ETV Bharat / state

BREAKING : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला - अनिल परब आणि ईडी

breaking Update
breaking Update
author img

By

Published : Sep 29, 2021, 6:33 AM IST

Updated : Sep 29, 2021, 6:41 PM IST

18:39 September 29

सचिन वाझेचा विनंती अर्ज मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला

मुंबई - बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा विनंती अर्ज मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळला आहे. बायपास शस्त्रक्रियेमधून बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैद ठेवण्यासाठीची मागणी करणारा हा विनंती अर्ज होता.  

मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने बडतर्फ पोलिस अधिकारी सचिनवाझेची "बायपास शस्त्रक्रियेमधून बरे होण्यासाठी राहत्या घरी नजरकैद ठेवण्यासाठी चा मागणी करणारा विनंती अर्ज फेटाळला. सचिन वाजेला तुरुंगातील रुग्णालयाच्या कक्षात ठेवण्यात येईल. घरगुती जेवणाची परवानगी असेल आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा जे.जे रुग्णालयामध्ये नेले जावे, असे मुंबई विशेष एनआयए न्यायालयाने सांगितले.  

18:08 September 29

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला गेले. अमरिंदर सिंह कालच अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांची काल भेट झाली नाही. अमरिंदर सिंह भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला त्यामुळे उधाण आले आहे. 

13:59 September 29

मुंबई महापालिकेत प्रत्यक्ष सभा घ्यावी, भाजप नगरसेवकांची निदर्शने

मुंबई - मुंबई महापालिकेची सभा ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष सभा बोलवावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आंदोलन सुरु केले आहे. भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाबाहेर ठिय्या सुरु केले असून प्रत्यक्ष सभेची मागणी केली आहे. या सभांना पत्रकारांनाही प्रवेश दिला पाहिजे अशीही भाजप नगरसेवकांची मागणी आहे. 

13:23 September 29

चक्रीवादळ गुलाबचा फटका; महाराष्ट्रात अतिवृष्टीचे 13 बळी

12:49 September 29

गुलाब चक्री वादळामुळे नुकसानीचे ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करा, हेक्टरी 25 हजार मदत द्या - चंद्रशेखर बावनकुळे

गुलाब चक्री वादळामुळे मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळाच्या प्रभावाने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके पाण्याखाली गेली. या सर्व नुकसानीचे तात्काळ ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करून हेक्टरी 25 हजार देण्याची मागणी भाजपचे माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केली.

12:20 September 29

मांजरा नदीचे पाणी पुलावर; लातूर- नांदेड राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

*पावसाचा जोर वाढल्याने मांजरा नदीवर पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदेड- लातूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

*नांदेडहून सोलापूरला MH-CET परीक्षेला जाणारे 150-200 विद्यार्थी अडकले

11:55 September 29

एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार - उदय सामंत

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

11:33 September 29

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणातून टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग करणार

नाशिक मान्सून अपडेट-

-गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस.

-गंगापूर धरणातून टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग करणार.

-गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीला पूर येण्याची शक्यता

-गोदावरी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.

-नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये-जिल्हाधिकारी सुरज मांढरे

11:13 September 29

खासदार भावना गवळी यांना ईडीने बजावले समन्स

यवतमाळ - येथील शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 'महिला उत्कर्ष प्रतिष्ठान'मध्ये बदल करून त्याचे 'महिला उत्कर्ष आस्थापना'मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. या प्रकरणी आस्थापनाचे संचालक सईद खान यांची काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने ('ईडी'ने) चौकशी केली होती. त्यानंतर 'ईडी'ने २७ सप्टेंबरच्या रात्री सईद खान यांना अटक करत 2 ऑक्टोबर पर्यंत कस्टडीत घेतले आहे. तर आता खासदार भावना गवळी यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे.

10:16 September 29

मुंबई शहर आणि उपनगरात आज गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. तसेच  हवेचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

09:30 September 29

मुंबईत आज सकाळी कोसळल्या पावसाच्या सरी, ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा इशारा

09:29 September 29

जायकवाडी धरणाचे दरवाजे 11 वाजताच्या सुमारास उघडणार, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

09:06 September 29

मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन, पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

जालना - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शहागड येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी मुख्य आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. मनोज जरांगे पाटील आणि एका कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते शहागड येथील गोदावरी नदीपात्रात हे कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करणार होते. मराठा आरक्षण आंदोलनातील शहीद झालेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार होते.

06:13 September 29

आमदार सुहास कांदेंना धमकी देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा- मंत्री छगन भुजबळ

मुंबई - महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदे यांना मिळालेल्या धमकीचे प्रकरण गंभीर असून तात्काळ दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. 

Last Updated : Sep 29, 2021, 6:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.