मुंबई Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी इथं दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील शासकीय अभिवादनाच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले. याठिकाणी अन्य मान्यवर यायला वेळ असल्यानं अजित पवार यांनी आजूबाजूच्या परिसरात फेरफटका मारला. त्यावेळी उपस्थित स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्या ऐकताच उपमुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना बोलवून घेतलं आणि सर्वांसमोरच त्यांना सूचना केल्या.
नेमकं काय घडलं : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच चैत्यभूमी इथं अभिवादन करण्यासाठी उपस्थित झाले. इतर मान्यवरांची वाट पाहत अजित पवार यांनी चैत्यभूमीवर विव्हिंग डेकची पाहणी करत फेरपटका मारला. त्यावेळी एका स्थानीक नागरिक आणि नारळी बागेत योगा करणारे अजित राणे यांनी अजितदादांना नारळी बाग गार्डनची अवस्था खूप खराब आ,हे असं सांगितलं. तसंच, एक कोटीचा निधी मंजूर झालाय. पण, स्वछता नसून झाडांना पाणी घातलं जात नाही अशी समस्या मांडली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शैलीत अजित राणे यांना उत्तर दिलं. तसंच, इक्बाल सिंह चहल यांनाही या संदर्भात जाब विचारत सर्वांसमोर झापलं. त्यावेळी इक्बाल सिंह चहल यांनी 'मी पाहतो' असं उत्तर दिलं.
पालिका जर कोट्यवधी रुपये या बागेसाठी खर्च करते. मात्र, ते दिसत का नाही? कर्मचारी कामात टाळाटाळ करतात. या आमच्या समस्या आहेत. आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर समस्या मांडल्या आहेत. मला अशा आहे लवकरच या सर्व समस्या दूर होतील, असंही त्यांनी सांगितलंय- अजित राणे
काय म्हणाले तक्रारदार : या घडल्या प्रकाराबाबत अजित राणे यांनी सांगितलं की, "मी रोज सकाळी सात वाजता या नारळी बागेत योगा, प्राणायाम करण्यासाठी येत असतो. शासनामार्फत इथं योगा मॅट देण्यात आले आहेत. मात्र, आज या योगा मॅटची अवस्था अतिशय खराब झालीय. या नारळी बागेसाठी दरवर्षी करोडोंचा निधी खर्च केला जातो. मात्र, या बागेला नियमित पाणी सुद्धा दिलं जात नाही. इथल्या झाडांची अवस्था खूप वाईट झालीय.
हेही वाचा :