ETV Bharat / state

Breaking News : नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळून दोन मजूर ठार; मुरिजापुर शहरातील घटना - Maharashtra political news today

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra breaking news
author img

By

Published : Jan 22, 2023, 7:04 AM IST

Updated : Jan 22, 2023, 9:22 PM IST

21:22 January 22

नाल्याच्या काठावरील दगडाची भिंत कोसळून दोन मजूर ठार; मुरिजापुर शहरातील घटना

अकोला - नाल्याच्या काठावर असलेल्या प्राचीन दगडाची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना मूर्तिजापुर शहरात रविवारी सायंकाळी घडली. मरण पावलेले मजूर हे नाल्याचे बांधकाम करीत होते. दगडाची भिंत कोसळल्याने त्याखाली दबल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान या घटने प्रकरणी मुर्तीजापुर शहर पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लकी लखन पचारे (वय २०), सागर नरेश सोळंखे (वय२४) यांचा मृत्यु झाला आहे.

19:52 January 22

पुण्यात चुलत्यानेच आपल्या दोन पुतनींवर केला बलात्कार

पुणे - पुणे शहरातील मध्यवस्ती असलेल्या खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांनी विश्वासाने आपल्या दोन्ही मुलींना चुलत्याच्या घरी सोडून गेल्यानंतर चुलत्याने व त्याच्या मित्राने सख्या पुतणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार एका समाजसेविकेच्या निदर्शनात आल्यानंतर आरोपींविरोधात खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आहे. त्यानुसार चुलता आणि त्याच्या मित्रास अटक केली आहे.

19:28 January 22

नागपुरात लिव्ह-इन पार्टनरच्या 12 वर्षांच्या मुलीवर वर्षभर केला बलात्कार; आरोपी अटकेत

नागपूर - आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या 12 वर्षांच्या मुलीवर एका वर्षाच्या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नागपुरात ही घटना घडली आहे.

19:13 January 22

छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्मासाठी नव्हे, तर सत्तेसाठी लढाई - आमदार अबू आझमी

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्मासाठी नव्हे, तर सत्तेसाठी लढाई होती. मात्र सध्या सत्तेवर असलेले सरकार विकासाचं राजकारण नाही तर हिंदू-मुस्लीम यांच्यात तेढ निर्माण करून मुस्लिमांचा चुकीचा इतिहास समोर आणून हिंदूंची दिशाभूल करून सत्ता टिकवायची असल्याचा आरोप करत आमदार अबू आझमी यांनी भाजप - शिंदे गटावर निशाणा साधला, ते भिवंडीत एका कार्यक्रमासाठी आज आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सध्याच्या राजकीय घडामोडीवर टीका केली आहे.

18:49 January 22

उद्धव ठाकरेंनी शक्तीप्रदर्शन केलं तरी काही फायदा होणार नाही - बावनकुळे

अकोला - ज्यावेळेस तुमच्याकडे अधिकार होता तेव्हा तुम्ही काहीच केलं नाही. आता किती शक्ती प्रदर्शन केलं तरी इकडे संताजी धनाजी सारखे दोन सरदार आहेत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी आणि आता ते त्यांना पाण्यामध्ये दिसतायेत. त्यामुळे हे दोन सरदार 18, 18 तास महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी काम करीत आहेत. त्यामुळे कितीही शक्तिप्रदर्शन केले कितीही उड्या मारल्या तरीही काही होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज अकोल्यात बोलत होते.

17:36 January 22

इंजिनिअरिंग आणि मेडिकल विषयांचा मातृभाषेत अभ्यास करण्याचा पर्याय; पंतप्रधानांची घोषणा

भारतात अनेक भाषा आहेत ज्या आपल्या सांस्कृतिक जीवनात भर घालतात. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक प्रयत्न करत आहे, ज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यक यांसारख्या विषयांचा मातृभाषेत अभ्यास करण्याचा पर्याय देण्यात आला आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.

16:50 January 22

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांशी संवाद

23 जानेवारी हा बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती दिवस. हा दिवस सर्वच शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. राज्यभरातील तमाम शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मुर्तीस्थळाचे दर्शन घेत असतात. याच दिवसाचं औचित्य साधत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या सायंकाळी सहा वाजता शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. उद्या सायंकाळी सायन येथील षमुखानंद हॉल येथे उद्धव ठाकरे यांनी जाहीर मेळावा ठेवला आहे.

16:39 January 22

सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दोन सूचना केल्या तर बर होईल; बावनकुळे यांचा संजय राऊतांना टोला

नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी शरद पवार यांच मार्गदर्शन घेत असतो .या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना आज बुलढाण्यात माध्यमांनी विचारलं असता. त्यांनी महाराष्ट्रातील ही संस्कृती आहे की जे चांगलं आहे ते स्वीकाराला पाहिजे .आणि शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे जर काही त्या सूचना देत असतील तर सत्तेत असणाऱ्यांच ते काम आहे की त्या स्वीकाराव्या तसेच सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा दोन सूचना देवेंद्रजी किंवा एकनाथजी यांना केल्या तर त्या योग्य होतील. असाही खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना लगावला

16:18 January 22

मुंबई पोलिसांनी गोवंडी परिसरात दोन ड्रग्ज तस्करांना केली अटक

मुंबई पोलिसांनी गोवंडी परिसरात दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून २३ लाख रुपयांचा ड्रग्ज जप्त केला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15:41 January 22

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कल्याण पडघा रोड येथे मोठी कारवाई

दमण व हरियाणा मधून बनावट दारूचा साठा महाराष्ट्रात तस्करी करत असलेले 291 बॉक्स बनावट मद्यासह बीएमडब्ल्यू कार केली जप्त

जुन्या कपड्यांच्या गोण्यात दारूचे बॉक्स गुंडाळून होत होती तस्करी

56 लाख 75 हजार 640 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह दोघांना आरोपीना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करत मुख्य आरोपीचा शोध केला सुरू

संदीप दावणी हनुमंत ठाणगे असे या आरोपीची नावे

14:55 January 22

वनीतील जुनाड खदानीत यंत्राला भीषण आग

यवतमाळच्या वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असून जुनाड कोळसा खाणीत ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या यंत्राला काम सुरू असताना अचानक पीसि मशीनला आग लागल्याची घटना घडली आहे.

वणी तालुक्यातील जुनाड खदान येथे माती उचलण्याचा ठेका दिला असुन अचानक सकाळच्या सुमारास पीसी मशीन ला आग लागल्याने तारांबळ उडाली. दरम्यान घटनास्थळी इतर वेकोलीतील मशीन दाखल होऊन तेथीलच माती टाकून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. वेकोलीत ठेकेदारीने काम करणाऱ्या व कोट्यवधींची उलाढाल असलेल्या वेकोलीत ठेकेदारीच्या सुरक्षेच्या सोयी दिसून येत नसून अग्निशमन विभाग सुद्धा मावळला की काय? असाच कयास लावण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून पीसी मशीन चे मात्र मोठे नुकसान झाले आहे, ही आग मशीन ला जास्त प्रेशर झाल्याने शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

14:05 January 22

पंजाबमध्ये एक मोठी फिल्म सिटी स्थापन करण्याचा आमचा विचार-भगवंत मान

पंजाबमध्ये एक मोठी फिल्म सिटी स्थापन करण्याचा आमचा विचार आहे. मी मुंबईतील फिल्म स्टुडिओला पंजाबमध्येही स्टुडिओ स्थापन करण्याची विनंती करेन. पंजाबी चित्रपट उद्योग आणि बॉलीवूड यांना जोडण्यासाठी मी येथे आलो आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले.

14:04 January 22

सानिया मिर्झाचा महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव

ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया मिर्झाला पराभवाचा सामना करावा लागला.

14:03 January 22

काही लोक बीबीसीला सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त मानतात-किरेन रिजिजू

भारतातील काही लोक बीबीसीला सर्वोच्च न्यायालयापेक्षा जास्त मानतात, अशी टीका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बीबीसीच्या माहितीपटावर केली आहे.

ऑस्ट्रेलियन ओपन: महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया मिर्झाला पराभवाचा सामना करावा लागला

पंजाबमध्ये एक मोठी फिल्म सिटी स्थापन करण्याचा आमचा विचार आहे. मी मुंबईतील फिल्म स्टुडिओला पंजाबमध्येही स्टुडिओ स्थापन करण्याची विनंती करेन. पंजाबी चित्रपट उद्योग आणि बॉलीवूड यांना जोडण्यासाठी मी येथे आलो आहे: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबईत

13:35 January 22

एक कोटी तीस लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने जवळपास एक कोटी तीस लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी कांदिवली युनिटने एका 26 वर्षीय इसमाला अटक देखील केली आहे.

12:36 January 22

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर प्रकरणात ३ हजार पानांचे तयार केले आरोपपत्र

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकर प्रकरणात 3000 पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. यात 100 साक्षीदार सूचीबद्ध करण्यात आले आहे.

12:33 January 22

आयएसएफ (इंडियन सेक्युलर फ्रंट) कार्यकर्ते आणि कोलकाता पोलीस यांच्यांत संघर्ष

कोलकातामधील एस्प्लानेड परिसरात आयएसएफ (इंडियन सेक्युलर फ्रंट) कार्यकर्ते आणि कोलकाता पोलीस यांच्यात संघर्ष झाला.

12:13 January 22

भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांच्या कुटुंबियांना ५० टक्के रकम भरण्याचे आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने हरियाणातील भाजप नेते कुलदीप बिश्नोई यांच्यासंदर्भात महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची कंपनी सेठ एंटरप्रायझेस प्रा. लि., फार्महाऊस भाडेतत्त्वावरील विवाद प्रकरणात50% रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिली आहेत.

12:13 January 22

मोदी नाराज होतील, असे ममता बॅनर्जी काहीही करू शकत नाहीत-काँग्रेस

मोदी नाराज होतील, असे ममता बॅनर्जी काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे मोदी काँग्रेसमुक्त भारत तेव्हा ममताजीही काँग्रेसमुक्त भारत करण्याविषयी बोलतात. भारत जोडो यात्रेचे अनेकांनी कौतुक केल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिरंजन यांनी सांगितले.

11:38 January 22

ठाकरेंसोबत युतीसाठी बोलणी सुरू -प्रकाश आंबेडकर

काँग्रेस व राष्ट्रवादीने आम्हाला नाकारले आहे. ठाकरेंसोबत युतीसाठी बोलणी सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

11:27 January 22

क्रिप्टोकरन्सीच्या मुल्यात आणखी घसरण

अधिक मोठ्या क्रिप्टो कंपन्या व्यवसायातून बाहेर पडल्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या मुल्यात घसरण होत आहे.

11:26 January 22

23 जानेवारीला 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार होणार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 23 जानेवारी रोजी विज्ञान भवनात ज्ञान पुरस्कार सोहळ्यात 11 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करतील.

11:16 January 22

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन, ही झाली चर्चा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना फोन करून चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल' चिंता व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे आश्वासन दिले. आम्ही चौकशी करू आणि अशा कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत याची काळजी घेऊ,असे म्हटल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून दिली.

11:10 January 22

अंबाझरी आणि गोरेवाडा तलावांमध्ये वार्षिक आशियाई जलपक्षी गणना सुरू, पक्षी तज्ज्ञांसह ५९ लोकांचा सहभाग

नागपूर शहराच्या बाहेरील अंबाझरी आणि गोरेवाडा तलावांमध्ये वार्षिक आशियाई जलपक्षी गणना सुरू आहे. महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांची स्थिती आणि पक्ष्यांच्या प्रजातींची लोकसंख्या नोंदवण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात ही जनगणना केली जाते. नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या या गणनेत पक्षी तज्ज्ञांसह ५९ लोक भाग घेत आहेत. प्राथमिक आकडेवारीनुसार, या वर्षी अधिवास, हवामानातील बदल आणि किमान स्थलांतराचे नुकसान झाल्याची माहिती मानद वन्यजीव वॉर्डन अविनाश लोंढे यांनी दिली आहे.

10:05 January 22

शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत-संजय राऊत

टीका करणाऱ्यांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी केले.

08:06 January 22

दुबईच्या राजघराण्याचा सदस्य असल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीला अटक

दिल्ली पोलिसांनी आरोपी महमेद शरीफ याला अटक केली आहे. त्याने स्वत:ला दुबईच्या राजघराण्याचा सदस्य म्हणून दाखवले आणि नवी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलची 23.46 लाख रुपयांची फसवणूक केली. आरोपीला 19 जानेवारी रोजी दक्षिण कन्नड, कर्नाटक येथून अटक करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

07:33 January 22

बागेश्वरबाबाच्या समर्थनार्थ हिंदू संघटना आज जंतरमंतरवर आंदोलन, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतीदेखील दिले आव्हान

बागेश्वरबाबाच्या समर्थनार्थ हिंदू संघटना आज जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बागेश्वर शास्त्रींना चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत. दुसरीकडे ज्योतिषीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जोशीमठातील भूस्खलन थांबवा, असे आव्हान बागेश्वरबाबाला दिले आहे.

07:06 January 22

अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी, कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

औरंगजेबला पाठिंबा दिल्याबद्दल समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू असीम आझमी यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. आयपीसीच्या कलम ५०६ (२) आणि ५०४ अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

07:02 January 22

शिंगणापूरमध्ये एक कोटीचा सुवर्ण कलशदान

शनी शिंगणापूरमध्ये मौनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. भाविकाने एक कोटीचा सुवर्ण कलशदान दिला आहे.

07:02 January 22

रेल्वे कर्मचाऱ्याकडून रेल्वेत महिलेचा विनयभंग, आरोपीची तुरुंगात रवानगी

उत्तर प्रदेशमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करताना रेल्वे कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची तक्रार एका महिला प्रवाशाने दिली आहे. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे

07:01 January 22

कोची विमानतळावर एका प्रवाशाकडून 47 लाख रुपये किमतीचे सोने जप्त

सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने काल कोची विमानतळावर एका प्रवाशाकडून 47 लाख रुपये किमतीचे 955.14 ग्रॅम सोने जप्त केले.

07:01 January 22

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात अल-शबाबचे 30 सैनिक ठार

सोमालियामध्ये अमेरिकेने मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात अल-शबाबचे 30 सैनिक ठार झाले आहे.

06:38 January 22

Breaking News : कोकण शिक्षक मतदार निवडणुकीसाठी युतीची वज्रमूठ

मुंबई : राज्यात झालेल्या सत्तातरानंतर भाजप आणि शिंदे गट प्रथमच शिक्षक मतदार निवडणुकीला सामोरे जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक मतदार निडवणुकीची रणधुमाळी बघायला मिळत आहे. कोकण शिक्षक मतदार निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाचा मेळावा ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे संप्पन झाला. यावेळी युतीची वज्रमूठ पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट सज्ज असून निवडणुकीसाठी हा मतदारसंघ युतीला काबीज करण्यासाठी पुन्हा संधी मिळाली असल्याने दोघांनी कंबर कसली आहे.

Last Updated : Jan 22, 2023, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.