ETV Bharat / state

सत्तेचा 'पेच' कायम, शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली
author img

By

Published : Nov 7, 2019, 10:27 AM IST

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी 11:30 वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत जाणून घेणार आहेत. यावेळी शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.

दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. अपक्षांच्या पाठिंब्यानेही भाजपला खुर्ची मिळवण्याची जादू करणं मुश्किल आहे. मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे.

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं आहे. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहेत. आमदारांमध्ये फूट पडू नये, यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये, यासाठी ही रणनीती शिवसेनेकडून वापरली जात असल्याचं दिसत आहे.

Intro:Body:
mh_mum_bjp_gov_meeting_timechange__mumbai_7204684

सत्तेचा 'पेच' कायम
शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

मुंबई:उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी साडेअकरा वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत आजमावून पाहणार आहेत. बैठकीमध्ये शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.
दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. अपक्षांच्या पाठिंब्यानेही भाजपला खुर्ची मिळवण्याची जादू करणं मुश्किल आहे.

मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे.

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये, यासाठी हीच रणनीती शिवसेनेकडून वापरली जात असल्याचं दिसत आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.