ETV Bharat / state

Breaking News देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त - Maharashtra latest news

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 1, 2022, 6:32 AM IST

Updated : Nov 1, 2022, 9:48 PM IST

21:44 November 01

देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त

दोघे मित्र गजाआड, डोंगरगाव येथे पोलिसांची संयुक्त कारवाई
यवतमाळ : गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन तरुणांना ताब्यात घेत कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून देशीकट्टा आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसद शहर पोलिसांनी 31 ऑक्टोबरला रात्री महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे केली. या कारवाईने अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

19:51 November 01

मुंबईतील ५८०० कोटीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांच्या निविदा प्रक्रिया रद्द

मुंबई - निविदांना मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे ५ हजार ८०० कोटी खर्चाच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांच्या निविदा प्रक्रिया रद्द. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबी समावेश करुन आणि गुणवत्तेशी तडजोड न करता जलद गतीने कामे होण्यासाठी नव्याने निविदा मागवणार. मुंबई पालिका प्रशासनाची माहिती.

19:29 November 01

शिना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी राहुल मुखर्जी वापरत होता 20 सिमकार्ड्स

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणात राहुल मुखर्जीची मुंबई सत्र न्यायालयात इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी उलट तपासणी घेतली. यावेळी राहुल मुखर्जी संदर्भात धक्कादाय खुलासा केला आहे. राहुल मुखर्जी यांनी विविध नावावर 20 सिमकार्ड्सचा वापर केल्याचा धक्कादायक आरोप पुराव्यासाहित इंद्राणीच्या वकिलांनी कोर्टात केला. उद्या पुन्हा इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांच्या वतीने राहुल मुखर्जी यांची उलट तपासणी करण्यात येणार आहे.

19:19 November 01

राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाचा शुभारंभ

मुंबई - राज्यपालांच्या हस्ते राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाचा शुभारंभ झाला. नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ रिचर्ड जे रॉबर्टस यांच्या उपस्थितीत एलफिस्टन तंत्र महाविद्यालयात कौशल्य विद्यापीठाचे उद्घाटन झाले. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा देखील यावेळी उपस्थित होते.

19:01 November 01

BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत प्रलंबित मुद्द्यांवर आवश्यक सर्व बाबींना मंजुरी - फडणवीस

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बीडीडी चाळीच्या कामाच्या प्रगतीचा व स्थितीचा आढावा घेतला. त्यात वरळी, नायगाव (दादर), लोअर परळमधील चाळींचा समावेश असून सुमारे १९५ चाळी आणि १५,५९३ घरे आहेत. प्रदीर्घ प्रलंबित असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अत्यंत तत्पर आणि जलद दृष्टीकोन घेऊन रहिवाशांचा त्रास लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितले. तसेच विभागांना चांगले अंतर्गत समन्वय ठेवण्यास सांगितले. प्रलंबित मुद्द्यांवर आवश्यक सर्व मंजुरी दिली.

18:46 November 01

मुंबईत चारचाकी वाहनातील प्रत्येकाला सीटबेल्ट अनिवार्य, उद्यापासून देणार समज

मुंबई - सुरक्षित प्रवासासाठी मुंबईकरांवर आज मंगळवारपासून वाहतुकीच्या आणखी एका नियमाची सक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच दुचाकीस्वारासह सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती करण्यात आली. चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर मंगळवारपासून दंडात्मक कारवाई न करता केवळ वाहतूक पोलिसांकडून कडक समज देण्यात येणार आहे.

18:28 November 01

शेतात आंतरपीक म्हणून लावलेली १४ लाखाची गांजाची झाडे जप्त, आरोपी फरार

धुळे - येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, शिरपूर ग्रामीण पोलीस या दोघांनी मिळून शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावात मोठी कारवाई केली आहे. शेत शिवारातील एका शेतात तूर, मका, कापूस या तीन पिकांमध्ये आंतरपीक म्हणून चक्क गांजाची लागवड केल्याचे पोलीस पथकाच्या निदर्शनास आले. तीन पिकांमध्ये गांजा आंतरपीक लावल्याचे पाहून पोलीस देखील चक्रावले. पोलिसांनी गांजाची बेकायदेशीर लागवड केलेली ४८७ झाडे जप्त केली. याची किंमत १४ लाख ४२ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस आल्याचे पाहून दोन आरोपी फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

18:02 November 01

पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून व्हिडिओ व्हायरल करणारा 'बादशहा' निघाला गुन्हेगार

ठाणे - पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणारा 'बादशहा' निघाला गुन्हेगार. ६५ लाखांचा मुद्देमालही जप्त. ठाणे पोलिसांची कारवाई.

17:29 November 01

चामराजनगरमधील चन्नाप्पापुरा गावातील उत्सवादरम्यान मंदिराचा रथ कोसळला

बंगळूरू - चामराजनगरमधील चन्नाप्पापुरा गावातील वीरभद्रेश्वर मंदिरात रथाचे चाक तुटले. उत्सवादरम्यान आज मंदिराचा रथ कोसळला. तुटलेल्या चाकामुळे रथ खाली पडला. यावेळी रथाभोवती मोठ्या प्रमाणात भाविक होते. मात्र वेळीच सगळ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सर्व भाविक सुखरूप आहेत.

17:17 November 01

तेलंगणातील नलगोंडा येथे टीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

हैदराबाद - तेलंगणातील नलगोंडा येथे मुनुगोडे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी टीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान संघर्ष झाला. यावेळी कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

16:23 November 01

मोरबी पूल दुर्घटनास्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

मोरबी पूल दुर्घटनास्थळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. मच्छू नदीत शोध आणि बचाव कार्य सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मोरबी येथे घटनास्थळी भेट दिली.

16:19 November 01

कुणबी दाखला मिळवून देण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच, अधिकारी जाळ्यात

कराड (सातारा) - कुणबी दाखला मिळवून देण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड तहसील कचेरीतील एकावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. विक्रम वसंत शिवदास (रा. मालखेड, ता. कराड), असे त्याचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना असून लाचखोरीमुळे कराड महसूल विभाग बदनाम झाला आहे.

15:59 November 01

अनिल देशमुख यांच्या मुलाला सत्र न्यायालयाचा दिलासा, जामीन मंजूर

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाला सत्र न्यायालयाचा दिलासा. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देण्यात आले होते समन्स. आज सलील देशमुख कोर्टात हजर झाल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

15:27 November 01

असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान - आदित्य ठाकरे यांचे ट्विट

मुंबई - राज्यातील असंवैधानिक सरकारच्या 4 महिन्यांत अचानक 4 मोठे प्रकल्प इतर राज्यात का स्थलांतरित झाले. यावर मी महाराष्ट्राच्या असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना एका खुल्या चर्चेसाठी आव्हान दिले आहे. आपल्या राज्यातील खोके सरकार आणि येथील राजकीय स्थैर्यावरील गुंतवणूकदारांचा विश्वास उडाला आहे. अशाप्रकारचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

14:50 November 01

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू, एकाला कंठस्नान

अनंतनाग - सेमथान, बिजबेहारा भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी आहेत. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे वृत्त आहे.

14:12 November 01

जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनीत भट्टीचा भीषण स्फोट, 8 ते 10 कामगार ठार झाल्याची भीती

जालना - जालना येथील औद्योगिक वसाहतीतील गीताई स्टील कंपनीत सकाळच्या सुमारास भट्टीचा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की भट्टीचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. यात 8 ते 10 कामगार मृत्युमुखी पडले आसल्याची भीती आहे. अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

13:46 November 01

मुंबईत अमली पदार्थ तस्कराला अटक, 85 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त

मुंबई - वडाळा पोलिसांनी एका अमली पदार्थ तस्कराला अटक केली. त्याच्या ताब्यातून 85 लाख रुपये किमतीचे 16.983 किलो ड्रग्ज जप्त केले. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

13:30 November 01

अभिनेता सलमान खानला Y+ सुरक्षा कवच

मुंबई - पोलीस अभिनेता सलमान खानला Y+ सुरक्षा कवच देणार आहेत. अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून यापूर्वी धमकीचे पत्र मिळाल्यानंतर राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी ही माहिती दिली.

12:38 November 01

उद्योगपतीकडून रिव्हॉल्व्हरच्या धाकाने मुलगा-सुनेने करुन घेतले कुलमुखत्यारपत्र

कराड - उंब्रज येथील उद्योगपतीला बंगल्यात डांबून जबर मारहाण करत रिव्हॉल्व्हरच्या धाकाने कुलमुखत्यारपत्र आणि बक्षीसपत्र करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उद्योगपतीचा मुलगा, सून, नातू, नातसुनेसह एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

12:14 November 01

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करणार - अब्दुल सत्तार

राज्यातील शेतकऱ्यांना ४ हजार ते साडेचार हजार कोटी मदत दिली आहे. अजूनही मदत देणार आहे. अंतिम आकडेवारी आल्यावर पंचनामा झाले की सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. कोणीही वंचित राहणार नाही सर्वांना मदत देणार, असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

12:09 November 01

किशोरी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात दाखल

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर एसआरए फ्लॅट घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांचा चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते. त्यानुसार त्या चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

11:56 November 01

माहुली गडावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका

ठाणे - माहुली गडावर ट्रेकिंगसाठी ठाणे व नवी मुंबईतील ऐरोली येथून ११ पर्यटकांपैकी ४ पर्यटक गडावर दिशादर्शक सूचनाफलक नसल्यामुळे रस्ता चुकले. त्यामुळे आडवाटेने गड उतरण्यास सुरुवात केली. त्यामध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश होता. सदर घटनेची माहिती किल्ले माहुली गड प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पितांबरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जीवरक्षक रेस्क्यू टीम तसेच वनविभाग व स्थानिक पोलीस गडावर दाखल झाली. तब्बल ६ तास अडकून पडलेल्या पर्यटकाना सुखरूप गडाच्या पायथ्याशी घेऊन येण्यात यश आले.

11:45 November 01

किशोरी पेडणेकर एसआरए फ्लॅट प्रकरणात दादर पोलीस ठाण्यात दाखल

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर एसआरए फ्लॅट घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

11:02 November 01

बीडमध्ये समाजकंटकांकडून महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आसपास तोडफोड

बीडमध्ये अज्ञात समाज- कंटकांकडून शहरातील महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या आसपास तोडफोड करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक आहे. त्या स्मारकाच्या आजूबाजूला बेंच तयार करून शोभीकरण करण्यात आलं होतं. मात्र काल रात्री काही समाजकंटकांनी या सगळ्या सुशोभीकरणाची तोडफोड करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समोर आलं आहे

10:47 November 01

शिंदे गट विरोधात ठाकरे गटाचा खटला, सर्वोच्च न्यायालयात चार आठवड्यांनी होणार सुनावणी

शिंदे गट विरोधात ठाके गट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दोन्ही पक्षकारांनी ४ आठवड्यांची मुदत मागितली आहे.

10:27 November 01

अमरावतीत कृषीप्रदर्शनीचे आयोजन

अमरावती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, नैसर्गिक शेतीला वाव देणे, त्यांना शेतीविषयक नवनविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विभागीय कृषी प्रदर्शनीचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मेळघाट परिक्षेत्रात ‘ॲग्रो फॉरस्ट्री’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि आणि वनविभागाने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे दिले.Body:विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय कृषि प्रदर्शनीच्या आयोजना संदर्भात पूर्वतयारी आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विभागीय कृषि सह संचालक किसन मुळे, वनसंरक्षक जी. के. अनारसे, विभागीय वनाधिकारी एस.एस. करे, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती वर्षा भाकरे, आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती ए.व्ही. निस्ताने आदी यावेळी उपस्थित होते.

यशस्वी आयोजनासाठी प्रभावी नियोजन करा
डॉ. बोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढविणे, शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान व शेतीपुरक व्यवसायाबाबत माहिती होण्यासाठी यापूर्वी दरवर्षी जिल्ह्यात कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात येत होते. पंरतू, मधल्या काळात कोरोनाच्या संकटकाळात कृषी महोत्सवाचे आयोजन होवू शकले नाही. यावर्षी जिल्ह्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे उद्देशाने कृषि प्रदर्शनीचे आयोजन होणे आवश्यक आहे. या प्रदर्शनीच्या नियोजनासाठी समिती स्थापन करण्यात यावी. नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन व कृषि विभागाने प्रदर्शनीसाठी निधीची तरतूद करावी. चार दिवस होणाऱ्या या कृषी प्रदर्शनीमध्ये कृषी मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते उदघाटन, परिसंवाद, कृषी तज्ज्ञांच्या मुलाखती, कृषि विषयावर आधारित चर्चासत्र, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पशुसंवर्धन, शेती उत्पादनांचे विपणन आदी बाबी अंतर्भूत राहणार. प्रदर्शनीच्या ठिकाणी शेती, वनोपज उत्पादने, शेती अवजारे-यंत्रे, उपकरणे, शेती विषयक नवनवीन तंत्रज्ञान, कृषी बँका, महिला बचत गट, शेतीपूरक व्यवसाय उभारणी, कृषी विद्यापीठ मार्गदर्शन केंद्र आदींचे दोनशे स्टॉल्स उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

10:06 November 01

मेधा सोमैया मानहानी प्रकरणात आजपासून संजय राऊत यांच्या विरोधात खटला सुरू

मेधा किरीट सोमैया यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात आजपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. संजय राऊत यांच्यावर मेधा सोमैया यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे

08:19 November 01

अतिवृष्टीचा इशारा, या जिल्ह्यात शाळा राहणार बंद

आज, 1 नोव्हेंबर रोजी आयएमडीद्वारे मुसळधार पावसाच्या सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर नागापट्टिनम आणि तिरुवरूर जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. मायलादुथुराई जिल्ह्यातही आज शाळा बंद राहणार आहेत.

08:08 November 01

मोरबी घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य पुन्हा सुरू

मोरबी घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आले आहे. भारतीय नौदल आणि एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

07:17 November 01

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

गुजरातमधील मोरबी येथे पूल कोसळल्याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ओरेवा कंपनीचे दोन व्यवस्थापक, दोन तिकीट लिपिकांसह दोन कंत्राटदार आणि तीन सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे

06:56 November 01

दार्जिलिंगमधील अपघातात तीन ठार

दार्जिलिंगमधील लोअर चैत्यपानी, सिपोयधुरा येथे सोमावरी दुपारी 3.40 च्या सुमारास आठ जणांना घेऊन जाणाऱ्या कारला अपघात झाला. अपघातात तीन ठार, पाच जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.

06:52 November 01

मोरबी दुर्घटनेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले दु:ख

मोरबी दुर्घटनेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की भारतात पूल कोसळून आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. आम्ही गुजरातमधील लोकांच्या दुःखात सामील आहोत, असेही त्यांनी म्हटले

06:40 November 01

सरकार चीनला रोखू शकत नाही- ओमर अब्दुल्ला

प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी भेट देऊ नये असे सांगितले. ते का घाबरतात? सरकार चीनला रोखू शकत नाही आणि त्यांना मागे ढकलू शकत नाही. पण जेव्हा आम्हाला श्रीनगरहून द्रास मार्गे कारगिलला यायचे होते तेव्हा त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही. प्रवेश नाकारल्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

06:22 November 01

Breaking News देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त

मुंबई : आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. 50 खोक्याचा आपला आरोप रवी राणा यांनी मागे घेतला आहे. आपसातले भांडण मिटवले आहे. ही भानगड वाढू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील मध्यस्थी करावी लागली. मात्र बच्चू कडू यांनी सात आठ आमदार बाहेर घेऊन जाईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता बच्चू कडू हे राज्यमंत्र्यांच्या ऐवजी मंत्री होतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे.

Last Updated : Nov 1, 2022, 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.