ETV Bharat / state

Breaking News : लैंगिक अत्याचार पीडितेच्या नातेवाईकांची ओळख उघड केल्याने वकिलांना 10,000 रुपयांचा दंड - महाराष्ट्र क्राईम न्यूज

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Jan 12, 2023, 6:51 AM IST

Updated : Jan 12, 2023, 7:55 PM IST

19:50 January 12

गोंदियात वाघाच्या हल्ल्यात 30 वर्षीय महिलेचा मृत्यू

गोंदिया - वाघाच्या हल्ल्यात एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गोठणगावच्या वडेगाव बंध्यामध्ये महिला सरपण गोळा करत होती. त्यावेळी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ती जखमी झाली होती. तिचा मृत्यू झाला असे सहायक वनसंरक्षक दादा राऊत यांनी सांगितले.

19:21 January 12

लैंगिक अत्याचार पीडितेच्या नातेवाईकांची ओळख उघड केल्याने वकिलांना 10,000 रुपयांचा दंड

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन लैंगिक अत्याचार पीडितांची ओळख याचिकांमध्ये उघड केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याचिकेत पीडितेच्या आईची ओळख उघड केल्याबद्दल कोर्टाने दोन वकिलांना 10,000 रुपये दंड ठोठावला आहे. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांची अशी ओळख उघड करण्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त करण्याची ही दुसरी वेळ आहे.

18:33 January 12

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 3 किलो सोन्यासह एकाला अटक

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ऋषी श्याम याला 3 किलो सोन्यासह पकडण्यात आले. CISF ने ही कारवाई केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला कस्टम अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.

18:29 January 12

धारावीत पत्नीची हत्या, आरोपीला मध्यप्रदेशातून अटक

मुंबई - धारावीमध्ये पत्नीची हत्या एकाने केली होती. या गुन्ह्यातील आरोपी मध्य प्रदेशातील कटनी येथून अटक करण्यात आला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयाने आरोपीला 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

18:24 January 12

मध्य प्रदेशातील तरुणाने मुंबईत केली पत्नीची हत्या

मुंबईतील धारावी येथे पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील कटनी येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल असून, आरोपीला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

18:06 January 12

पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे मुंबईत छापे; डॉलर आणि रोख रक्कम जप्त

पीएसएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने छापा टाकून मुंबईतून मोठ्या प्रमाणात डॉलर आणि रोख रक्कम जप्त केली आहे. मुंबईत याबाबत अजून शोध सुरू आहे.

17:33 January 12

पुण्याच्या येरवडा कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी, अतिरिक्त बॅरेकसाठी सरकारकडे प्रस्ताव

पुणे - येथील येरवडा तुरुंगात कैदांच्या भरमसाठ भरणा झाला आहे. त्यामुळे बरॅक कमी पडत आहेत. याच कारणास्थव महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग) अमिताभ गुप्ता यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात अतिरिक्त बॅरेक उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठला आहे. सध्या क्षमतेच्या जवळपास तिप्पट कैदी तुरुंगात आहेत. कारागृह विभागाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2022 पर्यंत, येरवडा कारागृहात 2,449 क्षमतेच्या तुलनेत 6,854 कैदी ठेवण्यात आले होते.

17:27 January 12

चोरीच्या 10 रिक्षा नवी मुंबई पोलिसांनी केल्या जप्त, 4 जणांना अटक

ठाणे - नवी मुंबई शहर आणि परिसरात ऑटो-रिक्षा चोरीच्या आरोपाखाली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची 10 वाहने जप्त केली आहेत. मुंबईतील चार आणि ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर-वसई विरार परिसरातून प्रत्येकी दोन गाड्या जप्त केल्या. ऑटो-रिक्षा चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. ज्यानंतर गुन्हे शाखेला त्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले होते, असे नवी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) विनायक वस्त यांनी सांगितले.

17:14 January 12

राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जी यांना दिलासा

मुंबई - राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जी यांना दिलासा मिळाला आहे. शिवडी कोर्टाने, खटला सुनावणीत, ममता बॅनर्जी यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. याा आदेशाला, ममता यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. खटला सुनावणीत गैरहजर राहण्याची परवानगी मागितली होती. पश्चिम बंगाल मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असल्याने, सुनावणीत गैरहजर राहण्याची ममता बॅनर्जी यांनी मागितलेली परवानगी सत्र न्यायालयाने मंजूर केली आहे.

17:02 January 12

पंतप्रधानांच्या सुरक्षेचे कडे तोडून युवक हार घेऊन पोहोचला मोदींच्या गाडीजवळ

हुबळी - कर्नाटकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान एक तरुण सुरक्षाकडे तोडून त्यांच्याजवळ हार घालण्यासाठी पोहोचला. या युवकाने मोदींना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला लगेच पकडले.

16:14 January 12

नाशिकमध्ये सुधीर नाही तर सत्यजीत तांबे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नाशिक - नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आता संपली आहे.

15:04 January 12

शीना बोरा जिवंत असल्याच्या दावा सीबीआयने फेटाळला

मुंबई - सीबीआयनेचा कथित शीना बोरा जिवंत असल्याच्या दाव्यावर प्रत्युत्तर दिले आहे. शीना बोराचा मृत्यू झाला असल्याचे सक्षम पुरावे आहेत. पुरव्यांना शास्त्रीय आधार आहे. शामवर रायने ही गोष्ट कबूल केली आहे. शीना बोरा जिवंत आहे हा काल्पनिक दावा असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले. गुवाहाटी विमानतळावरील CCTV फुटेज चेक करण्याची गरज नाही असेही सीबीआयने स्पष्ट केले.

14:39 January 12

महापालिकेच्या शाळेत दहा वर्षाच्या मुलाचा आकस्मित मृत्यू

ठाणे - महापालिकेच्या शाळा क्रमांक 64 येथे दहा वर्षाच्या मुलाचा आकस्मित मृत्यू झाला आहे. शाळेतील शिक्षक उपस्थित नसल्याने हे घडले. काल संध्याकाळी मुलाला ठाण्यातील सिविल रुग्णालय येथे आणण्यात आले. परंतु मुलाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. ज्या शाळेत मुलाचा मृत्यू झाला त्या शाळेत नागरिकांनी घेराव घातला. मुलाच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

14:11 January 12

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आघाडीत बिघाडी?

नागपूर - नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संतोष इटकेलवार यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीत बिघाडीचे चित्र आहे. कारण ही जागा शिवसेना लढणार असे निश्चित झाले होते. तसेच भाजप समर्थीत उमेदवार नागो गाणार उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे मोठे नेते गैरहजर राहिले होते. तर आपकडून देवेंद्र वानखेडे यांनी अर्ज दाखल केला आहे.

14:06 January 12

आंबेडकर स्मारकांमधील पुतळा, मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे हेच एकमेव कारण - प्रकाश आंबेडकर

मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकांमधील पुतळा हेच एकमेव कारण होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेसोबत आमची युती जवळ-जवळ झालेलीच आहे. फक्त आता घोषणा होणे बाकी आहे. तर जे भाजपसोबत आहेत त्यांच्यासोबत आमची युती होणार नाही, असेही ते म्हणाले.

12:27 January 12

अनुष्का शर्माचे आयकर विभागाच्या कारवाईला आव्हान

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्यावरील आयकर विभागाच्या कारवाईला आव्हान दिले आहे. अनुष्काच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यावरुन आयकर विभागाला नोटीस बजावली आहे. याप्रकरणाची 6 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे.

12:13 January 12

बालटाल झोजिलाजवळ मोठ्या प्रमाणात हिमस्खलन

गंदरबल - जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील सोनमर्ग भागातील बालटाल, झोजिलाजवळ मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाले. मात्र यामध्ये अजूनही कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

11:54 January 12

भारत जोडो यात्रेत जम्मूत संजय राऊत सहभागी होणार

मुंबई - भारत जोडो यात्रेत शेवटच्या टप्प्यात संजय राऊत सहभागी होणार आहेत. जम्मू-काश्मीर संवेदनशील भाग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जम्मू कश्मीरसोबत भावनिक नाते होते. त्यामुळे भारत जोडो यात्रेत उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. जम्मूमधून खासदार संजय राऊत भारत जोडे यात्रेमध्ये सामील होणार आहेत.

11:50 January 12

बेरोजगारीला कंटाळून 34 वर्षीय तरुणाची आत्महत्या

बीड - बेरोजगारीला कंटाळून 34 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. बीडच्या काळेगावघाट येथील ही दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे नोकर भरतीच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला जाग येणार का, असा सवाल विचारला जात आहे. या तरुणाने घरातच आत्महत्या केली आहे. दयानंद हरिश्चंद्र गाताडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

10:51 January 12

गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांची घेतली भेट

गयानाचे अध्यक्ष डॉ मोहम्मद इरफान अली यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची दिल्लीत भेट घेतली. बुधवारी त्यांनी ताजमहालला भेट दिली होती.

10:21 January 12

कोलकात्याच्या झुपरी मार्केटमध्ये भीषण आग

कोलकात्याच्या झुपरी मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी हजर आहेत.

10:14 January 12

भारत जोडो यात्रेत सहभागी होणार -संजय राऊत

जम्मू काश्मीरमधील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राहुल गांधीसोबत यात्रेत चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

09:26 January 12

आमदार सदा सरवणकर यांनीच पोलीस ठाण्याबाहेर झाडली गोळी, बॅलिस्टिक्स अहवालाची पुष्टी

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दादर पोलिस ठाण्याबाहेर गोळीबार करण्यात आला होता. ही गोळी आमदार सदा सरवणकर यांच्या परवानाधारक शस्त्राने असल्याची पुष्टी बॅलिस्टिक्स अहवालात झाली आहे. त्यामुळे आमदार सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

09:22 January 12

प्रकाश आंबेडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा

भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी रात्री गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांत अडीच तास खलबते झाली आहेत.

07:37 January 12

राफेलभोवती ठेवण्यात आलेली सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, तरुणाला अटक

भारतीय हवाई दलाच्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी एका संशयास्पद तरुणाला पकडले. अंबाला हवाई तळातील 12 फूट उंचीची बाह्य भिंत चढण्याचा या तरुणाने प्रयत्न केला. याच अंबाला हवाई तळावर राफेल लढाऊ विमाने ठेवण्यात आली आहेत.

07:35 January 12

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक नोव्हेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुली होणार-मुख्यमंत्री

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसांगितले की, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंकचे (MTHL) 90 टक्के नागरी काम पूर्ण झाले आहे. हा पूल या वर्षी नोव्हेंबरमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाईल. हा देशातील सर्वात लांब सागरी पूल ओपन रोड टोलिंग (ओआरटी) प्रणाली असणारा पहिला असणार आहे.

07:34 January 12

लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आगामी काळात आंदोलने महत्त्वपूर्ण आहेत- राकेश टिकैत

नागपूर- शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बुधवारी सांगितले की, लोकांचे हक्क, त्यांच्या जमिनी आणि शेतजमिनी यांच्या रक्षणासाठी आंदोलने आणि त्यात लोकसहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. नागपुरात बहुजन संघर्ष समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

07:23 January 12

जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेडराजामध्ये शिवप्रेमींची गर्दी

राजमाता जिजाऊ यांची आज ४२५ वी जयंती आहे. जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेडराजामध्ये शिवप्रेमींची गर्दी झाली आहे.

07:20 January 12

त्या भारतीय कंपनीचे खोकल्याचे सिरप वापरू नका, जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस

जागतिक आरोग्य संघटनेने नोएडा-आधारित मेरियन बायोटेकचे दोन खोकल्याचे सिरप न वापरण्याची शिफारस केली आहे, उझबेकिस्तानमधील 19 मृत्यूंशी संबंधित उत्पादनांमुळे भारताच्या मॅरियन बायोटेकने बनवलेले दोन खोकला सिरप मुलांसाठी वापरू नयेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

07:12 January 12

भायखळा येथील दगडी चाळमधील एका घराला आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही

भायखळा येथील दगडी चाळमधील एका घराला आग बुधवारी रात्री ९ वाजून २१ मिनिटाला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. लेव्हल १ ची आग होती.
- मुंबई अग्निशमन दल, पोलीस, ट्रॅफिक पोलीस, बेस्ट चे कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाले होते. त्यानंतर आगीवर एका तासात नियंत्रण करण्यात आले.

06:36 January 12

Breaking News : आरेतील रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार कंत्राटदारांवर काय कारवाई करणार? उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले

मुंबई : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडत आरे कॉलनीतून जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याबद्दल तिथल्या कंत्राटदारांवर काय कारवाई करणार? अशी विचारणा बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात पुढील सुनावणीत प्रतिज्ञापत्रावर माहिती सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या याचिकेवर पुढील प्रमाणे 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

( राज्यभरासह देश विदेशातील क्राईम, राजकीय व इतर महत्त्वांचे लाईव्ह अपडेट येथे वाचा )

Last Updated : Jan 12, 2023, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.