ETV Bharat / state

मुंबईत गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पारा ७ अंशावर - गारपीट

दिल्लीत झालेली गारपीट, सातत्याने दिशा बदलणारे वारे आणि दोन दिवसांपासून उत्तरेकडून वाहणारे वारे यामुळे मुंबईच्या कमाल व किमान तापमानात कमालीची घट झाली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Feb 10, 2019, 2:58 PM IST

मुंबई - शहरात आजचे तापमान ११ अंशांवर पोहोचले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या थंडीने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

mumbai
प्रतिकात्मक छायाचित्र
दिल्लीत झालेली गारपीट, सातत्याने दिशा बदलणारे वारे आणि दोन दिवसांपासून उत्तरेकडून वाहणारे वारे यामुळे मुंबईच्या कमाल व किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच मुंबईचे तापमान ११ अंशांनी घटले आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पाराही पहिल्यांदाच २४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे़
undefined

मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई परिसरात सकाळपासूनच गार वारे वाहू लागले. याचा परिणाम मुंबईतील कमाल तापमानावर होऊन शुक्रवारी सांताक्रुझ परिसरात पारा २४.२ अंशांपर्यंत खाली आला होता. तर शनिवारी पहाटे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कुलाबा परिसरात १५.६ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून, कमाल तापमान २४.५ अंश सेल्सिअस होते.

विशेष म्हणजे बोरीवली नॅशनल पार्क आणि आरे परिसरात पहाटे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वातावरणातील या बदलांमुळे मुंबईकरांनी दिवसभर थंडीच्या ऋतुचा अनोखा अनुभव घेतला. दरम्यान, शनिवारपासून मुंबईत उष्ण वारे वाहणार असून, तापमान पुन्हा वाढणार आहे. परंतु १५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा पारा घसरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Intro:मुंबईत थंडीचा पारा रेकॉर्ड ब्रेक करतोय.

मुंबई

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार ११ अंशांवर यंदाच्या हंगामातील थंडीनं अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहे .या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंदही करण्यात आली आहे.
दिल्लीत झालेली गारपीट, सातत्याने दिशा बदलणारे वारे आणि दोन दिवसांपासून उत्तरेकडून वाहणारे वाऱ्यांमुळे मुंबईच्या कमाल व किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा मुंबईचं तापमान ११ अंशांनी घटलं आहे. शनिवारी कमाल तापमानाचा पाराही पहिल्यांदाच २४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यामुळं यंदाच्या हंगामातील थंडीनं अनेक रेकॉर्ड ब्रेक केले असून, या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंदही करण्यात आली आहे.

मुंबई वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई परिसरात सकाळपासूनच गार वारे वाहू लागले. याचा परिणाम मुंबईतील कमाल तापमानावर होऊन शुक्रवारी सांताक्रुझ परिसरात पारा २४.२ अंशांपर्यंत खाली आला होता, तर शनिवारी पहाटे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. कुलाबा परिसरात १५.६ इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली असून, कमाल तापमान २४.५ अंश सेल्सिअस होतं.

विशेष म्हणजे बोरीवली नॅशनल पार्क आणि आरे परिसरात पहाटे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. वातावरणातील या बदलांमुळे मुंबईकरांनी दिवसभर थंडीच्या ऋतूचा अनोखा अनुभव घेतला. दरम्यान शनिवारपासून मुंबईत उष्ण वारे वाहणार असून, तापमान पुन्हा वाढणार आहे; परंतु १५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा पारा घसरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.