तेलंगणा सरकारने 30 ऑगस्ट रोजी राज्यातील केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेण्याचा आदेश जारी केला. कोणत्याही परिस्थितीत चौकशीसाठी प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर पूर्व संमती आवश्यक आहे.
Maharashtra Breaking News सीबीआयला चौकशी करण्यासाठी परवानगी बंधनकारक, तेलंगणा सरकारचा निर्णय - ईटीव्ही भारत महाराष्ट्र न्यूज
14:07 October 30
सीबीआयला चौकशी करण्यासाठी परवानगी बंधनकारक, तेलंगणा सरकारचा निर्णय
13:24 October 30
काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार-नाना पटोले
राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि सध्याचे राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे एक शिष्टमंडळ उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
12:51 October 30
भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र काँग्रेसकडून नियोजन सुरू, ज्येष्ठे नेते आज होणार राज्यात दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल आणि एचके पाटील हे राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या राज्यात आगमनाचे नियोजन करण्यासाठी आज महाराष्ट्रात येत आहेत. ही माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत दिली.
12:46 October 30
३२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाचा उत्तराखंडच्या संघावर दणदणीत विजय
फलटणमध्ये सुरू झालेल्या ३२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासह विदर्भाच्या मुलांनी आणि कोल्हापूरच्या मुले व मुलींच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांने उत्तराखंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवला. फलटणमध्ये घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झालेल्या ३२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासह विदर्भाच्या मुलांनी आणि कोल्हापूरच्या मुले व मुलींच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उत्तराखंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवला.
11:47 October 30
एसआरए घोटाळ्याची चौकशी व्हावी, किरीट सोमैय्या यांची पत्रकार परिषदेत मागणी
आर्थिक गुन्हे शाखेने पेडणेकरांची चौकशी करावी. एसआरए घोटाळ्याची चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी केली.
11:26 October 30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केवडियात या दोन पर्यटनस्थळांचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केवडियातील एकता नगर येथे भुलभुलैया गार्डन आणि मियावाकी फॉरेस्ट या दोन पर्यटन आकर्षणांचे उद्घाटन करणार आहेत.
10:43 October 30
जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ हजार तरुणांना सरकारी नोकरीची नियुक्ती पत्रे - पंतप्रधान
21 व्या शतकातील हे दशक जम्मू-काश्मीरच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे दशक आहे. मला आनंद आहे की जम्मू आणि काश्मीरमधील तरुण त्यांच्या राज्याच्या विकासासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. आज, जम्मू आणि काश्मीरमधील विविध सरकारी विभागांमध्ये काम करण्यासाठी 3,000 तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे दिली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. ते जम्मू आणि काश्मीर रोजगार मेळ्याला कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.
10:00 October 30
दिल्लीची चिंता नसेल तर त्यांनी पंजाबमध्ये जाऊन मुख्यमंत्री व्हावे-मनोज तिवारी
प्रदूषण वाढत असताना, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी छठपूजेच्या तयारीसाठी दिल्लीत राहायला हवे होते. त्याऐवजी ते गुजरातचा दौरा करत आहेत कारण त्यांना येथे भाविकांची सोय करायची नाही. जर त्यांना दिल्लीची चिंता नसेल तर त्यांनी पंजाबमध्ये जाऊन मुख्यमंत्री व्हावे, असे ईशान्य दिल्लीचे भाजप खासदार मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.
09:53 October 30
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या वादात मुख्यमंत्री मध्यस्थी करणार
सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातला वाद काही थांबताना दिसत नाही. आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेण्याचा आरोप केला होता. हा आरोप सिद्ध करावा याबाबतचे पुरावे सादर करावेत अन्यथा आपण कायदेशीर उत्तर देऊ असे आव्हान आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिले आहे.
09:15 October 30
आसाममध्ये 40 लाख रुपयांची दारू जप्त
29 ऑक्टोबर रोजी आसामच्या बिस्वनाथ जिल्ह्यात पोलिसांनी 40 लाख रुपयांची तस्करी केलेल्या दारूचे 810 कार्टून आणि दोन ट्रक जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटकही केली आहे.
08:49 October 30
नवीन दारू धोरणामुळे दिल्ली सरकारचे चे २५०० कोटी रुपयांचे नुकसान-भाजपचा आरोप
दिल्ली सरकारच्या नवीन दारू धोरणामुळे सरकारचे चे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी एका आरटीआय अर्जाचा हवाला दिला आहे.
08:12 October 30
पंतप्रधान मोदींचे एक भारत, श्रेष्ठ भारत तरुणामुळे पूर्ण होत आहे- उत्तराखंडचे मुख्यमंत्री
पंतप्रधान मोदींचे एक भारत, श्रेष्ठ भारत हे स्वप्न येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या युवकांमुळे पूर्ण होत आहे. उत्तराखंड पोलिसांनी आयोजित डेहराडून मॅरेथॉन 2022 मध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह बोलत होते.
07:52 October 30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या छठ पूजेच्या शुभेच्छा
छठ पूजेच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
07:40 October 30
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची पायाभरणी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील वडोदरा येथे C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची पायाभरणी करणार आहेत.
07:38 October 30
नातवाच्या वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींची शॉपिंग
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नातवांचा गोतावळा फार मोठा आहे. त्यापैकी एक नातू म्हणजे निनाद हा देखील आहे. निनादला वाढदिवसाचे हटके सरप्राईज गिफ्ट देण्याची आजोबांनी जय्यत तयारी केल्याचा फोटो समोर आला आहे. नितीन गडकरी मुंबईच्या दौऱ्यावर असताना निनादच्या वाढदिवसा निमित्ताने भरपूर शॉपिंग केली.
07:03 October 30
भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह तेलंगणातील गोल्लापल्ली येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली.
06:47 October 30
एलॉन मस्क ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये होणार कपात
गुरुवारी 44 अब्ज डॉलर अधिग्रहण करारकेल्यानंतर, एलोन मस्कने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली आहे. एलॉन मस्ककडून ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जाणार आहे.
06:33 October 30
दक्षिण कोरियामधील हॅलोविन चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 120 वर
इटावॉनमध्ये हॅलोविन चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 120 वर पोहोचली आहे, तर 100 जखमी झाले आहेत.
06:24 October 30
Maharashtra Breaking News सीबीआयला चौकशी करण्यासाठी परवानगी बंधनकारक, तेलंगणा सरकारचा निर्णय
मुंबई : माझी सलमान खानला खास विनंती आहे. तो आपल्या मित्राकडून अन्याय झालेल्या महिलांच्या दुर्दशेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. लोक तुम्हाला 'भाईजान' म्हणतात, तुम्ही आमच्या बाजूने भूमिका का घेऊ शकत नाही? आम्ही सलमान खानच्या घराबाहेर शांतपणे आंदोलन करू, असा इशारा मॉडेल शर्लिन चोप्राने दिला आहे. ( Maharashtra update news ) ( Maharashtra update news )