ETV Bharat / state

Breaking news भिवंडीत इमारतीची लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू - ईटीव्ही भारत महाराष्ट्र न्यूज

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 23, 2022, 6:27 AM IST

Updated : Nov 23, 2022, 7:32 PM IST

19:30 November 23

भिवंडीत इमारतीची लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू

ठाणे - भिवंडीतील मिल्लतनगर भागातील इमारतीची लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू. निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी केला तपास सुरू.

18:57 November 23

स्थळ पाहण्यासाठी जाताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 ठार

सोलापूर - स्थळ पाहण्यासाठी जाताना भीषण अपघात झाला आहे. यात इंडीमधील एकाच कुटुंबातील तीन जण ठार झालेत. तर चारजण जखमी झालेत. कर्नाटकातील इंडी (जि. विजयपूर) गावावर शोककळा पसरली आहे.

18:39 November 23

बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा इमारत उभारणाऱ्या 5 बांधकाम व्यवसायिकांना अटक

ठाणे - महारेरासह केडीएमसीची बनावट कागदपत्रे तयार करून बेकायदा इमारत उभारणाऱ्या 5 बांधकाम व्यवसायिकांना अटक.

17:20 November 23

शंभर कोटी कथित प्रकरण - कुंदन शिंदे यांच्या जामीन अर्जावर 8 डिसेंबरला सुनावणी

मुंबई - शंभर कोटी कथित वसुली मनी लॉन्ड्रीग प्रकरणात कुंदन शिंदे यांच्या जामीन अर्जावर 8 डिसेंबर रोजी सुनावणी होईल. कुंदन शिंदे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात दाखल केला होता अर्ज. कुंदन शिंदे यांच्या जामीनाला सीबीआयचा विरोध आहे. या प्रकरणात यापूर्वी अनिल देशमुख यांचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला होता.

17:17 November 23

अँटिलिया प्रकरणात रियाज काझीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई - अँटिलिया प्रकरणात रियाज काझीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. रियाझ हा सहाय्यक पोलीस निरीक्षक असून सचिन वाझे याचा सहकारी होता. जवळपास दीड वर्षांपासून रियाज काझी तुरुंगात आहे. रियाझ काझीतर्फे वकील युक्तिवाद युग चौधरी करत आहेत. रियाज काजी हा सचिन वाझेच्या अधिनस्थ काम करत होता.

16:46 November 23

हायकोर्टाने गर्लफ्रेंडवर बलात्कार करणाऱ्याला दिला जामीन. संमतीने कृत्य केल्याचे कोर्टाचे निरीक्षण

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने एका 22 वर्षीय तरुणाला जामीन मंजूर केला आहे. त्याला गेल्यावर्षी 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टाने असे निरीक्षण नोंदवले की, दोघेही नातेसंबंधात होते आणि पीडित मुलगी अल्पवयीन असली तरी, तिच्या कृत्याचे परिणाम समजण्यास सक्षम होती. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने 15 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात असेही नमूद केले आहे की, पीडितेने आरोपीसोबत स्वेच्छेने त्याच्या मावशीच्या ठिकाणी कथित कृत्य केले होते.

16:15 November 23

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले शिर्डी मंदिरात श्री साईबाबांचे दर्शन

शिर्डी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी मंदिरात श्री साईबाबांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.

15:59 November 23

EWS मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल

भोपाळ - मध्य प्रदेश काँग्रेसच्या एका नेत्याने EWS मुद्द्यांवर केंद्राचा निर्णय कायम ठेवल्याच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल

15:56 November 23

आदित्य ठाकरे प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतली तेजस्वी यादव यांची भेट

पाटणा - शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पाटणा येथील राबडीदेवी यांच्या निवासस्थानी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली.

15:45 November 23

राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्र सोडायचा आहे - अजित पवार यांचा दावा

मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या पदावरून मुक्त व्हायचे असल्याचे सांगितले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केला आहे. मात्र वरिष्ठ त्याना सोडत नाहीत असेही ते म्हणाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

15:35 November 23

पश्चिम बंगालमध्ये गोळीबार करून दोन कोटी लुटणाऱ्याला कल्याणमध्ये अटक

ठाणे - पश्चिम बंगालमध्ये गोळीबार करत एकाला गंभीर जखमी करून घरातील दोन कोटींचा ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोराला कल्याण रेल्वे स्थानकात अटक केली आहे. कल्याण पोलिसांनी ही माहिती दिली.

15:22 November 23

श्रद्धाच्या पत्रावर कारवाई का झाली नाही याची चौकशी करावी लागेल - देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाच्या पत्रासंदर्भात हे प्रकरण गांभिर्याने घेणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, मी ते पत्र पाहिले (2020 मध्ये श्रद्धाने पोलिसांकडे केलेली तक्रार) आणि त्यात खूप गंभीर आरोप आहेत. कारवाई का झाली नाही याची चौकशी करावी लागेल. मला कोणावरही आरोप करायचा नाही, पण अशा पत्रावर कारवाई झाली नाही तर अशा घटना घडतात असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

15:08 November 23

अभिनेते विक्रम गोखले त्यांची तब्येत खालावल्याचे वृत्त

पुणे - ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले त्यांची तब्येत खालावल्याचे वृत्त आहे. विक्रम गोखले यांच्यावर येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 15 दिवसापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

14:54 November 23

वसईत गोवरचा पहिला बळी

वसई - वसईत गोवरचा पहिला बळी. नालासोपारा पेल्हार परिसरातील 1 वर्षीय बालकाचा मृत्यू. पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क.

14:50 November 23

हिमाचल प्रदेश-गुजरातमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल - अनुराग ठाकूर

जयपूर - यूपी, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात ज्या पद्धतीने भाजपने विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. त्याच पद्धतीने हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. असा विश्वास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जयपूरमध्ये बोलत होते.

14:48 November 23

मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलांच्या जेवणामध्ये चक्क अळ्या

नांदेड - नायगाव येथील मागासवर्गीय वस्तीगृहातील मुलांच्या जेवणामध्ये चक्क अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार देण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणाला कंटाळून वसतिगृहातील मुलांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु तेथील अधिकाऱ्यांनी हा आमचा विभाग नाहीे. संबंधित विभागाकडे जाऊन तक्रार करा असे सांगितल्याने मुले तिथून निघून गेली. परंतु हा सर्व प्रकार पाहता सामाजिक न्याय विभाग आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

14:26 November 23

निफाड तालुक्यातील पहिली सीमा सुरक्षा दलातील जवान गायत्री जाधव यांचा अखेर मृत्यू

नाशिक - बथनाहा जिल्हा अररिया बिहार येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणारी देवगाव (ता.निफाड) येथील कु.गायत्री विठ्ठल जाधव ( वय 23) हिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. प्रशिक्षण घेत असताना तिचा खड्यात पडून अपघात झाला होता.

14:07 November 23

हवाई दल अधिकारी हत्या प्रकरण, यासिन मलिकसाठी प्रॉडक्शन वॉरंट जारी

मुंबई - भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याची हत्या प्रकरणी टाडा न्यायालयाने आज यासिन मलिकसाठी प्रॉडक्शन वॉरंट जारी केले. पुढील सुनावणीची तारीख 22 डिसेंबर आहे. सीबीआय वकील मोनिका कोहली यांनी ही माहिती दिली.

13:33 November 23

डेन्टल कॅालेजमधील तीन महत्त्वाच्या प्रकल्पांचे फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर - डेन्टल कॅालेजमधील तीन महत्त्वाचे प्रकल्प जनतेच्या सेवेत आजपासून सुरु केले. त्यात म्युकरमायकोसीस रिहॅबीलीटेशन सेंटर रुग्णांसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. म्युकरमायकोसीस आधी पुस्तकात वाचला जायचा एकही रुग्ण येत नव्हता. आता मात्र त्यावर उपचाराची गरज निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.

13:29 November 23

अनू कपूर यांच्या बँक खात्याची केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यास अटक

मुंबई - सिनेअभिनेते अनू कपूर यांच्या बँक खात्याची केवायसीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्ह्यातील आरोपीला दरभंगा बिहार येथून ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

13:14 November 23

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सहन करणार नाही - अजित पवार

मुंबई - मराठवाडा मुक्ती संग्रामचा कार्यक्रम मोठा व्हायला हवा होता, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडले आहे. पाचशे कोटींची मविआने तरतूद केली होती. मराठवाडा मुक्ती संग्रामचा परराज्यात कार्यक्रम झाला. नवीन पिढीला मराठवाडा मुक्ती संग्राम काय हे समजले पाहिजे. कोणाचे योगदान आहे, या गोष्टी समोर यायला हव्यात. सांगलीमध्ये जत विभाग आहे. मंत्री प्रतिनिधीत्व करतात. यात आम्ही सगळे दोषी आहोत, इथल्या पालकांना मराठी शाळेत घातले गेले पाहिजे होते, तसे झाले नाही, त्यामुळे काही बाबींचा गांभिर्याने विचार व्हायला पाहिजे असेही पवार म्हणाले. त्याचवेळी आपल्याजवळ असलेले खेचायचा प्रयत्न कर्नाटक करत आहे. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य सहन करणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांनी काय निर्णय घेणार हे स्पष्ट करावे अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

12:57 November 23

गुजरात निवडणुकीत महाराष्ट्रत सुट्टी हा चुकीचा पायंडा - अजित पवार

मुंबई - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यसरकाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, शेजारच्या राज्यात निवडणूक असल्याने महाराष्ट्रला सुट्टी हा नवीन चुकीचा पायंडा पडत आहे. लोकसभा निवडणूक असताना एकवेळ समजू शकतो, पण पहिल्यांदाच अशी सुट्टी दिली आहे. पगारी सुट्टी देण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. जनतेचा पैसा यामध्ये जातो हे योग्य नाही असे ते म्हणाले.

12:38 November 23

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला निषेध

मुंबई - सीमावादात बेळगाव प्रश्नी कर्नाटक सरकार आग लावण्याचा प्रयत्न करत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत पंतप्रधान व गृहमंत्र्यांना सीमाप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार असल्याचे ठरले आहे. चाळीस गावे काय चाळीस इंच जमीनसुद्धा कर्नाटकला महाराष्ट्राची देणार नाही. तेथील जनतेशी जाऊन चर्चा करणार, यासाठी योग्य ती पावले उचलण्यासाठी सरकारसोबत चर्चा करू, असे दानवे म्हणाले. मेहबुबा मुफ्तींसोबत भेटणाऱ्या व बसणाऱ्यांनी शिवसेनेला राजनीती शिकवू नये. तेजस्वी यादव व शिवसेना नेते आदित्य ठाकरे या दोन्ही तरुण नेतृत्वांच्या भेटीचे स्वागत केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

12:31 November 23

बिहारचे उपमुख्यमंत्री चांगले काम करत आहेत - आदित्य ठाकरे

मुंबई - आदित्य ठाकरे यांनी बिहारला जाण्यापूर्वी आज स्पष्ट केले की, तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर आहे. मी आणि तिथले उपमुख्यमंत्री एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. तसेच माझा काही अजेंडा नाही. आम्ही फोनवर बोलत होतो. आम्ही सत्तेत ते विरोधात असताना अनेकवेळा बोलणे झाले होते. आज प्रत्यक्ष भेटणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

12:26 November 23

यंदा शिवप्रतापदिन पारंपरिक आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा होणार

सातारा - यंदाचा शिवप्रतापदिन जिल्हा प्रशासनाच्यावतीने पारंपरिक आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रतापगडावर जरीकाठी भगवा फडकविण्यात येणार आहे. तसेच मर्दानी खेळ, लेझीम ढोलपथके, पोवाडा या पारंपरिक कार्यक्रमांसोबतच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

12:18 November 23

मुंढवात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा व्हिडिओ व्हायरल

पुणे - शहरातील मुंढवात गाड्यांची तोडफोड करत नागरिकांना मारहाण करणाऱ्या गुंडाच्या टोळक्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल. केशवनगर परिसरातील व्यापाऱ्यांना मारहाण करत गाड्यांची तोडफोड करून दहा ते पंधरा जणांचं टोळके परवा रात्री धुमाकूळ घातल होते. टोळक्याने पीएमपीएल बस, एक मिनी बस, चारचाकी कार आणि इतर गाड्यांची तोडफोड करत हवेत कोयते फिरवून परिसरात दहशत माजवली होती. दहशत करत तोडफोड केल्याप्रकरणी काही आरोपीना मुंढवा पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

12:14 November 23

कळमनामधील मिरची बाजारातील एका यार्डला पहाटे आग

नागपूर - कळमनामधील मिरची बाजारातील एका यार्डला पहाटे 2.15 वाजता आग लागली. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडते व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

12:10 November 23

व्हर्जिनिया वॉलमार्टमध्ये झालेल्या गोळीबारात अनेकांचा मृत्यू

मंगळवारी रात्री व्हर्जिनिया वॉलमार्टमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक लोक मरण पावले आणि इतर जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचा विश्वास आहे की एक शूटर होता, त्याचाही मृत्यू झाला आहे. चेसापीक पोलिस प्रवक्ता एमपीओ लिओ कोसिंस्की यांनी ही माहिती दिली.

11:19 November 23

मुख्यमंत्र्यांनी अचानक सर्व बैठका पुढे ढकलल्या

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आज विविध बैठकांचे नियोजन केले होते. मात्र, अचानक या बैठका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

11:11 November 23

आफताब पुुनावाला कुटुंबाची होऊ शकते पोलीस चौकशी

आफताब पूनावाला यांचे कुटुंब दिल्लीत आहे. त्यांचे जबाब नोंदवले. कुटुंबाबाबत समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे त्यांची पुन्हा चौकशी होऊ शकते. 2020 मध्ये श्रद्धाने मुंबईत तक्रार दाखल केली होती की त्याच्या कुटुंबाला माहित आहे की आफताब श्रद्धाला मारायचा.

09:46 November 23

केंद्र सरकारकडून दर महिन्याला सरासरी 15 ते 16 लाख नोकऱ्या

केंद्र सरकारकडून दर महिन्याला सरासरी 15-16 लाख नोकऱ्या निर्माण होत आहेत, असा दावा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. ते अजमेर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या रोजगार मेळाव्यात बोलत होते.

09:25 November 23

तेल कारखान्यात आग, कर्मचाऱ्यांना बाहेर काढले सुखरुप

तेल कारखान्यात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या 6 बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारण तपासले जाईल, असे बिलासपूरचे सीएसपी पूजा कुमार यांनी म्हटले.

09:24 November 23

पत्नी नांदायला येत नसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

पनवेल - पत्नी नांदायला येत नसल्याने तिच्या विरहापोटी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पनवेल तालुक्यातील आजीवाली गावात ही घटना घडली असून दत्तात्रय सुरेश धायगुडे असे या 40 वर्षीय सपोनिचे नाव आहे. दत्तात्रय धायगुडे हे नवी मुंबई महापे येथे सपोनि पदावर कार्यरत होते.

08:26 November 23

भावना गवळी आणि विनायक राऊत यांच्यासमोरच ने ५० खोके आणि गद्दारच्या घोषणा

शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे दोघेही जेव्हा एकाचवेळी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचले. तेव्हा उद्धव ठाकरे गटाने ५० खोके आणि गद्दार असल्याच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला.

07:48 November 23

अरुणाचल प्रदेशच्या बसरपासून 58 किमी भूकंप

आज सकाळी 07:01 वाजता अरुणाचल प्रदेशच्या बसरपासून 58 किमी उत्तर-पश्चिम-उत्तर भागात 3.8 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 10 किमी होती.

07:47 November 23

मँचेस्टर युनायटेडचा क्लब विक्रीस उपलब्ध, ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोडला क्लब

मँचेस्टर युनायटेडच्या अमेरिकन मालकांचे म्हणणे आहे की ते क्लब विकण्यास तयार आहेत. क्लबने असेही उघड केले की स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने तात्काळ प्रभावाने क्लब सोडला आहेय

07:45 November 23

बुर्किना फासो येथे झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार

पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो येथे झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये किमान 14 जण ठार झाले आहेत.

07:12 November 23

गिनीच्या आखातातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताचा पाठिंबा

गिनीच्या आखातातील सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पाठिंबा दर्शविला आहे.

07:11 November 23

दिल्लीत एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या, आरोपीला अटक

पालम परिसरात दोन बहिणी, त्यांचे वडील आणि आजी यांच्यासह एकाच कुटुंबातील चार जणांची घरात भोसकून हत्या करण्यात आली. आरोपीला अटक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

06:29 November 23

गोवा पर्यटन विभागाने युवराज सिंगला बजावली नोटीस

गोवा पर्यटन विभागाने मंगळवारी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला नोटीस बजावली. वरचावाडा, मोरजिम येथे असलेल्या त्याच्या व्हिलाची विभागाकडे नोंदणी न केल्याबद्दल पर्यटन व्यापार कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केल्याचे गोवा पर्यटन विभागाने म्हटले आहे.

06:28 November 23

नाशिकपासून ८९ किमी अंतरावर पहाटे भूकंप

आज पहाटे 04:04 वाजता महाराष्ट्रातील नाशिकपासून पश्चिमेला 89 किमी अंतरावर 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 5 किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे.

06:20 November 23

Maharashtra Breaking news मुख्यमंत्र्यांनी अचानक सर्व बैठका पुढे ढकलल्या

मुंबई : मंगळवारी रात्री दहा वाजता दोन केनियन महिला श्रीमती देका मोहम्मद अजीज वय 43, होडान जेमाॅक मुरसई वय 43 या व्यापाराच्या निमित्ताने कुलाबा पोलिस ठाणे हद्दीत आल्या होत्या. टॅक्सीतून उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की त्यांच्याकडील 15 लाख रुपये रोख रक्कम त्या टॅक्सीत विसरलेले आहेत. त्यांनी कुलाबा पोलिस ठाणेस संपर्क साधताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर, कांडेकर व पो उप निरीक्षक जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टॅक्सी MH 01 CJ 3596 शोधली. त्या आधारे टॅक्सी ड्रायव्हर त्रिभुवन भुल्लन गौंडचा काळबादेवी परिसरात शोध घेतला आणि त्याच्याकडून 15 लाख रुपयांची बॅग हस्तगत केलेली आहे. ही कामगिरी कुलाबा पोलीस स्टेशनचे रात्रपाळी पर्यवेक्षक सपोनी पेठकर , सपोनी कांडेकर ठाणे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक विशाल जाधव एसआय सागवेंकर व गुन्हे प्रकटीकरण पथकाने पार पाडलेली आहे.

Last Updated : Nov 23, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.