागल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. जीआरपी तपास करत आहे

08:59 November 08

भारत जोडा यात्रा सांगली शहरातील 2000 तरुण देगलूर गावात दाखल

सांगली शहरातील 2000 तरुण देगलूर गावात दाखल झाले आहेत. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर आज वान्नली गुरुद्वारापासून यात्रेचा प्रवास सुरु झाला आहे. आज अटकळी आणि शंकर नगर ठिकाणी मुक्कामी राहणार आहे.

08:35 November 08

शीर धडावेगळे करून फुटबॉलसारखे खेळल्याचा आरोप

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीचा दुर्गापुरात अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. क्रूरतेचा कळस आणि थरारक बाब म्हणजे आरोपींनी त्याचे शीर धडावेगळे केले आणि त्याचा फुटबॉलसारखा वापर करत खेळ करत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. महेश मेश्राम (वय 35) असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे होते. नुकताच तो कारागृहातुन सुटून बाहेर आला होता. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

08:20 November 08

उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री अनिल परब यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी राज्यमंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध आयपीसीच्या 420 आणि 34 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे दापोली पोलिसांनी म्हटले आहे.

08:07 November 08

भारताचा कर्णधार रोहित शर्मा किरकोळ जखमी

भारताचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान उजव्या हाताला मार लागल्याने अॅडलेडमध्ये फलंदाजीच्या सरावासाठी नेटवर परतला.

08:01 November 08

काँग्रेस नेहमीच आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल वाईट बोलते-भाजप नेत्याचा आरोप

काँग्रेस नेहमीच आपल्या प्राचीन संस्कृतीबद्दल वाईट बोलत असते. सतीश जारकीहोळी यांनी आपली प्राचीन संस्कृती बदनाम केली. ते अत्यंत निषेधार्ह आहे. लोक त्याला चोख उत्तर देतील. जर काँग्रेस त्यांच्या विधानाशी सहमत नसेल, तर त्यांनी ताबडतोब त्यांची हकालपट्टी करावी, असे कटका भाजप प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले.

07:24 November 08

इंडियन ऑईल डेपोजवळील प्लास्टिक कारखान्याला आग

बिहारमधील सपारा येथील इंडियन ऑईल डेपोपासून 800 मीटर अंतरावर असलेल्या एका प्लास्टिक कारखान्यात सोमवारी रात्री आग लागली. रात्री 8 च्या सुमारास सुरुवात झाली आणि अग्निशमन दलाने रात्री 10.30 च्या सुमारास विझवली. इंडियन ऑइल टर्मिनल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले

06:55 November 08

प्रेक्षकाला मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

हर हर महादेव सिनेमाचा शो बंद पाडल्यानंतर प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वर्तक नगर पोलिसांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

06:18 November 08

Breaking news काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू

रायगड : रायगड येथे वाळूने भरलेला डंपर एका ऑटो-रिक्षावर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन विद्यार्थ्यांसह चार जण ठार झाले, अशी माहिती उशिरा पोलिसांनी दिली. परीक्षा देऊन परतणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा चालकासह जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

Last Updated : Nov 8, 2022, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.