मुंबई - नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर रात्रभर घराबाहेर असतात. त्यांच्यासाठी बेस्टने अतिरिक्त बसेस चालवल्या तसेच ओपन डेक बस चालवली. ओपन डेक बसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहाटेपर्यंत १५७८ प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामध्यामातून बेस्टला २ लाख ३९ हजार ९५० रुपये महसूल मिळाला आहे.
Breaking News : नवीन वर्षाचा पहिलाच दिवस घातवार; राज्यात विविध घटनांत 5 जणांचा मृत्यू - ईटीव्ही भारत ब्रेकिंग न्यूज
19:26 January 01
नव वर्षाच्या स्वागत, ओपन डेकमधून बेस्टला अडीच लाखांचा महसूल
19:26 January 01
नवीन वर्षाचा पहिलाच दिवस घातवार; राज्यात विविध घटनांत 5 जणांचा मृत्यू
नवीन वर्षाचा पहिलाच दिवस घातवार ठरला आहे. राज्यात विविध घटनांत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक स्फोटात दोन तर सोलापूर स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
18:02 January 01
बार्शीतील फटका फॅक्टरीत स्फोट; तीन महिला कामगारांचा मृत्यू
बार्शीतील फटका फॅक्टरी आज स्फोट झाला. यात तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
18:02 January 01
काबूल मिलिट्ररी विमानतळावर स्फोट; 10 जणांचा मृत्यू
काबूल मिलिट्ररी विमानतळावर स्फोट झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
17:39 January 01
नाशिक जिंदाल स्फोट घटनेत सरकार सर्वपरी मदत करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद - इगतपुरी जवळील जिंदाल येथे लागलेल्या आगीत तेरा जण जखमी असून, त्यांना खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन जण अत्यावश्य अवस्थेत आहेत, अजून दुसऱ्या ठिकाणी तीन कामगार अडकले असून त्यांना तातडीने मदत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून हेलिकॉप्टरने देखील मदत केली जाणार आहे. सरकार सर्वपरी मदत करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली. कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी इगतपुरी येथील घटना घडल्यामुळे त्यांनी भाषण न करता औपचारिक उद्घाटन करून ते मुंबईकडे रवाना झाले.
17:02 January 01
नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग; दोन ठार तर 14 गंभीर जखमी

16:17 January 01
पिंपरी चिंचवडमध्ये 20 ते 22 वाहनांची अज्ञातांनी केली तोडफोड
पिंपरी चिंचवडमध्ये नव वर्षाचा पहिला दिवस उजडण्यापूर्वीच गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. रात्रभर पार्ट्या रंगणार असल्याने शहरभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. अशात ही समाजकंटकांनी 22 वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना वाकड पोलिसांच्या हद्दीत घडली. रिक्षातून आलेल्या चौघांनी दगड, सिमेंट ब्लॉकने परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या तर घराबाहेर उभ्या असणाऱ्या दुचाकींची मोडतोड केली.
15:35 January 01
वसईत नवंवर्षाच्या पहिल्याच दिवशी कार व ट्रकमध्ये अपघात
वसई - नवीन वर्षाच्या आज पहिल्याच दिवशी वसई पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या अंबाडी पूलावर पाण्याचा टँकर व कार मध्ये भीषण अपघात घडला..या अपघातात टँकरची कारला जोरदार धडक बसल्याने कारच्या पुढच्या बाजूचा चुरा झालेला पाहायला मिळाला...अपघातग्रस्त कार ही हुंडाई वेनू कंपनीची असून काल थर्टी फर्स्टची पार्टी पूर्ण करून यातील चार तरुण आज सकाळी 11 च्या सुमारास महामार्गाच्या दिशेने रश ड्रायव्हिंग करत जातं होते..याच दरम्यान वसई पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणंपुलावर ओव्हर टेकिंग च्या नादात त्यांनी पाण्याने भरलेल्या टँकरला समोरून जोरदार धडक दिली..सुदैवाने कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही..
15:35 January 01
नवं वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यातील जनतेला शुभेच्छा
नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे २०२३ हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
15:34 January 01
संजय राऊत याचे राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य
संजय राऊत ( Shivsena Leader Sanjay Raut) यांनी राहुल गांधींबाबत (Sanjay Raut on Rahul Gandhi) मोठा दावा केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला आहे, त्यामुळे त्यावर मत मागता येणार नाही, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. तसेच भारत जोडो यात्रेने (Sanjay Raut on Bharat Jodo Yatra) राहुल गांधींना एक वेगळी औळख निर्माण करून दिली आहे. हे वातावरण असेच राहिले तर 2024 मध्ये सत्ता बदल होईल, असे भाकीत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
13:01 January 01
इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याने भीषण आग
इगतपुरीच्या जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. २५ गावे हादरली आहेत.
12:04 January 01
मुंबा देवी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
मुंबईतील मुंबा देवी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
11:21 January 01
महिला प्रशिक्षकाच्या तक्रारीनंतर हरियाणाच्या क्रीडा मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल
हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला प्रशिक्षकाच्या तक्रारीनंतर (फाइल फोटोमध्ये) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
10:46 January 01
मॉडेल उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा- चित्रा वाघ यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी
मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या मॉडेल उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था सत्यनारायण यांची भेटदेखील घेतली आहे.
09:40 January 01
ज्येष्ठ नागरिक सेवागृहाला लागलेल्या आगीत दोन महिलांचा जळून मृत्यू
नवी दिल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सेवागृहाला लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला. आगीचे कारण शोधले जात असल्याचे नवी दिल्लीचे ( दक्षिण ) पोलीस उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले.
09:35 January 01
मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हच्या 127 प्रकरणांची आणि रॅश ड्राइव्हिंगच्या 63 प्रकरणांची नोंद
थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हच्या 127 केसेस आणि रॅश ड्राइव्हिंगच्या 63 केसेस नोंद केल्या आहेत.
09:19 January 01
2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसचा सुपडा साफ करेल- शिवराज सिंह चौहान
'मन बहलाने को राहुल ख्याल अच्छा है' अशा शब्दात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खिल्ली उडविली आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसचा सुपडा साफ करेल हे मी लिखित स्वरूपात देऊ शकतो, असा दावा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला.
08:51 January 01
चीनला कठीण आव्हाने सामोरे जावे लागत आहे- शी जिनपिंग
कोविड-19 च्या नवीन टप्प्यात चीनला कठीण आव्हाने सामोरे जावे लागत आहे. याबाबतची कबुली चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे.
08:24 January 01
भीमा-कोरेगाव लढाईच्या 205 व्या वर्धापनदिनानिमित्त मोठी गर्दी
भीमा-कोरेगाव लढाईच्या 205 व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील भीमा कोरेगाव येथे मोठ्या संख्येने लोक जमले आहेत.
08:02 January 01
राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री १.१९ च्या सुमारास भूकंपाचे धक्के
राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री १.१९ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणातील झज्जरमध्ये नवीन वर्षाच्या मुहूर्तावर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.8 इतकी मोजण्यात आली आहे.
06:57 January 01
आरएसएस मुख्यालयालयाला कोणताही धोका शक्य नाही-नागपूरचे पोलीस आयुक्त
आरएसएस मुख्यालय ही एक महत्त्वाची संस्था आहे. त्यात आधीच राज्य आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सींची एकत्रित टीम आहे. कोणतीही धमकी शक्य नाही आणि जर असे घडले तर आम्ही ते निष्फळ करण्यास तयार आहोत, असे नागपूरचे सीपी अमितेश कुमार यांनी सांगितले.
06:56 January 01
06:56 January 01
06:32 January 01
Breaking News : नववर्ष स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रक्तदान
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान केले. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबयांनी सुरू केलेल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले.