मुंबई - पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ मिळून पाच जागी होणाऱ्या विधान परिषदेच्या जागांवर महाराष्ट्राचे राजकारण सध्या तापले आहे. महाविकास आघाडी, भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. नाशिक, नागपूर येथील पदवीधर मतदार संघात झालेल्या गोंधळामुळे या निवडणुकीचे महत्त्व अजूनच वाढल आहे. या निवडणुकीसोबतच पदवीधर मतदार संघात आमदार निवडणुकीची नेमकी प्रक्रिया कशी असते? त्याचे मतदार नेमके कसे ठरवले जातात? त्यासाठीचे काय निकष असतात ? या बद्दल वृत्तांत.
विधानपरिषद रचना - विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ हा सहा वर्षासाठी असतो. विधान परिषदेतून एक तृतीयांश सदस्यांची दरवर्षी निवृत्त होतात. तर तेवढेच सदस्य निर्वाचितही केले जातात. विधानसभा सदस्याच्या एक तृतीयांश सदस्य विधान परिषदेत असतात. महाराष्ट्रात अशा सदस्यांची संख्या 78 एवढी आहे. 78 पैकी 31 सदस्यांची निवड विधानसभेच्या आमदारांमार्फत केली जाते. तर 21 सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधान परिषदेवर येतात. यासोबतच सात पदवीधर मतदारसंघ तर, सात शिक्षक मतदार संघातून आमदार निवडले जातात. उर्वरित १२ सदस्य हे राज्यपाल नामनिर्देशित असतात. आता महाराष्ट्रात रिक्त झालेल्या तीन शिक्षक मतदार संघ, दोन पदवीधर मतदार संघ त्यासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे.
शिक्षक मतदार संघासाठी मतदार कसे निवडले जातात? या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पदवी कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनीयर, पॉलिटेक्निक कॉलेजचे शिक्षक मतदान करण्यास पात्र असतात.
पदवीधर मतदार संघात मतदान करण्यासाठी पात्रता - पदवीधर मतदार संघात पदवी मिळून तीन वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक पदवीधराला मतदानामध्ये मतदान करण्याचा अधिकार असतो. मतदार भारताचा नागरिक असावा, मतदार मतदार संघात रहिवाशी असावा तसेच मतदान करण्यासाठी फॉर्म क्रमांक 18 भरलेला असावा. म्हणजेच नोंदणीकृत मतदारच या निवडणुकीत मतदान करू शकतात.
पसंती क्रमाने होते मतदान - विधान परिषद निवडणुकीत थेट मतदान होत नाही. यासाठी मतदाराला पसंती क्रम दिले जातात. इच्छुक उमेदवारांपैकी पसंतीचे उमेदवारांना पहिला, दुसरा, तिसरा असा क्रमांक द्यावा लागतो. मिळालेल्या मतानुसार आयोग एक कोटा ठरवतो. त्या कोठ्यामध्ये प्रथम क्रमांकाची मते कोणाला जास्त मिळाली तो उमेदवार विजयी होत असतो. मात्र, पहिल्या पसंतीची मते ठरवलेल्या कोठ्या एवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. दुसऱ्या पसंतीची मते जो उमेदवार पूर्ण करेल तो विजय ठरवला जातो.
या मतदारसंघात होणार निवडणूक -
विभाग | मतदारसंघ | अमेदवारांचे नाव | पक्ष |
नाशिक | पदवीधर मतदारसंघ | आमदार सुधीर तांबे | काँग्रेस |
अमरावती | पदवीधर मतदार | संघ रणजीत पाटील | भाजप |
कोकण | शिक्षक मतदार संघ | आमदार बाळाराम पाटील | अपक्ष |
औरंगाबाद | शिक्षक मतदार संघ | आमदार विक्रम काळे | राष्ट्रवादी काँग्रेस |
नागपूर | शिक्षक मतदार संघ | आमदार ना गो गाणार | अपक्ष |
हेही वाचा - Sharad Pawar in Pune : विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आजच्या तरुणाईला यश मिळेल - शरद पवार