ETV Bharat / state

Breaking News : मुंबईत सुमारे ३ वर्षांनी शून्य कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Breking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Jan 24, 2023, 6:59 AM IST

Updated : Jan 24, 2023, 9:31 PM IST

21:30 January 24

मुंबईत सुमारे ३ वर्षांनी शून्य कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई - मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणामध्ये कमी झाला आहे. आज २४ जानेवारीला तब्बल ३४ महिन्यांनी (सुमारे ३ वर्षांनी) मुंबईत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. या आधी १६ मार्च २०२० ला शून्य रुग्णांची नोंद झाली होती. सुमारे ३ वर्षांनी शून्य रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

19:44 January 24

शिंदे सरकारने दावोस दौऱ्यात 28 तासात केला 40 कोटींचा चुराडा - आदित्य ठाकरे

मुंबई - शिंदे सरकारने दावोस दौऱ्यात केवळ 28 तासात 40 कोटींचा चुराडा केल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दावोसमध्ये WEF 16 ते 20 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री दावोसला उशिरा पोहोचले. पहिला दिवस वाया गेला. दावोसमध्ये स्वाक्षरी केलेले 4 सामंजस्य करार प्रत्यक्षात महाराष्ट्रात करण्यात आले. ते तिथे झाल्याचे दाखवून सरकार खोटे बोलले आहे. तसेच वेदांताचे काम अजूनही सुरू झालेले नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांना लगावला.

18:56 January 24

श्रद्धा मित्राला भेटायला गेल्याने आफताब झाला हिंसक, आरोपपत्रा दिल्ली पोलिसांनी दिले खुनाचे कारण

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर प्रकरणाच्या आरोपपत्रात खुनाचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. श्रद्धा मित्राला भेटल्याने आफताब पूनावालाला राग आला. त्या रागाच्या भरात आफताबने निर्घृण कृत्य केल्याचे दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. एकूण 6,629 पानांच्या आरोपपत्रात दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, श्रद्धा मित्राला भेटायला बाहेरगावी गेल्याचे कळताच आफताब पूनावाला अत्यंत हिंसक झाला.

18:27 January 24

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा पुन्हा दिलासा

मुंबई - अभिनेत्री राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश कोर्टाने दिले आहेत. मूळ तक्रारदार शर्लिन चोप्राने कोर्टात हजेरी लावली. तसेच शर्लिनने राखीच्या अटकपूर्व जामीनाला विरोध केला. शर्लिनच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

18:10 January 24

औरंगाबाद खंडपीठाचा शिंदे फडणवीसांना दणका, 150 कोटीच्या कामावरील स्थगिती हटवली

नांदेड : राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारकडून मागील सरकारच्या काळातील कामांना स्थगिती दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याचवेळी शिंदे-फडणवीस सरकारला औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. नांदेड महानगरपालिकेतील विकास कामांवरील स्थगिती उठवत शहरातील विकासकामांचा निधी वितरित करण्याचे आदेश दिले आहे.

17:40 January 24

मुंबईत सोने तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने जप्त

मुंबई - महसूल गुप्तचर विभागाने मुंबईत सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यांनी 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने जप्त केले. तसेच 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. दुकानातील सोने वितळवणाऱ्या दुकानाच्या सोनारालाही अटक करण्यात आली. हे सोने परदेशातून मुंबईत वेगवेगळ्या हवाला ऑपरेटर्समार्फत आणण्यात आले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

17:36 January 24

झवेरी बाजार लूटप्रकरणी तोतया ईडी अधिकाऱ्यांना 24 तासात अटक

झवेरी बाजार लूटप्रकरणी तोतया ईडी अधिकाऱ्यांना 24 तासात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गोपनीय माहितीच्या आधारे एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली 24 तासाच्या आत तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मोहम्मद फजल सिद्दिक गिलीटवाला, मोहम्मद रफी अहमद मोहम्मद रफीक उर्फ समीर, विशाखा विश्वास मुधोळे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 15 लाख रुपयांची रोख रक्कम आणि अडीच किलो सोने अशी मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.

16:58 January 24

राज्यातील कचरामुक्त गावांची प्रजासत्ताकदिनी होणार घोषणा

मुंबई - राज्यात कचरा मुक्तीच्या दिशेने 1046 गावे घोषित होणार आहेत. 26 जानेवारी 2023 रोजी ह्या गावांची घोषणा होणार आहे. केवळ पुरस्कारासाठी नको शाश्वत उपाय योजना केलेली गावे हवी आहेत. ग्राम विकासात काम करणाऱ्या जाणकारांनी असे मत व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गावांची घोषणा होणार आहे.

16:48 January 24

गावठी कट्ट्याच्या फॅक्टरीवर मध्यप्रदेशात जाऊन कारवाई, दोनजण अटकेत

अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन कारवाई करत थेट गावठी कट्टे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेकवेळा गावठी कट्टे विक्रीसाठी आणले असताना पकडण्याची कारवाई पोलीस करत होते. मात्र प्रथमच तोफखाना पोलिसांनी थेट गावठी कट्टे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून आरोपीला गावठी कट्टे बनवत असताना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून काही गावठी कट्ट्यांसह कट्टे बनवण्याची साधनसामग्री हस्तगत करण्यात आली आहे.

16:36 January 24

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

16:05 January 24

पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांना मिळालेला धमकी प्रकरणाशी माझा संबंध नाही - श्याम मानव

नागपूर - बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्णशास्त्री यांना सुद्धा धमकी मिळाली असून या संदर्भात मध्यप्रदेश राज्यातील छतरपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या विषयी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले की या प्रकरणाची आमचं काही घेणं देणं नाही. कधी आम्हाला फोन आल्यास आमचे अनुभवी कार्यकर्ते पुढील व्यक्तीसोबत अतिशय सभ्यतेने बोलतात. धिरेंद्र कृष्ण शास्त्री जोपर्यंत आमचे आव्हान स्वीकारून आपली दिव्य शक्ती सिद्ध करत नाही, तोवर आम्ही त्यांना महाठग म्हणत राहू. जर बाबांनी आपली शक्ती सिद्ध केली,तर आम्ही माफी मागू आणि परत जाऊ. एवढ्या ढोंगी बाबांना आम्ही पर्दाफाश केला तरी कधी आम्ही आक्रमक होऊन कोणाला धमकी दिली नाही. माझ्या कार्यकर्त्यांपैकी कोणीही धमकी देण्याची सुतराम शक्यता नसल्याचे श्याम मानव म्हणाले आहेत.

14:39 January 24

दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के

दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. त्यामुळे लोकांच्यात घबराट पसरली होती.

13:48 January 24

मला जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न झाले - फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या काळात, मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडेंना हे टार्गेट देण्यात आल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. एका वृत्तवाहिनीच्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्यातील कटूतेवर त्यांनी भाष्य केले. तसेच मातोश्रीचे दरवाजे मला बंद केल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

13:25 January 24

पीएमआरडीए आणि महापालिकेची कोविड घोटाळ्यात चौकशी करा- किरीट सोमैय्या यांची मागणी

काळ्या यादीत टाकलेल्या रुग्णालयाला पुन्हा कोविडच्या कामाचे कंत्राट असे काय देण्यात आले? 18 कामांचे कंत्राट एखाद्या रुग्णालयाला कसे दिले जाऊ शकते, याबाबत पीएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिकेची चौकशी ईडी मार्फत करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

13:24 January 24

आलिशान कारमधून चक्क शेळ्यांची चोरी

स्विफ्ट डिझायर या आलिशान कारमधून चक्क शेळ्यांची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगरच्या कोपरगाव शहरात उघडकीस आला आहे. एक आलिशान कारमध्ये शेळ्यांना बसवून चोर घेवून जात असल्याची माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सिनेस्टाईल कारचा पाठलाग केला. शहराच्या मुख्य भागात हा सर्व प्रकार सोमवारी सकाळी सुरु होता.अखेर मोठ्या शिताफीने पोलीसांनी पाठलाग करुन चारचाकी वाहनासह तीन शेळ्या व दोघांना ताब्यात घेतले आहे.

12:37 January 24

सातारा - मध्यरात्री ३८ वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या

सातारा - सोमवारी मध्यरात्री एका ३८ वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अमित भोसले (रा. शुक्रवार पेठ, सातारा), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी ही हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मारेकरी फरार झाले आहेत. अमित भोसले हा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता.

11:49 January 24

यावर्षी आरडी परेडमध्ये दिसणार फक्त भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे

नवी दिल्ली - यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये, भारतीय सैन्य केवळ K-9 वज्र हॉविट्झर्स, MBT अर्जुन, नाग अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे, आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेइकल्स यासह केवळ मेड इन इंडिया शस्त्र प्रणालीचे प्रदर्शन करेल.

11:44 January 24

श्री गौंड समाजाविरोधात सामाजिक बहिष्कृत कायदा अंतर्गत बिंबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीने सामाजिक बहिष्काराची भीती दाखवल्याने या समाजातील चारशे मुलांची लग्नच होत नसल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समोर आणली आहे. या जातपंचायतीच्या या मनमानी कारभाराविरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:31 January 24

खासदार संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज आरोप निश्चित होणार

खासदार संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आज आरोप निश्चित होणार आहेत. खासदार संजय राऊत हे मुंबई सत्र न्यायालयात पोहोचले आहे. मुंबई सत्र न्यायालयात गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात दोषारोप निश्चितवर काही वेळात सुनावणी होणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह या प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत, वाधवान ब्रदर्स यांच्या विरोधात आरोप निश्चित होणार आहेत.

11:27 January 24

४ तोतया ईडी अधिकाऱ्याची धाड, व्यावसायिकाच्या कार्यालयातून नेले ३ किलो सोने आणि २५ लाख

4 अज्ञात व्यक्तींनी ईडी अधिकारी असल्याचा बनाव करत मुंबईच्या झवेरी बाजार परिसरात एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकला. कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 1.70 कोटी रुपये किमतीचे 3 किलो सोने नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

10:55 January 24

आयआयटी मद्रासने तयार केलेल्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिमची केंद्रीय मंत्र्यांकडून चाचणी

केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आयआयटी मद्रासने विकसित केलेल्या मेड इन इंडिया मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमची ‘BharOS’ चाचणी केली.

10:51 January 24

शेअर बाजारात सकारात्मक स्थिती, सकाळच्या सत्रात निर्देशांक २७३.२७ अंशाने वधारला

जागतिक आर्थिक व्यवस्थेत सकारात्मक चिन्ह असल्याने सकाळच्या सत्रात आयटी आणि वित्तीय कंपन्यांचे समभाग वाढले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीला सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास अर्धा टक्‍क्‍यांनी शेअर वधारले आहेत. निर्देशाक सकाळच्या सत्रात 273.27 अंशांनी वधारून 61,214.94 वर पोहोचला.

10:25 January 24

सर्वात अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे-आशिष शेलार

सर्वात अपयशी नेता म्हणजे उद्धव ठाकरे असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांनी शेठजी सारखी चालविली. ठाकरेंच्या लोकांकडून महानगरपालिकेवर दरोडा टाकण्याचं काम झालं आहे. आम्ही सेवक म्हणून महापालिकेवर काम करणार असेही शेलार यांनी म्हटले आहे.

10:10 January 24

पुण्यातील भीमा नदीत सापडले पाच दिवसात चार मृतदेह

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. पारगाव हद्दीतील असणाऱ्या भीमा नदीपात्रात सलग पाच दिवसात चार मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. १८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत.

09:34 January 24

बुलढाण्यात रॅगिंगमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या

बुलढाण्यात रॅगिंगमुळे विद्यार्थ्याची आत्महत्या करण्यात आली आहे. ऑडिओ क्लिपनंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.

09:05 January 24

मुंबई विमानतळावर पुस्तकात लपवून आणलेले सोने व अमेरिकन डॉलर जप्त

मुंबई विमानतळ कस्टम्सने दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोन परदेशी नागरिकांना अटक केली आणि पुस्तकांच्या पानांमध्ये लपवून ठेवलेले 90,000 अमेरिकन डॉलर आणि पेस्ट स्वरूपात अनुक्रमे 2.5 किलो सोने जप्त केले. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आल्याचे सीमाशुल्क विभागाने म्हटले आहे.

09:02 January 24

, जम्मू आणि काश्मीर येथून पुन्हा भारत जोडो यात्रा सुरू

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सितनी बायपास नगरोटा, जम्मू आणि काश्मीर येथून पुन्हा सुरू झाली आहे.

08:56 January 24

उत्तर कॅलिफोर्नियातील हल्ल्यात सात जण ठार

उत्तर कॅलिफोर्नियातील हाफ मून बे येथे झालेल्या दोन गोळीबारात सात जण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती अमेरिकन माध्यमाने दिली आहे.

08:11 January 24

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबई विशेष सीपीकडे अतिरिक्त सुरक्षेची केली मागणी

'गांधी गोडसे - एक युद्ध' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईतील विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहून त्यांच्या आणि त्यांच्या टीमने अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

07:26 January 24

उद्धव ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येताच, शिंदे आणि फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

मुंबई - देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे गेले असून हे रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी युतीची घोषणा केली. या युतीच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेऊन ठाकरेंना रोखण्यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती करणार असल्याचे समजते. मात्र, या भेटीत काय चर्चा होणार, हे येत्या काळात पुढे येईल. परंतु, शिंदे फडणवीसांच्या या तातडीच्या भेटीकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागले आहे.

07:04 January 24

बंगळुरूमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक..धक्कादायक माहिती समोर

बंगळुरूमध्ये पाकिस्तानी महिला यूपीमधील मुलायम सिंह यादव या व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 5 महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले. दोघेहे ऑनलाइन गेम लुडो खेळताना एकमेकांना भेटले.

07:03 January 24

आणखी एक कार कंपनी करणार कर्मचारी कपात

फोर्ड कंपनी संपूर्ण युरोपमध्ये 3,200 नोकर्‍या कमी करणार आहे. त्यामुळे वाहनक्षेत्रातही मंदी येत असल्याचे चित्र दिसत आहे.

07:02 January 24

ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटना-इस्कॉन

ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटना चिंताजनक आहेत. गेल्या 15 दिवसांत 3 मंदिरांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असती, तर असे प्रकार घडले नसते. पोलिसांनी दोषींना अटक करावी, अशी मागणी इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी केली आहे.

07:01 January 24

बालविवाह केल्यास पोक्सो गुन्हा दाखल होणार

वधूचे वय 14 वर्षांपेक्षा कमी असल्यास पोक्सो कायद्यांतर्गत आणि वधूचे वय 14 ते 18 वर्षांच्या दरम्यान असल्यास बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 अंतर्गत एफआयआर दाखल केला जाईल, असा निर्णय आसामच्या राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

06:40 January 24

Breaking News : प्रजासत्ताक दिनी तुरुंगातून 189 कैद्यांची होणार सुटका

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील तुरुंगातून एकूण 189 कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे.

Last Updated : Jan 24, 2023, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.