मुंबई - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांनी ही परिषद घेतली. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने केलेल्या तयारीबाबत अरोरा यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली.
दसरा-दिवाळी, विद्यार्थ्यांच्या परिक्षा आणि सुरक्षा दलांची उपलब्धता यांचा विचार करुनच निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या जातील. बॅलेट पेपर आता बॅलेट पेपर झाला आहे. ईव्हीएम मशीन हाच पारदर्शक मतदानासाठी उत्कृष्ट पर्याय आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करने शक्य नाही, असे सुनिल अरोरा यांनी सांगितले.
हेही वाचा - ..तर लोक आम्हाला वेडे समजतील - आदित्य ठाकरे
राज्यातील पोलीस दल, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या आहेत. त्यांच्याकडून महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणची माहिती मागवली असून, त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जातील. अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाहेर सीसीटिव्ही कॅमेरे लावले जातील. पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर येथे सुरू असलेले मदत कार्य आचारसंहितेच्या काळातही अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू राहील, अशी माहिती सुनिल अरोरा यांनी दिली. दरम्यान, निवडणुका केव्हा होतील या प्रश्नावर अरोरा म्हणाले, की टिव्हीवर तारखा जाहीर केल्या जातील.