ETV Bharat / state

Breaking News Live : दिवाळीत दोन तरुणांवर काळाचा घाला; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi online news today

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Oct 26, 2022, 6:27 AM IST

Updated : Oct 26, 2022, 10:09 PM IST

22:08 October 26

दिवाळीत दोन तरुणांवर काळाचा घाला; टेम्पो-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

संगमनेर - तालुक्यातील पिंपळगाव देपा शिवारात छोटा हत्ती टेम्पो व दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण ठार झाले आहे. ही घटना बुधवारी ता.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. ओम राहूल पेंडभाजे( वय वर्षै १९ ) शुभम सदाश‍िव टेकुडे ( वय वर्षै१८) दोघे राहणार देवगिरीवस्ती साकूर ता.संगमनेर असे अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत.

21:06 October 26

आदित्य ठाकरे उद्या पुणे व नाशिक जिल्हा दौऱ्यावर

मुंबई - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे उद्या पुणे व नाशिक जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

19:43 October 26

काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी स्थापन केली 47 सदस्यीय सुकाणू समिती, शशी थरूर यांना स्थान नाही

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या 47 सदस्यीय सुकाणू समिती स्थापन केली आहे. शशी थरूर यांना मात्र त्यामध्ये स्थान नाही. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या महत्त्वपूर्ण निर्णयात बुधवारी 47 सदस्यीय सुकाणू समिती स्थापन केली. काँग्रेस कार्यकारिणी (CWC) च्या जागी ही समिती काम करेल. काँग्रेसने जारी केलेल्या यादीनुसार, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पॅनेलमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. ए के अँटोनी, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, अंबिका सोनी, अजय माकन, हरीश रावत, अभिषेक मनु सिंघवी असे इतर प्रमुख नेतेही पॅनेलचा भाग आहेत. या समितीमध्ये आनंद शर्मा यांचाही समावेश आहे. ते G-23 चा भाग होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या गटाने माजी प्रमुख सोनिया गांधी यांना संघटनात्मक फेरबदलासाठी पत्र लिहिले होते.

19:31 October 26

गरजूंना फक्त ६०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मुंबई - भारतीय रेल्वेमध्ये नोकरीसाठी गरजूंना अवघ्या ६०० रुपयात फिटनेस सर्टिफिकेट आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे बनवून देणाऱ्या टोळीचा मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. या दक्षता पथकाने एका दुकलीला मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

18:22 October 26

मुंबईत आज ८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही

मुंबई - मुंबईत आज ८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनाने शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. गेल्या काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. आज त्यात घट होऊन ७३८ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

18:17 October 26

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बघेरिया नुपूर कारखान्यात स्फोट

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बघेरिया (नुपूर )कारखान्यात स्फोट. घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल. स्फोटाचे कारण अस्पष्ट. जखमीना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल.

17:32 October 26

महिला आश्रमातून निघून गेलेल्या मुलीवर दोघांचा लैंगिक अत्याचार

मुंबई - मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे माटुंगा येथील महिला आश्रमातील १५ वर्षीय मुलीला नायर रुग्णालयात दाखल केले. तेथून कुणालाही काही न सांगता मुलगी निघून गेली. पुढे विकृतांच्या जाळ्यात अडकली आणि दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

17:10 October 26

विनायक निम्हण यांचेअचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे - माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निम्हण हे सुरवातीला शिवसेनेत होते. नंतर ते काँग्रेस पक्षात होते. परत ते शिवसेनेत गेले. दुपारी दोनच्या सुमारास विनायक निम्हण यांना हृदय विकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना पुण्यातील औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पाषाण स्मशानभूमीत आज रात्री नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

16:00 October 26

ग्लासमध्ये फटाका फोडणे जिवावर बेतले, लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू

धुळे - दिवाळीच्या दिवशीच सर्वत्र फटाके फोडून दिवाळीचा उत्सव सर्वजण आनंदात साजरा करीत असतानाच, धुळे शहरातील जुने धुळे परिसरात एका तेरा वर्षीय मुलाने फटाके फोडत असतानाच स्टीलच्या ग्लासमध्ये फटाका फोडला. फटाका फुटताच या ग्लासचे तुकडे होऊन या मुलाच्या शरीरामध्ये घुसले. त्यातच या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

15:33 October 26

अनिल देशमुख यांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव. अनिल देशमुख यांचा विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव. अनिल देशमुख यांच्या अर्जावर 9 नोव्हेंबर पर्यंत सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. उच्च न्यायालयाच्या सुट्टी कालीन एकल खंडपीठाच्या न्यायाधीश शर्मिला देशमुख यांचे सीबीआयला निर्देश. अनिल देशमुख यांच्यावतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली.

15:29 October 26

गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात गुप्त चर्चा

मुंबई - रामदास कदम यांनी घेतली गजानन कीर्तिकर यांची भेट. गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात बंद दाराआड चर्चा

15:13 October 26

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला हरवून आणि आयर्लंड विसाव्या सामन्यात विजयी

मेलबर्न - इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा आज २० वा सामना झाला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आयर्लंडने सामना पाच धावांनी जिंकला. पावसामुळे डकवर्थ लुईस नियम लावावा लागला. आयर्लंडने १९.२ षटकात १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४.३ षटकांत ५ बाद १०५ धावा खेळत असताना पाऊस आला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे इंग्लंड पाच धावांनी मागे राहिला.

14:59 October 26

मुलीला आयटम म्हणणे पडले महागात, कोर्टाने दिली दीड वर्षांची शिक्षा

महाराष्ट्र - मुलीला आयटम म्हणणे अखेर पडले महागात. दिंडोशी सत्र न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीची विनयभंग केल्याप्रकरणी मोहम्मद अबरार खान याला दिली दीड वर्षांची शिक्षा. तसेच केला 500 ​​रुपये दंडाची शिक्षा. आरोपी पीडितेची छेड काढायचा आणि तिला 'आयटम' म्हणायचा.

14:45 October 26

५० आमदारांना खरेच खोके' दिले का आता शिंदे फडणवीसांनी स्पष्ट करावे - बच्चू कडू

मुंबई - महाराष्ट्राच्या विकासाची खुंटलेली गती वाढवण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करुन राज्यातील ५० आमदारांनी स्वतःहून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी तर मंत्री असूनही त्याचा त्याग केला आणि शिंदेना समर्थन दिले. त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या ५० आमदारांवर खोके घेतल्याचे आरोप होत आहेत.

14:39 October 26

गुजरातमध्ये आरओ प्लांटच्या गोदामाला आग

वडोदरा - प्रतापनगर भागातील आरओ प्लांटच्या गोदामाला आग लागली आणि लगतच्या 4-5 दुकानांमध्ये पसरली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी हजर. आग विझवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी जखमीची नोंद नाही.

14:30 October 26

रशिया करणार आण्विक सामर्थ्याचा सराव

रशियाने आपल्या आण्विक सैन्याच्या वार्षिक सराव करण्याच्या योजनांबद्दल अमेरिकेला सूचित केले आहे.

14:24 October 26

छातीत कफ झाल्याने नवजात मुलाचा मृत्यू

छातीत कफ झाल्याने नवजात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पाटण तालुक्यातील नवारस्ता गावातून समोर आली आहे. मुलाचे अजून बारसेही झाले नव्हते. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे.

14:12 October 26

आयर्लंडकडून इंग्लंडचा 5 धावांनी पराभव

पावसामुळे आर्यलंडचा विजय सोपाला झाला. डीएलएस पद्धतीनुसार टी २० मध्ये आयर्लंडने इंग्लंडचा 5 धावांनी पराभव केला

13:24 October 26

​​ठाकरेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढली, अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद

मुंबई - शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची, या वादानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाने 11 लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र सादर केली. त्यापैकी आयोगाच्या विहित नमुन्यात निरुपयोगी ठरलेली सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने बाद ठरवली आहेत. उर्वरित ठाकरे गटाची साडेआठ लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा असली तरी शिवसेना पक्षप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.

13:09 October 26

नाशिक - जवान संतोष गायकवाड यांना आसाममध्ये वीरमरण

नाशिक - जवान संतोष गायकवाड यांना आसाम मध्ये वीरमरण आले. देवळाली लहवितचे रहिवासी व तोफखाना केंद्राच्या 285 मिडीयम रेजिमेंटचे लान्सनायक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसामच्या लंका नावाच्या ठिकाणी कर्तव्य बजवताना वीरमरण आले. याबाबत सिक्कीम आर्टिलरी मिडीयम रेजिमेंटकडून नाशिक तोफखाना केंद्राला माहिती देण्यात आली आहे. मूळ गावी लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

12:46 October 26

केजरीवाल यांच्या राजकारणाचा उलटा प्रवास सुरू - संबित पात्रा

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाचा आता उलटा प्रवास सुरू झाल्याची टीका भाजपने केली आहे. प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे की, हे तेच केजरीवाल आहेत, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिरात जाण्यास नकार दिला होता. देव तेथे केलेल्या प्रार्थना स्वीकारणार नाही, असा दावा ते करत होते. तेच आता श्री गणेश आणि लक्ष्मीचा फोटो नोटांवर छापण्याचा सल्ला देत आहेत.

12:40 October 26

इंधनाच्या टँकरला भीषण आग, दोघांचा मृत्यू

खरगोन (मध्य प्रदेश) - बुधवारी बिस्तान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंजनगाव गावाजवळ इंधनाच्या टँकरला भीषण आग लागली. यात दोघांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक लोक जखमी झाले. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमींच्यामध्ये काहीजण गंभीर आहेत.

12:29 October 26

काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नवी दिल्ली - काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी देशभरातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदांचे राजीनामे दिले आहेत. सर्व CWC सदस्य, AICC सरचिटणीस आणि प्रभारींनी काँग्रेस अध्यक्षांना त्यांचे राजीनामे दिले आहेत. काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. ते यापुढील नेमणुका करतील.

11:50 October 26

काँग्रेस देशात लोकशाही जागी ठेवण्यासाठी कार्यरत राहील - मल्लिकार्जुन खरगे

नवी दिल्ली - नव्या भारतात भूक, प्रदूषण वाढत आहे पण रुपया घसरत आहे. सरकार झोपले आहे पण CBI, ED, IT 24 तास काम करत आहेत. नवीन भारतात गोडसेला देशभक्त आणि महात्मा गांधींना देशद्रोही म्हटले जाते. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान आणायचे आहे. मात्र काँग्रेस देशात लोकशाही जागी ठेवण्यासाठी कार्यरत राहील असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला. त्यानंतर ते बोलत होते.

11:08 October 26

भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम

तेलंगणातील भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार आनंद भास्कर रापोलू यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गेल्या 4 वर्षांपासून, मला राष्ट्रीय भूमिकेत दुर्लक्षित केले गेले, अपमानित केले गेले, कमी लेखले गेले आणि वगळण्यात आले, असा त्यांनी आरोप केला.

10:58 October 26

६० लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक, २७ लाखांची रोकड केली जप्त

आठ दिवसांपूर्वी नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हनी कार्तीक अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका भाजी व्यावसायिकाच्या घरातून साठ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडली आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे 27 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा फिर्यादीच्या दुकानात कामाला आहे. अटक आरोपींमध्ये मिथिलेश माखनसिंग मानकुर, भूपेश रमेश डोंगरे, आशिष उर्फ डेम्बो भीमराव भैसारे या तीन चोरट्यांचा समावेश आहे

10:38 October 26

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला ठोठावला 936.44 कोटी रुपयांचा दंड

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने गुगलला प्ले स्टोअर धोरणांच्या संदर्भात त्याच्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल 936.44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने गुगलला निर्धारित वेळेत त्याचे आचरण सुधारण्याचे निर्देश दिले.

10:23 October 26

उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांविरोधात सोशल मीडियात अपमानास्पद शब्द वापरल्याने गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल मुंबईतील समता नगर पीएस येथे प्रदीप भालेकर नावाच्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी शोध सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

10:13 October 26

महिलेसह दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झरंडी व गावंडगाव येथे महिलेसह दोन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी घडली. बाबुसिंग हंजारी चव्हाण (वय 55 वर्ष, रा. झरंडी) आणि मैनाबाई गजानन जाधव (45, रा. गावंडगाव) असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.

09:19 October 26

मालगाडीच्या ५३ वॅगन्स रुळावरून घसरल्या!

धनबाद विभागातील कोडरमा आणि मानपूर रेल्वे विभागादरम्यान गुरपा स्थानकावर आज सकाळी ६.२४ वाजता कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या ५३ वॅगन्स रुळावरून घसरल्या आहेत. परिणामी अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे पूर्व मध्य रेल्वेने म्हटले आहे.

09:17 October 26

दिवाळीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

कुपवाडा येथील नियंत्रण रेषेजवळील सुदपोरा येथे पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.

08:58 October 26

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात तणावाची स्थिती

कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. सीगेहट्टी आणि भरमप्पा नगर रोड येथे सोमवारी रात्री वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांवर 3 अज्ञातांनी हल्ला केल्याने तणावाचे वातावरण होते.

08:36 October 26

ग्लोबल हॉस्पिटलला 28 ऑक्टोबरपर्यंत इमारत रिकामी करण्याची नोटीस

प्रयागराज विकास प्राधिकरणाने ग्लोबल हॉस्पिटलला 28 ऑक्टोबरपर्यंत इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. प्राधिकरणाने इमारत बेकायदेशीर बांधलेली असल्याचे म्हटले आहे. डेंग्यूच्या रुग्णाला रक्तातील प्लेटलेट्सऐवजी फळांचा रस दिल्याचा आरोप रुग्णालयाने केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

08:27 October 26

भारतीय क्रिकेट संघ नाराज, काय घडले?

सिडनीमध्ये सरावानंतरच्या मेनूवर टीम इंडिया खूश नव्हती. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय खेळाडूंना त्यांच्या सराव सत्रानंतर गरम जेवण देण्यात आले नाही.

08:11 October 26

खरगे यांनी राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. खरगे आज काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

07:57 October 26

गेल्या सहा वर्षांपासून हे गाव आहे फटाके मुक्त गाव

सध्या सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. दिवाळीच्या सण म्हणले की, फराळ आणि फटाके हे समीकरण अनेक वर्षापासून जुळून आलेले आहे. फटाके फोडणे मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. परंतु पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावांमध्ये गेल्या सहा वर्षांपासून दिवाळी सणानिमित्त कोणतेही फटाके फोडले जात नाहीत. फटाके मुक्त गाव अशी या गावची ओळख झाली आहे

07:21 October 26

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष पदाचा आज कार्यभार स्वीकारणार

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बुधवारी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मुख्यालयात पदाचा कार्यभार स्वीकारतील. या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकारिणीचे सर्व सदस्य, खासदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि एआयसीसीच्या इतर पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

07:01 October 26

बाप्पाच्या दर्शनासाठी सारसबाग येथे भाविकांची मोठी गर्दी

पुणे : प्रत्येकाच्या मनाची आस जागवीत अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखविणारा दीपोत्सव हा सर्वाच्या मनामध्ये हर्ष आणि उल्हास घेऊन येतो, याची प्रचिती यंदाच्या दिवाळीमध्ये येत आहे. दीपावली म्हणजे प्रकाशाचा सण. अंधार दूर करणारी मिणमिणती पणती आणि आकाशाशी नाते जोडत प्रकाशमान करणारा आकाशकंदील अशा प्रकाशाच्या पारंपरिक आणि आधुनिक साधनांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला जातो.

06:29 October 26

पंढरपुरात गांधीगिरी करत ऊसतोड रोखली; संघर्ष समितीचे कार्यकर्ते आक्रमक

नुकतीच पंढरपूर येथे ऊस संघर्ष समितीच्या वतीने ऊस परिषद घेण्यात आली होती त्यामध्ये ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी व अंतिम दर हा 3100 मिळावा असा ठराव सर्वांच मंजूर करण्यात आला होता. कारखानदारांनी दर अजहर करेपर्यंत शेतकऱ्यांनी उसाला कोयता लावू देऊ नये असे आवाहन यावेळी ऊस म्हणजे वतीने करण्यात आले होते. परंतु पंढरपूर तालुक्यात कारखाने सुरू झाल्यामुळे काही ठिकाणी ऊसतोड सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरातील ऊसतोड ऊस संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी काल गांधीगिरी करत रोखली.

06:17 October 26

Breaking news रशिया करणार आण्विक सामर्थ्याचा सराव

मुंबई - वरळी परिसरातील रहिवासाने वाहतुकीचे नियम तोडल्याने वाहतूक पोलीस हवालदाराकडून आरोपी मोहम्मद शाकीर अन्सारी आणि अस्लम मेहंदी शेख या दोघांना सिंगल जवळ थांबवल्यामुळे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाला आरोपीकडून मारहाण करण्यात आल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी आरोपीला सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे.

Last Updated : Oct 26, 2022, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.