ETV Bharat / state

महानंद प्रकल्पावरून विरोधक आणि सरकार आमने-सामने

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 9:32 PM IST

Mahanand Project Issue : राज्यातील महानंद हा दुग्ध प्रकल्प गुजरातला देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. (Mahanand Dairy Project) मात्र, हा प्रकल्प गुजरातला देत नसून एनडीडीबीकडे चालवायला देत आहोत. एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाही, असा दावा दुग्धविकास मंत्री विखे पाटील यांनी केला आहे. (NDDB)

Mahanand Project Issue
विखे पाटील
विखे पाटील महानंद दुग्धविकास प्रकल्पाविषयी बोलताना

मुंबई Mahanand Project Issue : राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील दुग्धविकास प्रकल्पांची शिखर संघटना आणि संस्था असलेली महानंद ही डबघाईला आल्यानं राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे चालवायला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Vikhe Patil On Mahananad) यासंदर्भात विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली असून आणखी एक प्रकल्प गुजरातला चालला आहे. राज्य सरकार हे गुजरातला प्रकल्प विकत असल्याचा आरोप केला जात आहे. (Minister Vikhe Patil)

महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न- राऊत : राज्यातील महानंद हा प्रकल्प राज्याची ओळख आहे. ही ओळख पुसण्याचा प्रयत्न आता राज्य सरकारकडून केला जात आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला देण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दररोज एक व्यवसाय गुजरातला पाठवला जात आहे. तरीही राज्यातील सत्ताधारी तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. महाराष्ट्रात दुधाचे खूप ब्रँड आहेत गोकुळ, चितळे, वारणा, प्रभात हे ब्रँड असताना राज्यात अमूल कशाला पाहिजे? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जात असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का गप्प आहेत, असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.

भविष्यात डसणाऱ्या सापाला दूध : यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले म्हणाले की, राज्यातील उद्योग बाहेर जात असताना आता दुग्ध सहकाराची जननी असलेल्या महाराष्ट्रातून महानंद सारख्या सहकारी संस्था गुजरातला चालवायला देऊन महाराष्ट्र भविष्यात असणाऱ्या सापाला दूध पाजतो आहे. राज्य सरकारने सहकाराला चालना द्यावी. महानंद हा ब्रँड राज्यात विकसित करायला काय हरकत आहे. तसे न करता महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे देऊन दिल्लीश्वरांना पायघड्या घालत आहेत. कटकारस्थानी सरकारच्या या महाराष्ट्र विरोधी कृतीला तीव्र विरोध असल्याचे मातेले यांनी सांगितले.

महानंद गुजरातला जाणार नाही - विखे पाटील : यासंदर्भात बोलताना राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महानंद गुजरातला जातो आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. महानंद राष्ट्रीय दुग्ध विकास संस्थेला चालवायला देण्याचा निर्णय महानंदाच्या संचालकांनी घेतला. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आपण राज्यातील प्रमुख दूध संस्थांना महानंद चालवायला घ्या अशी विनंती केली होती; मात्र त्याला कोणी प्रतिसाद दिला नाही. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ ही गुजरातची संस्था नाही. एनडीडीबी संस्था केवळ महानंद चालवणार आहे. त्यांच्या ताब्यात महानंद संस्था दिली जाणार नाही. ज्या पद्धतीनं जळगाव दूध संघ डबघाईला आला होता आणि एनडीडीबीने तो दहा वर्ष चालवून नफ्यात आणल्यानंतर तो परत जळगाव संघाला दिला. त्याच पद्धतीनं एनडीडीबीकडे महानंद चालवायला दिला जात असल्याचं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं आहे.

हेही वाचा:

  1. "गोध्रासारखी घटना 'येथे' होऊ शकते", राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान
  2. कुनो नॅशनल पार्कमधून आली आनंदाची बातमी! 'आशा' चित्त्यानं दिला तीन पिल्लांना जन्म
  3. धारावीनंतर आता वीज निर्मिती प्रकल्पातही अदानी? राज्यात अदानींना विरोध वाढतोय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.