ETV Bharat / state

राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या - बिग ब्रेकिंग

MH BIG BREAKING
बिग ब्रेकिंग
author img

By

Published : Jul 13, 2021, 8:32 AM IST

Updated : Jul 13, 2021, 10:17 PM IST

22:15 July 13

राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई - उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच आहे. आज पुन्हा एकदा महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारने आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ओ. पी. गुप्ता, रुबल अग्रवाल, दीपककुमार मीना, राहुल रेखावार, दौलत देसाई अशा अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

21:07 July 13

लसींचे दोन डोस घेतलेल्या विमान प्रवाशांसाठी मुंबईत येताना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची नाही

मुंबई - मुंबईत विमानामार्गे येणाऱ्या प्रवाशांनी जर भारतातील लसीचे दोन डोस घेतले असतील तर अशा प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची नाही. राज्याच्या मुख्य सचिवांना पालिका आयुक्तांनी यासंदर्भातले पत्र लिहिले आहे. यामुळे देशातून लसीचे दोन डोस घेऊन मुंबईत येणाऱ्या विमान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

19:13 July 13

१५ हजार ७११ पदांच्या भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार; मंत्रालयात झाली बैठक

मुंबई - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या भरती तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाला दिल्या आहेत. तसेच राज्यातील विविध विभागातील १५ हजार ७११ पदांच्या भरतीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याच्या सूचना देखील उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

17:52 July 13

मुंबईत अडीच लाख झाडं लावली; मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती

मुंबई - पाच एलिमेन्टवर काम सुरू आहे. मुंबईत अडीच लाख झाडं लावली आहेत. तसेच कार्बंडायमुक्त पुणे हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. माझी वसुंधरा उपक्रमातून पाणी वाचवलं जात आहे. इलेक्ट्रॉनिक वाहने ही केंद्राची आणि राज्याची पॉलिसी आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या पॉलिसी राबवल्या जात आहेत. जगात बदल होतोय, त्यात महाराष्ट्र मागे राहू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  

17:02 July 13

एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर अजित पवारांची बैठक

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2019 ला 413 पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मात्र नियुक्ती देण्यात आली नव्हती. अशातच नाउमेद होऊन पुण्यामधील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर एमपीएससीचा मुद्दा पुढे आला होता. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. 

16:49 July 13

पंकजा मुंडे नाराज नसून, त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्यास सांगितले - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर -  पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना राजीनामे परत घेण्यास सांगितले आहे. भाषणात जरी त्यांनी कौरव, पांडव, धर्मयुद्ध असे काही शब्द वापरले असले किंवा असे काही दृष्टांत दिले असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना काय संदेश दिले, काय निर्देश दिले हेच राजकीय दृष्टीने महत्वाचे आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.  

16:46 July 13

पंढरपूरला कोणी कोणाला घालवले हे दीड वर्षांपूर्वी सिद्ध झाले; उदय सामंत यांचा आशिष शेलार यांना टोला

कोल्हापूर - पंढरपूरला कोणी कोणाला घालवले हे दीड वर्षांपूर्वी सिद्ध झाले, असे म्हणत भाजपच्या आशिष शेलार यांना मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे. कोण कितीही पक्ष वाढवू दे त्यांना पंढरपूरला घालवणार, असे आशिष शेलार म्हणाले होते. सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे, असे उदय सामंत म्हणाले. उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या मुलाखतीत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे. यावर बोलताना सामंत म्हणाले, मुख्य प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली या मुलाखती झाल्या. तज्ज्ञांनी निवड केल्यानंतर असे आरोप होणे म्हणजे दुर्दैव आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  

16:33 July 13

पक्ष वाढवण्यासाठी शिवसंपर्क अभियान ही मोहीम राबवली - उदय सामंत

कोल्हापूर - शिवसंपर्क अभियान हे बारा दिवसांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी ही मोहीम राबवली असून, त्याचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूर दौऱयावर आलो असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.  

15:25 July 13

इंधन दरवाढीविरोधात ठाण्यातील युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन

ठाणे - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात ठाण्यातील युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल पंपच्या बाहेर नौका बोट घेऊन भर पावसात आंदोलन केले. 'भाजपाके जुमलो कि बारिश में  बह मत जाना' अशा प्रकारे नौकेवर बॅनरबाजी करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष  सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षते खाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. 

14:08 July 13

ठाणे - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात युवक कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपच्या बाहेर नवखा घेऊन भर पावसात आंदोलन  

  • महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन
  • आंदोलनकर्त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले
  • जोपर्यंत इंधनाचे दर कमी होत नाही तोपर्यंत युवक कॉंग्रेस असेच रस्त्यावर येऊन आंदोलन करणार

14:08 July 13

रत्नागिरी - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीचं पत्र

  • जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज पुरवठा प्रकरणात पत्र
  • ईडीकडून बँकेला आला मेल
  • 15 तारखेपर्यंत माहिती देण्याचे आदेश
  • ईडीच्या पत्राबाबत चेअरमन तानाजीराव चोरगे यांचा दुजोरा

14:08 July 13

नागपूर - ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर आज नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौकात टायर पेटवून रस्ता जाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय ओबीसी एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी केला.

  • तुर्तास राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुका रद्द झाल्या असल्याने सरकारकडे वेळ आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावणे शक्य असल्याने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. देशात 55% ओबीसी असून त्यांची जनगणना होणे आवश्यक आहे. त्याशिवाय आरक्षण आणि इतर समस्या मार्गी लागणार नाहीत. केंद्रसरकर ओबीसींना न्याय देऊ इच्छित नाही. त्यामुळे केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी आंदोलन करत असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

14:08 July 13

नागपूर - नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत एका वीज कर्मचाऱ्याची 40 लाखांची फासवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. वीज कर्मचाऱ्याने लहान भावासाठी वधू शोधण्यासाठी एका मेट्रोमनी वेबसाईटवर अकाऊंट तयार केले होते. या अकाऊंटवर न्यू जर्सी अमेरिका येथील सुचिता दास संपर्क साधला होता. सुचिताने वीज कर्मचाऱ्यासोबत चॅटिंग केली. तिने त्यांच्या लहान भावासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने आपले कुटुंबीय धनाढ्य असून लग्नात कोणतीही भेटवस्तू घेण्यास नकार दिला. इतकेच नाही तर 1 लाख डॉलर रुपये कुरियरने भेट देण्याची बतावणी केली. दिल्लीहून कथित कस्टम अधिकारी तथा महिमा शर्मा नावाच्या महिलेसह अनेकांचे फोन येऊ लागले त्यांनी सुनीलला तुमचे पार्सल दिल्लीला पोहोचल्याचे सांगितले. ते पार्सल दिल्ली एअरपोर्टवरील कस्टम ऑफिसमध्ये अडकले असून कस्टम ड्युटी द्यावी लागणार असल्याचे सांगत ४० लाखांची फसवणूक केली आहे.

14:08 July 13

मुंबई - झोटिंग कमिटीचा अहवाल सरकारला सापडत नाही

  • भोसरी जमीन खरेदी संदर्भातील झोटिंग कमिटीचा अहवाल
  • एकनाथ खडसे यांना झोटिंग कमिटीने दिली होती क्लीन चिट
  • कमिटीचा अहवाल ईडीकडे सादर करावयाचा होता
  • मात्र, अहवाल मिळाला नाही. तर, खडसेच्या अडचणीत होणार वाढ

13:08 July 13

आज मी केंद्रीय मंत्री नसले तरी राष्ट्रीय मंत्री आहे ना - पंकजा मुंडे

13:08 July 13

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सकारात्मक आणि सन्मानजनक बैठक झाली. 

13:07 July 13

मी मंत्रिपदासाठी राजकारणासाठी आली नाही. 

13:06 July 13

पंकजा मुंडेंकडून कार्यकर्त्यांचे राजीनामे मंजूर 

13:03 July 13

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दबाव आणून मी काय मिळवणार - पंकजा मुंडे

13:02 July 13

मला सत्तेची लालसा नाही - पंकजा मुंडे

12:16 July 13

चंद्रपूर - जनरेटचा ब्लास्ट होऊन परिवारातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथे घडली. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

12:15 July 13

वर्धा - शिवसेना उपनेते आणि माजी राज्य मंत्री काँग्रेसच्या वाटेवर  

- हिंगणघाट मतदार संघाचे माजी आमदार अशोक शिंदे

- अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले आहे

- माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे सध्या उपनेते

- पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलल्यामुळे होते नाराज  

- शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहे

- अशोक शिंदे यांनी मुंबईत जाऊन शिवसेनापक्ष नेतृत्वा कडे गुढे बाबत न्याय मागितला असता सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नाही.  

- आज दुपारी दोन वाजता मुंबई येथे करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

- प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

12:15 July 13

गोंदिया - अ‍ॅसिड टाकून युवकाची हत्या, कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

10:23 July 13

नाशिक - करन्सी नोटप्रेस मधून 5 लाखांची चोरी

  • नोट प्रेसमध्ये चोरी झाल्याने खळबळ
  • मात्र, अद्याप पोलिसात तक्रार दाखल नाही
  • करन्सी नोट प्रेसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा

08:20 July 13

BIG BREAKING

मणिपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मकरू नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच 16 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी इम्फाळमध्ये गडकरींच्या हस्ते करण्यात आली.

Last Updated : Jul 13, 2021, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.