मुंबई - विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोग येत्या दोन दिवसात निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. त्यामुळे लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यासंदर्भातला पूर्व आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी बुधवारी मुंबईत आले होते. कदाचित दसरा, दिवाळी हे सण झाल्यानंतरच या निवडणुका होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
हेही वाचा - 'वंचित' पासून दूर होणं 'एमआयएम'च्या पथ्थ्यावर पडणार?
वाजणार...वाजणार...निवडणुकीचे बिगुल वाजणार...या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. लवकरच याची घोषणा निवडणूक आयोग करणार आहे. त्याआधीच सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. निवडणूक दिवाळी आधी होणार की नंतर? यावरही सध्या चर्चा सुरू आहेत.
विधानसभा निवडणूक 2014 कार्यक्रम -
- 15 ऑक्टोबर 2014 - मतदान
- 19 ऑक्टोबर 2014- मतमोजणी
- अर्ज भरणे - 20 ते 27 सप्टेंबर 2014
- अर्ज छाननी - 29 सप्टेंबर 2014
- अर्ज मागे घेणे - 1 ऑक्टोबर 2014
- मतदान - 15 ऑक्टोबर 2014
- मतमोजणी - 19 ऑक्टोबर 2014