ETV Bharat / state

Breaking News : आमदार सांभाळण्यासाठी शासकीय तिजोरीवर सरकारचा दरोडा - आ. शशिकांत शिंदेंचा आरोप - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेट

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Feb 20, 2023, 6:48 AM IST

Updated : Feb 20, 2023, 10:22 PM IST

22:21 February 20

आमदार सांभाळण्यासाठी शासकीय तिजोरीवर सरकारचा दरोडा - आ. शशिकांत शिंदेंचा आरोप

सातारा - आमदार सांभाळण्यासाठी शासकीय तिजोरीवर सरकारने दरोडा टाकला असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केला. शिंदे-फडणवीस सत्तेवर सरकार आल्यापासून विकास निधीबाबत अन्याय आणि विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. या निषेधार्थ गुरूवारी (दि. २३) जिल्हाथिकारी कार्यालयावर निषेध लाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

21:47 February 20

पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी सपना गिलला जामीन

मुंबई - पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरणी सपना गिलला जामीन मिळाला आहे.

21:11 February 20

अभिनेत्री बेला बोसचे निधन

मुंबई - अभिनेत्री बेला बोसचे मुंबईत निधन झाले आहे.

19:42 February 20

विदेशी निधी प्रकरणी इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना प्रतिबंधित परदेशी निधी प्रकरणात कधीही अटक होण्याची शक्यता आहे. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने इम्रान खान यांना प्रतिबंधित निधी प्रकरणात अटक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना कोणत्याहीक्षणी अटक करण्यात येऊ शकते.

19:33 February 20

हैदराबादमधून 2 फरार कट्टर नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

मुंबई - गडचिरोली पोलिसांनी हैदराबादमधून दोन फरार कट्टर नक्षलवाद्यांना पकडले आहे. ते 2006-2007 पासून फरार होते. त्यांच्या अटकेसाठी सरकारने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

19:29 February 20

शिवीगाळ केल्याच्या रागातून ३५ वर्षीय तरुणाचा खून; दोन्ही आरोपी १२ तासातच गजाआड

ठाणे : शिवीगाळ करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाची दोन मित्रांनी मिळून महाशिवरात्रीला खून केल्याची खळबळजनक घटना घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील बालकंजी बारी शाळेजवळ घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास करून दोन्ही आरोपीना १२ तासातच बेड्या ठोकल्या आहेत. पप्पू उर्फ पपड्या जालींदर जाधव अमित रमेश पांडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अशोक शामराव वाघमारे (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

18:29 February 20

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी नागपुरात 'जवाब दो' आंदोलन

नागपूर - कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या २०१५ मध्ये झालेल्या हत्येच्या विरोधात शहरात आज अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी निदर्शने केली. या हत्येच्या तपासाचा अजूनही निकाल लागलेला नाही. त्यामुळे जवाब दो आंदोलन करण्यात आले.

18:25 February 20

भिवंडीत व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या 5 जणांना अटक

ठाणे - भिवंडीत व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच जणांनी पोलीस असल्याचे दाखवून 27 जानेवारी रोजी व्यावसायिकाचे अपहरण केले आणि त्याच्या सुटकेसाठी त्याच्या नातेवाईकांकडून 10 लाख रुपयांची मागणी केली होती. खंडणी विरोधी सेलचे वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे यांनी आज ही माहिती दिली.

18:22 February 20

साताऱ्यात मटका बुकीच्या घरावर छापा; १६ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त, २० जणांवर गुन्हा

सातारा - स्थानिक गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मटका बुकीच्या घरावर छापा टाकून जुगाराचे साहित्य आणि रोकड, असा १६ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी, असे मटका बुकीचे नाव आहे. त्याच्यासह एकूण २० जणांवर सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार एलसीबीने ही कारवाई केली आहे.

18:16 February 20

भिवंडीत शाळेजवळ एकाची हत्या, आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार

ठाणे - उल्हासनगर येथील शाळेजवळ एका 35 वर्षीय व्यक्तीची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी दिली. अशोक वाघमारे यांची 18 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत, असे मध्य पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

17:27 February 20

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री खा. बिप्लब देब यांच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले

नवी दिल्ली - त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार बिप्लब देब यांच्या कारचा आज मोठा अपघात झाला. हरियाणाच्या पानिपतमधील जीटी रोडवर हा अपघात झाला. त्यांना मात्र काहीही झाले नाही असे बिप्लब देब यांचे कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले.

16:09 February 20

आईचा खून करणाऱ्या दोषीला पोलीस बंदोबस्तात मुलीच्या लग्नाला हजर राहता येईल - हायकोर्ट

मुंबई - आईचा खून करणाऱ्या दोषीला पोलीस बंदोबस्तात स्वतःच्या मुलीच्या लग्नाला हजर राहता येईल असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. खून करणाऱ्या दोषी व्यक्तीस स्वतःच्याच मुलीच्या लग्नाला हजर राहता येईल, मुंबई उच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

16:04 February 20

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची युक्रेनची राजधानी कीव्हला अचानक भेट

कीव्ह (युक्रेन) - अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनची राजधानी कीव्ह शहराला अचानक भेट दिली. त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. विरोधक नक्कीच हरतील. पुतिन आणि त्यांच्या दलाचा पाडाव नक्कीच होईल. तसेच युक्रेनला आवश्यक असलेली सर्व शस्त्रे मिळतील. त्यामध्ये कोणतीही तडजोड करणार नाही, अशी ग्वाही अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी दिली.

15:54 February 20

महारेराने बजावल्या ३१३ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा

मुंबई - महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने राज्यभरातील 313 मोठ्या प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. बाह्य लेखापरीक्षकांच्या अहवालात अनेक त्रुटींकडे रेराने लक्ष वेधले आहे. महारेराने सूक्ष्म स्तरावर प्रकल्प पाहण्यासाठी त्याच्या आदेशाचा भाग म्हणून प्रतिष्ठित ऑडिट फर्मची नियुक्ती केली. फर्मने लाल ध्वजांकित प्रकल्पांना नोटिसा पाठवल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

15:47 February 20

चिंचवड मतदारसंघात 43 लाख तर कसबा मतदारसंघात 5 लाखांची रोकड जप्त

पुणे :- पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि कसबा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून या दोन्ही मतदार संघात भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे.दोन्ही मतदार संघात सध्या राजकीय वातावरण तापले आहे.अश्यातच निवडणूक आयोगाकडून चिंचवड मतदार संघात 43 लाख तर कसबा मतदार संघात 5 लाखांच रोकड जप्त करण्यात आलं आहे.तसेच दारू आणि गांजा देखील या दोन्ही मतदार संघातून जप्त करण्यात आलं आहे.

15:40 February 20

पृथ्वी शॉ हल्ल्याप्रकरणी सपना गिलला न्यायालयीन कोठडी

मुंबई - भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर कथित हल्ल्या प्रकरणी आरोपी सपना गिलला न्यायालयीन कोठडी सुनावली. क्रिकेट पटूवर हल्ला या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे.

15:18 February 20

निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधारच चुकीचा - उद्धव ठाकरे

मुंबई - विधान परिषद आणि राज्यसभेत आपले बहुमत आहे याचा विचार ECI ने केला नाही असे सुप्रीम कोर्टाच्या याचिकेत ठाकरे गटाने म्हटले आहे. या प्रकरणी एकट्या विधानसभेत बहुमत असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे एकूणच EC द्वारे आदेश पारित करण्याचा आधारच योग्य नसल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.

15:01 February 20

गाडीतून उतरून एकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतले पेटवून

बीड - केज येथे सकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील एका कर्मचाऱ्याने गाडीतून उतरून भर रस्त्यावर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याच्या सोबतचे दोघे पळून गेले आहेत.

14:45 February 20

माझ्या वडिलांचे नाव चोरण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे नाव लावावे - उद्धव ठाकरेंचे आव्हान

मुंबई - माझ्या वडिलांचे नाव चोरण्यापेक्षा त्यांनी स्वतःचे नाव लावावे. स्वतःच्या वडिलांचे नाव लावावे. त्यानंतर निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावी असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

14:42 February 20

मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गटासाठी खुले करणे हा गुन्हा ठरेल - ठाकरे

मुंबई - मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गटासाठी खुले करणे हा गुन्हा ठरेल. कारण सध्या एकही सदस्य अस्तित्वात नाही. महापालिका बरखास्त केलेली आहे. त्यामुळे एकही कॉर्पोरेटर नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी सील काठणे हे चुकीचे ठरेल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

14:36 February 20

शिंदे गटाच्या व्हिपचा आदेश आपल्याला लागू होणार नाही - उद्धव ठाकरे

मुंबई - शिंदे गटाच्या व्हिपचा आदेश आपल्याला लागू होणार नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दोन गट वेगवेगळे आहे. निवडणूक आयोगाने ते आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा व्हिप आपल्या गटाला किंवा आपल्याला लागू होण्याचा प्रश्नच नाही, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे पुढे म्हणाले की, ते बाहेर पडलेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर अपात्रतेची तलवार आहे. आमच्या डोक्यावर नाही असेही ते म्हणाले.

14:30 February 20

निवडणूक आयोगाची नियुक्ती नाही तर निवड झाली पाहिजे - उद्धव ठाकरे

मुंबई - हे चोरलेले शिवधनुष्य आहे. जे शिवधनुष्य रावणाने नाही पेलले, ते मिंध्यांना कसे पेलणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला आहे, त्याला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती न करता त्यांची निवड झाली पाहिजे अशी मागणी ठाकरे यांनी केली.

14:24 February 20

निवडणूक आयोगाने घाईघाईत निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टात अपील - उद्धव ठाकरे

मुंबई - सर्वांनी एकत्र पक्ष सोडला नाही. सुरुवातीला 16 जण गेले. त्यानंतर 23 जणांनी पक्ष सोडला. त्यांच्या तक्रारी आधीच आयोगाकडे आहेत. त्यामुळे त्या क्रमाने या तक्रारींची सुनावणी आणि निकाल लागले पाहिजेत. मात्र आता हा निकाल लागला आहे. त्यामुळे त्यामुळे हे सगळे कटा कारस्थान करुन ठरवून केले आहे, असेही ठाकरे म्हणाले.

14:19 February 20

चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू - उद्धव ठाकरेंचा टोला

मुंबई - चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू असा टोला उद्धव ठाकरे यांनी लागावला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाचे चिन्ह आणि नाव चोरणे हा पूर्वनियोजित कट होता असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

14:17 February 20

ठाकरे असो किंवा शिंदे आमचा व्हीप सर्वांना लागू - भरत गोगावले

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना दिल्यानंतर पक्षादेश कोणाचा पाळणार यावर खलबत सुरू होती. मात्र ठाकरे असो किंवा शिंदे, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या, सर्वांना आमचा व्हीप लागू होईल, असे स्पष्टीकरण शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिले. राज्य विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयात शिंदे गटाच्या आमदारांची बैठक झाली. गोगावले यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

14:01 February 20

शिवसेनेच्या कोणत्याही मालवत्तेवर आमचा डोळा नाही - सदा सरवणकर

मुंबई - आमचा कोणत्याही मालमत्तेकडे डोळा नाही असे मत शिंदे गटाचे नेते आ. सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. सेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. प्रत्येक शिवसेना शाखा आमच्यासाठी मंदिर आहे, असेही सरवणकर म्हणाले. शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे, त्यावर ते प्रतिक्रिया देत होते.

13:44 February 20

चिन्ह आणि नावासाठी 2000 कोटींचा सौदा झालाच, संजय राऊत यांचा पुनरुच्चार

मुंबई - आम्ही निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच ते म्हणाले की, मी माझ्या विधानावर ठाम आहे की 2000 कोटी रुपयांचा सौदा होता ज्याद्वारे शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले. योग्य वेळी आम्ही यासंदर्भात पुरावे घेऊन येऊ, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

13:23 February 20

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याच्या शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरू

मुंबई - महापालिकेतील शिवसेना कार्यालय ताब्यात घेण्याच्या शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पालिका मुख्यालयात लावण्यात आला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर आता पालिकेतील कार्यालय ताब्यात घेतले जाणार आहे. एक महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याने पालिकेतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये बंद करण्यात आली आहेत.

13:20 February 20

उद्धव ठाकरे यांचे बैठकीसाठी शिवसेना भवनात जल्लोषात स्वागत

मुंबई - उद्धव ठाकरे यांचे बैठकीसाठी शिवसेना भवनात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईतील शिवसेना भवनात त्यांचे आगमन झाले. त्यांनी आपल्या गटातील आमदार आणि नेत्यांची बैठक येथे बोलावली आहे.

13:04 February 20

व्हीपचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करणार-भरत गोगावले

व्हीपचे नियम सर्व आमदारांना लागू होणार आहेत. उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिला आहे. व्हीप स्वीकारायचा की नाही हे ठाकरे गट ठरवेल. व्हीप झुगारला तर काय कारवाई होईल, हे लवकरच कळेल, असे गोगावले यांनी म्हटले आहे.

12:54 February 20

प्रतोदांच्या आदेशाचे पालन ५६ आमदारांनी करावे- प्रताप सरनाईक

प्रतोदांच्या आदेशाचे पालन ५६ आमदारांनी करावे, अशी सूचना करत शिंदे गटाचे आमदार प्रतास सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. शिवसेना भवनवर आम्ही दावा करणार नाही, असे आमदार संजय शिरसाट यांनी सांगिलते. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही आमदार शिरसाट यांनी म्हटले आहे.

12:26 February 20

बारावीच्या उत्तरपत्रिका न तपासण्यावर शिक्षक ठाम, निकाल लांबण्याची शक्यता

मुंबई - बारावीच्या परीक्षा मंडळाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र राज्यातील 60,000 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक उत्तर पत्रिका न तपासण्यावर ठाम आहेत. शासन हजारो शिक्षकांच्या मागण्यांना कोणता प्रतिसाद देते त्यावरच या आंदोलनाचे स्वरूप अवलंबून असेल. त्यामुळे बारावीच्या मंडळाच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे निकाल लांबणार अशी चिन्ह दिसत आहेत.

12:19 February 20

ठाण्यात चेन स्नॅचर पकडला, 10 गुन्हे उघडकीस

ठाणे - पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याने ठाणे जिल्ह्यातून मोटारसायकल चोरीसह 10 गुन्ह्यांची उकल केल्याचा दावा केला आहे.

11:56 February 20

IPS अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती

मुंबई - वरिष्ठ IPS अधिकारी ब्रिजेश सिंह यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11:50 February 20

नीलम गोऱ्हे यांना मातृशोक, लतिकाताई गोऱ्हे यांचे निधन

पुणे - ठाकरे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या आई श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे पुण्यात निधन झाले आहे. अंत्यदर्शन दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत सिल्हररॅाक्स , हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी ,पुणे येथे घेता येईल. त्यांच्या पार्थिवावर अंतीम संस्कार ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ येथे करण्यात येतील.

11:37 February 20

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद

राजनांदगाव (छत्तीसगड) - अज्ञात नक्षलवाद्यांनी हेड कॉन्स्टेबल राजेश सिंग आणि त्याचा साथीदार चंदसूराज आणि बोर्तलाव यांच्यावर सुमारे 20 राऊंड गोळीबार केला होता. यामध्ये राजेश सिंह जागीच शहीद झाले तर त्यांच्या साथीदारावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचाही मृत्यू झाला आहे. आयटीबीपी आणि जिल्हा दलाचे पथक घटनास्थळी तपास करत आहेत.

11:23 February 20

ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना आणि धनुष्य-बाण हे चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केलेल्या याचिकेचा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टाने वकिलाला उद्या येण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वकिलाने केली होती.

11:00 February 20

निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव व धनुष्य बाण चिन्ह दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

11:00 February 20

विधीमंडळातील कार्यालयाचा ताबा शिंदे शिवसेनेने घेतला.

ठाकरे गटाचे चिन्ह, नाव त्यानंतर आता विधीमंडळातील कार्यालय शिंदे गटाच्या शिवसेनेने घेतला आहे.

10:54 February 20

कन्नड चित्रपट दिग्दर्शक एस. के. भगवान यांचे बंगळुरू येथे निधन

कन्नड चित्रपट दिग्दर्शक एस. के. भगवान यांचे बंगळुरू येथे निधन झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस के भगवान यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाल्या त्यांनी म्हटले आहे.

10:53 February 20

सनातनींनी किमान चार, पाच मुलांना जन्माला घालावे-कथाका देवकीनंदन ठाकूर महाराज

आजपासून पुढील दहा वर्षात जर भारताला सनातन राष्ट्र घोषित न केल्यास पुढील पंचवीस वर्षानंतर भारत सेक्युलर देश राहू शकेल का असा प्रश्न कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी उपस्थित केला. सनातनींनी किमान चार, पाच मुलांना जन्माला घालावे, असे त्यांनी वक्तव्य केले.

10:29 February 20

आमची लढाई मिंधे गटाशी नाही, तर भाजपशी-संजय राऊत

चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा पुनरुच्चार खासदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे. फडणवीस व राणे निकालाच्या आधीच आमच्या बाजूने निकाल लागणार असल्याचे सांगत होते. मिंधे गटाची आमच्याशी लढण्याची पात्रता नसल्याचा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

10:21 February 20

बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह नवा राजकीय पक्ष स्थापन करणार

बिहारमध्ये उपेंद्र कुशवाह नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. आज त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता

10:15 February 20

ठाण्यात चेन स्नॅचर पकडला, 10 गुन्ह्यांची झाली उकल

पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील एका मोटारसायकल चोरीसह 10 गुन्ह्यांची उकल केल्याचा दावा केला आहे. शनिवारी कल्याण परिसरातून अटक करण्यात आलेल्या आरोपी मोहम्मद करिबशाह सय्यद याच्याकडून १३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एकूण ६.७५ लाख रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली, असे पोलीस प्रवक्त्याने सोमवारी सांगितले.

10:02 February 20

शिंदे गटाकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता

शिंदे गटाकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता शिंदे गटाकडून आज राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची प्रमुख नेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभवन कार्यालयावर शिंदे गटाकडून दावा केला जाणार आहे. बैठकीनंतर विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले जाणार आहे.

09:58 February 20

खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्याविरोधात ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:55 February 20

ठाण्यात ऑटो स्पेअर पार्ट्सच्या गॅरेजला आग

ठाणे शहरात मोटार वाहनांचे सुटे भाग आणि इतर वस्तू ठेवलेल्या गॅरेजला सोमवारी सकाळी आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. माजिवडा परिसरात असलेल्या 2,000 चौरस फुटांच्या गॅरेजमध्ये पहाटे 5 वाजता लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (RDMC) प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.

09:49 February 20

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आज बोलाविली बैठक

पक्षाचे नाव व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी आज दुपारी 12.30 वाजता मुंबईतील शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक बोलविलेली आहे. या बैठकीला आमदार आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

09:42 February 20

जेएनयूएसयू कार्यालयाला शिवाजी महाराजांचे नाव द्या-अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

जेएनयूएसयू कार्यालयाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ( एबीव्हीपी) केली आहे. छत्रपती शिवाजींच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्यांवर जेएनयू प्रशासन आणि दिल्ली पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणीदेखील एबीव्हीपीने केली आहे.

09:36 February 20

विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी आमचे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न-केसी वेणुगोपाल

विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी आमचे अत्यंत प्रामाणिक प्रयत्न आहेत. आम्हाला दुखावणारे अनेक अनुभव आले असले तरी या हुकूमशाही सरकारला हटवण्यासाठी आम्ही सर्व काही विसरायला तयार आहोत. आम्ही पूर्णपणे विरोधी पक्षाच्या एकीसाठी आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादावर दिली आहे.

09:22 February 20

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के

नंदुरबार जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांना काल दुपारी १२:५४ वाजता भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले असल्याची चर्चा सुरू होती. सावळदा ता शहादा येथील भूकंपमापन केंद्रावरील अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले की या भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य प्रदेश येथील बडवानी आहे. सावळदा तालुका शहादा येथिल केंद्रातही त्याची नोंद झाली आहे.

08:51 February 20

तुरुंगात गेल्यानंतर संजय राऊत यांचा समजूतदारपणा संपला-संदीप देशपांडे

आरोप करणे ही रोजची गोष्ट आहे, ती अगदी सामान्य गोष्ट आहे. पण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अपमानास्पद भाषा वापरली. त्यांची भाषा सहन होत नाही. मी तिथे हजर असतो तर मी त्यांना मारले असते. तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा समजूतदारपणा संपल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

08:50 February 20

पंतप्रधान मोदी रोजगार मेळाव्याला करणार संबोधित

पंतप्रधान मोदी आज रोजगार मेळाव्याला ऑनलाईन संबोधित करणार आहेत.

08:48 February 20

मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या, दोन भावासह त्याच्या पत्नीला अटक

मुंबईतील जोगेश्वरी भागात मालमत्तेच्या वादातून दोन भाऊ आणि त्यांच्या पत्नींनी मोठा भाऊ रविकुमार मोटकुरी याची हत्या केली. मृताच्या पत्नीने दिलेल्या जबानीवरून एमआयडीसी पोलिसांनी भादंविच्या 304 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला. त्याचे भाऊ जितेंद्र मोटकुरी आणि महेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.

08:04 February 20

शिंदे गटाची आज सकाळी साडेनऊ वाजता बैठक

शिंदे गटाची आज सकाळी साडेनऊ वाजता बैठक आहे. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकरणी, आयोगाच्या निकालानंतर पुढची रणनिती तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

07:57 February 20

पोलीस भरती मोहिमेत महिला कॉन्स्टेबल निलंबित

ठाण्यात सुरू असलेल्या पोलीस भरती मोहिमेत तिच्या दोन बहिणी सहभागी झाल्याची वस्तुस्थिती अधिकाऱ्यांपासून लपवल्याच्या आरोपाखाली एका महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.

07:54 February 20

भारतीय हवाई प्रवास आता 2019 च्या 85 टक्के पातळीवर

भारतीय हवाई प्रवास आता 2019 च्या 85 टक्के पातळीवर आहे, असे आयएटीएने म्हटले आहे.

07:53 February 20

दक्षिणपूर्व ब्राझीलच्या किनारी भागात मुसळधार पावसामुळे २४ नागरिकांचा मृत्यू

दक्षिणपूर्व ब्राझीलच्या किनारी भागात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे किमान 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य चालू आहे.

07:06 February 20

ट्विटरपाठोपाठ फेसबुकदेखील व्हेरिफाईडची करणार चाचणी

फेसबुक आणि इंस्टाग्रामचे मालक मेटा यांनी घोषणा केली की ते 'मेटा व्हेरिफाईड' चाचणी करत आहे. सरकारी आयडी वापरून खात्याची सत्यापित करता येईल आणि निळा बॅज मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे. या आठवड्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ही सेवा दिली जाणार आहे. फेसबुकदेखील ट्विटरप्रमाणेच मासिक शुल्क भरून निळे बॅज देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

07:04 February 20

नक्षलवाद्यांनी रस्ते बांधणीत वापरले वाहन आणि मशीन जाळले!

छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील कोयालीबेडा ब्लॉकमध्ये नक्षलवाद्यांनी रस्ते बांधणीत वापरले जाणारे एक वाहन आणि दोन मशीन जाळले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

07:03 February 20

चीनमधून आणखी एक अब्जाधीश गायब सीईओ बाओ फॅन गायब; शेअर साठा बुडाला

चीनमधील अब्जाधीश सीईओ बाओ फॅन गायब झाले आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे.

07:02 February 20

जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा अभाविप कार्यकर्त्यांचा आरोप

जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड केल्याचा अभाविप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. संबंधिवार कारवाईची अभाविपने मागणी केली आहे.

06:59 February 20

ऑस्टिन बटलर, केट ब्लँचेट यांना सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी बाफ्टा पुरस्कार जाहीर

बाफ्टामधील विजेत्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. ऑस्टिन बटलर, केट ब्लँचेट यांनी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार जिंकले आहेत.

06:58 February 20

असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील घरावर समाजकंटकांची दगडफेक

असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील घरावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आहे. यापूर्वीही ओवैसी यांच्या घरावर दगडफेक झाली होती.

06:41 February 20

Maharashtra Breaking News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिक : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना चाटूगिरी हा शब्द वापरत बदनामी केली अशी तक्रार शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिली आहे. या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 20, 2023, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.