औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. सोमवारी सकाळी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना सायंकाळी पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे रुग्ण संख्या 297 वर पोहचली आहे.
MAHA CORONA : मुंबईमध्ये नवीन 510 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 9123
20:33 May 04
मुंबईमध्ये नवीन 510 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 9123
20:12 May 04
धारावीत कोरोनाचे 42 रूग्ण वाढले, कोरोनाबाधितांचा आकडा 632 वर, दिवसभरात 20 मृत्यू
20:08 May 04
औरंगाबादेत दिवसभरात कोरोनाचे 15 नवीन रुग्ण, संख्या 297 वर
20:07 May 04
कोल्हापुरात आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह ; इचलकरंजीतील 70 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण
कोल्हापूर - जिल्ह्यात आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. येथील इचलकरंजी शहरात 70 वर्षांचा रुग्ण अढळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 14 झाली आहे. एकट्या इचलकरंजी शहरात 3 कोरोनाबाधित रुग्ण आत्तापर्यंत आढळले आहेत.
20:03 May 04
सोलापुरात आज 7 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 135 वर
20:00 May 04
जळगावातील कोरोनाचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक, शासनाकडून जिल्हा प्रशासनाला विचारणा
जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या विषयासंदर्भात थेट राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला विचारणा करण्यात आली होती. जळगावातील मृत्यूदर का जास्त आहे? याबाबत चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार सविस्तर अहवाल प्रशासनाने राज्याच्या आरोग्य यंत्रणेला सादर केला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
20:00 May 04
टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा, मे अखेरपर्यंत राज्य ग्रीन झोनमध्ये हवे - मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई - विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. तसेच आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा. पण, अंमलबजावणीत कुचराई करू नये, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिले. आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी होते.
15:06 May 04
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आरोग्य प्रमाणपत्रासाठी मजुरांची गर्दी
रत्नागिरी - तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मजुरांना आपल्या घरी जाण्याची परवनागी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्रासाठी रुग्णालयांमध्ये सध्या मजुरांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही यासाठी अनेक मजुरांनी सकाळपासून गर्दी केली होती. मात्र, काही जण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे दिसून आले.
13:16 May 04
ग्रीन झोन असूनही वाशिम जिल्ह्यात दारूची दुकाने बंद; बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
वाशिम - आजपासून १७ मे पर्यंतच्या लॉकडाऊन-३ ची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कन्टेनमेंट परिसर सोडून सर्वच झोनमध्ये हेअर सलून, दारूची दुकाने, व उपहारगृहांसह इतर काही दुकानांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ग्रीन झोन असलेल्या वाशिम जिल्ह्यातील ही सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिले आहे.
11:50 May 04
जळगाव जिल्हा रुग्णालयात परप्रांतियांची गर्दी; 'सोशल डिस्टन्सिंग'चा उडाला बोजवारा
जळगाव - येथील जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून आरोग्य तपासणीसाठी परप्रांतीयांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाच वेळी शेकडो लोक एकत्र आल्याने रुग्णालय प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली. रुग्णांच्या तपासणीसाठी कोणत्याही प्रकारची सक्षम उपाययोजना केलेली नसल्याने यावेळी 'सोशल डिस्टन्सिंग'चा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.
11:26 May 04
राज्यात दारू विक्रीला परवानगी; काही ठिकाणी गर्दी तर काही भागात बंदी
मुंबई - आज राज्यात रेड झोनसह सशर्त दारू विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र, राज्यात काही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात दुकानांपुढे गर्दी तर काही भागात दुकानांना टाळे असल्याचे दिसत आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत दुकाने सुरु असणार आहेत.
11:25 May 04
कोल्हापुरात मद्यविक्री, केशकर्तनालयासह एकल दुकाने सुरू
कोल्हापूर - देशात कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये १७ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आजपासून हे लॉकडाऊन सुरू होत असून झोननिहाय काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत व्यवहार सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये बाजारपेठांमधील एकल दुकाने, रहिवासी भागातील सर्व दुकाने, उद्योग, बांधकामे, हॉटेलची पार्सल सुविधा, दुचाकी, चारचाकी यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
09:51 May 04
नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल नाही - जिल्हाधिकारी इटनकर
नांदेड - ऑरेंज झोनमधून रेड झोनमध्ये चाललेल्या नांदेड जिल्ह्यात 17 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 2 ते 3 दिवसात सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे.
09:51 May 04
धुळ्यात दोन महिलांसह व्यापाऱ्याला कोरोनाची लागण, कोरोनाबाधितांचा आकडा ३१ वर
धुळे - शहरात कोरोना विषाणूचा विळखा वाढत आहे. या आजाराचे रविवारी रात्री नऊनंतर आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या २३ झाली असून साक्रीतील चार, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ३१ वर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
09:31 May 04
नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी पुण्यात तात्पुरते कारागृह
पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून येरवडा कारागृहात दाखल होण्याऱ्या नवीन कैद्यांना ठेवण्यासाठी येरवडा परिसरातीलच एका वसतिगृहाच्या इमारतीत तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. नव्याने येणाऱ्या कैद्यांना किमान १४ दिवस या कारागृहात क्वारंटाईन केले जाईल. त्यांनतर त्यांची तपासणी करून येरवडा कारागृहात पाठवले जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.
09:31 May 04
उत्तरप्रदेशला जाणारी १२०० मजुरांची पहिली ट्रेन वसईतून रवाना
पालघर- वसईत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना आपल्या मायदेशी परतण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही ट्रेन वसई रेल्वे स्थानकातून सोडण्यात आली असून त्यात १२०० मजूर प्रवास करीत आहेत. अडकडलेल्या कामगारांच्या समस्या ओळखून सरकारने ही व्यवस्था केली आहे.
09:30 May 04
अकोल्यात रविवारी १५ कोरोनाबाधितांची नोंद, एकूण आकडा ५५ वर
अकोला - कोरोना चाचणीचे 63 अहवाल रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाले. त्यापैकी रविवारी सकाळी 12 आणि सायंकाळी 3, असे एकूण 15 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दोन मृत महिलांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५५ वर पोहोचली असून प्रत्यक्षात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आली आहे.
09:28 May 04

मुंबई - राज्यात रविवारी 115 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत राज्यभरात 2 हजार 115 रुग्ण बरे झाले आहेत. तर रविवारी नवीन 678 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 12 हजार 974 झाली आहे. तर एकूण 10 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.