सांगली : इस्लामपूर येथे एक 80 वर्षांच्या वृद्धाचा खून (Old Man Murder) करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खुनाच्या घटनेनंतर गळफास लावून आत्महत्येचा बनाव (show faked suicide by hanging) केल्याचा समोर आला आहे. याप्रकारे इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून नेमका हा खून कोणी आणि कोणत्या कारणातून केला हे आद्यप समजू शकले नाही. Latest news from Sangli, Sangli Crime
Breaking News Live : 80 वर्षांच्या वृद्धाचा खून करत गळफास लावून आत्महत्येचा बनाव - ईटीव्ही भारत महाराष्ट्र न्यूज
22:25 November 14
80 वर्षांच्या वृद्धाचा खून करत गळफास लावून आत्महत्येचा बनाव
21:32 November 14
रेल्वेचे इंजिन रूळावरून घसरले, पलूसच्या वसगडे येथील घटना
सांगली - मिरज-पुणे रेल्वे मार्गावर सांगलीच्या वसगडे या ठिकाणी रुळावरून रेल्वे इंजिन घसरल्याचा प्रकार घडलेला आहे. सध्या पुणे- मिरज- लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच दुहेरीकरणासाठी विद्युत केबल कामासाठी आलेल्या इंजिनचे चाक अचानकपणे रुळावरून घसरले आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे, मात्र, यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झालेली नाही.
20:21 November 14
उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई -उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधातील कथित खंडणीप्रकरणी एफआयआर नोंदवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचे निर्देश द्या अशी मागणी करणारी याचिका सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
19:10 November 14
जितेंद्र आव्हाड यांना निर्णय देईपर्यंत अटक करु नये, ठाणे कोर्टाचे पोलिसांना आदेश
मुंबई - कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना उद्या सकाळी कोर्ट निर्णय देईपर्यंत अटक करु नये असे आदेश पोलिसांना दिले आहेत. आव्हाड यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर कोर्टाने हे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यांच्या अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता कोर्टात सुनावणी होईल.
18:38 November 14
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुजरात निवडणुकीत मोठी जबाबदारी
सातारा - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर गुजरात निवडणुकीत मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काँग्रेसकडून त्यांच्यावर प्रचारासह बडोदा आणि अहमदाबाद विभागाचे निरीक्षक म्हणून पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे.
18:32 November 14
शिवसेनेचे नाव, चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाचा दिल्ली उच्च न्यायालयात आक्षेप
नवी दिल्ली - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या (EC) निर्णयामुळे त्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने उपस्थित राहून न्यायालयाला सांगितले की, निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रथमदर्शनी खटल्याशिवाय आणि प्रकरणाच्या टिकावूपणावर कोणतीही चर्चा न करता हा आदेश दिला, असा आरोप यावेळी वकिलांनी केला.
18:01 November 14
भेकर-चौसिंगा शिकार प्रकरणी आसाम रायफलच्या जवानासह तिघांना अटक
सातारा - साताऱ्यातील ठोसेघर परिसरात सिंगल बोअर बंदुकीने भेकर आणि चौसिंगा वन्यप्राण्यांची शिकार करण्यात आली आहे. याप्रकरणी आसाम रायफल रेजिमेंटच्या जवानासह तिघांना वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन बंदूका, एक एअरगन आणि एक सिंगल बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, चाकू, कोयता, मांस जप्त केले आहे.
16:55 November 14
वार्षिक घाऊक महागाई निर्देशांक घसरला, महागाई दर 8.39 वर
नवी दिल्ली - देशातील घाऊक मालाची महागाई कमी झाली आहे. ती दोन आकडीवरुन एक आकडीवर आली आहे. अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकानुसार (WPI) महागाईचा वार्षिक दर ऑक्टोबर 2022 साठी 8.39% नोंदवला गेला. हा दर सप्टेंबर 2022 मध्ये 10.70% नोंदवला गेला होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही माहिती दिली.
16:40 November 14
श्रद्धा हत्येप्रकरणी महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस
नवी दिल्ली - श्रद्धा हत्येप्रकरणी महिला आयोगाची दिल्ली पोलिसांना नोटीस. दिल्लीच्या मेहरौली येथे श्रद्धाच्या निर्घृण हत्येची DCW ने स्वतःहून दखल घेतली आहे. ही मुलगी तिच्या मित्रासोबत एका फ्लॅटमध्ये राहात होती.
16:06 November 14
दादर फुल मार्केटमधील व्यावसायिकांना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा
मुंबई - दादर फुल मार्केटमधील व्यावसायिकांना हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. 5 डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे पालिकेला निर्देश दिले आहेत. तक्रारीवरून बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची तयारी केलेल्या पालिकेच्या कारवाईला हायकोर्टाने स्थगिती दिली. गेली अनेक दशके व्यावसायिक तिथेच व्यवसाय करत आहेत. कोणत्याही नोटीशीविना थेट कारवाई करणे चुकीच असा दावा फुल विक्रेत्यांनी हायकोर्टात केला.
16:06 November 14
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शन सक्तीचे नाही - हायकोर्ट
मुंबई - नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शन सक्तीचे नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे. देवस्थानाचा निर्णय चुकीचा कसा, हे पटवून देण्याचे याचिकाकर्त्यांना हायकोर्टाकडून निर्देश. जवळून आणि जलद दर्शनाकरता 200 रूपये शुल्क आकारण्याविरोधात माजी विश्वस्त हायकोर्टात
16:03 November 14
व्हर्जिनिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोळीबार, तीन जणांचा मृत्यू
व्हर्जिनिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. व्हर्जिनिया विद्यापीठाच्या पोलिस विभागाच्या हवाल्याने हे वृत्त हाती आले आहे.
15:49 November 14
सक्तीचे धर्मांतर करणे अतिशय गंभीर - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सक्तीचे धर्मांतर करणे ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. त्यामुळे धर्माच्या संबंधात नागरिकांच्या विवेक स्वातंत्र्यासह देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. फसव्या धर्मांतरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. तसेच केंद्राला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. SC या प्रकरणाची सुनावणी 28 नोव्हेंबरला ठेवणार आहे.
15:10 November 14
३५४ कलमाखाली गुन्हा दाखल केला गेल्याने अत्यंत दुःखी - जितेंद्र आव्हाड
मुंबई - पोलिसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटे गुन्हा दाखल केले. त्यात ३५४ कलमाखाली गुन्हा दाखल केला गेल्याने अत्यंत दुःखी झाल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मी ह्या पोलिसी आत्याचाराविरुद्ध लढणार असेही त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे असेही त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत असेही म्हणाले आहेत.
15:03 November 14
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला - जयंत पाटील
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. विनयभंग प्रकरण आणि हर हर महादेव प्रकरणावरुन झालेली अटक यानंतर उद्विग्न झालेल्या आव्हाड यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते.
14:57 November 14
अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत आग
मुंबई - अंधेरी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.
14:44 November 14
मराठी भाषेतील तंत्रशिक्षण पदविका आणि पदवीधर अभियांत्रिकी पुस्तकांचे प्रकाशन
मुंबई - केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण पदविका आणि पदवीधर अभियांत्रिकी पुस्तकांचे मराठी भाषेतील प्रकाशन करण्यात आले.
13:56 November 14
दूधगंगा नदीच्या पाण्यासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर
कोल्हापूर - दूधगंगा नदीच्या पाण्यासाठी हजारो शेतकरी रस्त्यावर. शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा. दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करणारी योजना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी. आरपारच्या लढाईचा शेतकऱ्यांचा इशारा. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.
13:44 November 14
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचे मुख्यमंत्र्यांना उपरोधिक पत्र
नाशिक - संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार. नाशिकच्या उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या. अन्य तीन सहकारी माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करेन. नाशिकमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांचे मुख्यमंत्र्यांना उपरोधिक पत्र.
13:06 November 14
सत्तार वक्तव्य प्रकरणी जया बच्चन यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी, माजी मंत्री फौजिया खान आक्रमक
मुंबई - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह अन्य समविचारी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या महिला शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली. यावेळी खा. जया बच्चन यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी, माजी मंत्री फौजिया खान आणि इतर महिला नेत्या उपस्थित होत्या.
12:39 November 14
नरेंद्र मोदी G 20 शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इंडोनेशियाला रवाना
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी इंडोनेशियातील बाली येथे रवाना झाले आहेत. त्यांनी निघण्यापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, विविध जागतिक नेत्यांशी विविध विषयांवर संवाद साधण्याची संधी मिळेल. मी एका सामुदायिक कार्यक्रमालाही संबोधित करणार आहे.
12:32 November 14
बोरिवलीत डंपरला दोन दुचाकींची जोरदार धडक, दोघे गंभीर
मुंबई - मुंबईतील बोरिवली येथे रात्री उशिरा भीषण अपघात झाला. येथे डंपर आणि दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकी डंपरखाली आल्या. त्यामुळे अपघाताचे गांभीर्य वाढले. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
12:26 November 14
अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन
प्रसिद्ध अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. रात्री 1 वाजता विले पार्लेमध्ये घरीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील हिंदू स्मशान भूमीत दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे.
12:18 November 14
भायखळ्यात ६ ते ७ झोपड्यांना आग
मुंबई - भायखळा येथील के के मार्ग लक्ष्मी रेसिडेन्सी, तबेला नंबर २ येथील ६ ते ७ झोपड्यांना आग लागली आहे. परिसरात आगीचा धूर पसरला असून ८ फायर इंजिन ७ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. यामध्ये कोणीही जखमी नाही.
12:08 November 14
मौलाना इरफान दौलत नदवी यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी
नाशिक - मौलाना इरफान दौलत नदवी यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. पीएफआयशी संबंध असल्याच्या संश्यावरून दहशतवादी विरोधी पथकाने केली अटक. मौलाना नदवी इमाम कोन्सिलचे अध्यक्ष आहेत.
12:05 November 14
जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये - अजित पवार
जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. आव्हाड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे. त्यावर पवार प्रतिक्रिया देत होते. दरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनीही राजीनामा हा काही पर्याय किंवा संबंधित घटनाक्रमावर उत्तर नाही असे म्हटले आहे. त्यांनीही आव्हाड यांना राजीनामा देऊ नये असे सांगितले आहे.
11:58 November 14
महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट
मुंबई - महिलांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या शिंदे सरकारमधील मंत्र्यांविरोधात महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची त्यांनी भेट घेतली आहे. महिलांचा अपमान सहन करणार नाही. महिलांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे ते म्हणालेत. आव्हाड प्रकरणात महिलेचा विनयभंग झाला नाही, असे त्यांचे मत आहे.
11:50 November 14
भाजप 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना शिंदे गटासोबत लढणार - बावनकुळे
मुंबई - भाजप 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना (शिंदे गट) सोबत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवेल. लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 हून अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही तयार आहोत. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे.
11:26 November 14
जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
जितेंद्र आव्हाड यांच्या नाद बंगल्याच्या बाहेर राज्य राखीव पोलीस दोन गाड्या भरून पोलीस आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा पोलीस कधीही अटक करू शकते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
10:05 November 14
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याच्या निषेधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांचा रास्ता रोको, रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
09:27 November 14
ज्ञानवापीच्या केसची आज होणार सुनावणी
ज्ञानवापी आवारात शिवलिंगाच्या पूजेचा हक्क मागणाऱ्या याचिकेवर वाराणसी न्यायालय आज निकाल देणार आहे.
08:32 November 14
अभिनेत्री कल्याणी कुरळे मृत्यू प्रकरणात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल
अभिनेत्री कल्याणी कुरळे हिचा 12 नोव्हेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी गावाजवळ सांगली कोल्हापूर महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ती दुचाकीवरून घरी जात असताना एका ट्रॅक्टरने तिला धडक दिली. आयपीसी आणि मोटार वाहन कायद्यानुसार एफआयआर नोंदविल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
07:50 November 14
जी २० परिषदेला आज शी जिनपिंग पोहोचणार
चिनी नेते शी जिनपिंग सोमवारी (14 नोव्हेंबर) इंडोनेशियातील बाली येथे G20 शिखर परिषदेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत बहुप्रतिक्षित बैठकीसाठी पोहोचतील. दोन्ही नेते तैवान, रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आणि उत्तर कोरियाच्या आण्विक महत्त्वाकांक्षा यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
07:20 November 14
एलॉन मस्कने वापरकर्त्यांची मागितली माफी
एलॉन मस्क यांनी घोषणा केली की ट्विटरवरील संस्था संबंधित खाती ओळखण्यास सक्षम असतील. अॅप "सुपर स्लो असल्याबद्दल मस्कने माफी मागितली आहे.
07:20 November 14
पहाटे अमृतसरजवळ भूकंप
आज पहाटे ३.४२ वाजता पंजाबमधील अमृतसरपासून पश्चिम-वायव्येला १४५ किमी अंतरावर ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली १२० किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे.
06:59 November 14
Maharashtra Breaking news जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह हिंगोली जिल्ह्यातून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली.