ETV Bharat / state

Advertisement in Local Train : लोकलच्या डब्यात लव्ह मॅरेज, प्रेम भंगाच्या जाहिरातींचा सुळसुळाट

तुम्हाला प्रेमात अपयश आले का, तुमला लव्ह मॅरेज करायचे आहे का? असे प्रश्न उपस्थिती करीत तुमचे सगळे प्रश्न सोडविण्याचे खात्रीने सांगणाऱ्या भोंदू बाबांची जाहिराती मुंबईच्या लोकल डब्यात दिसून येत आहे. ( Advertisement in Local Train ) त्यामुळे ही मुंबईची लोकल ( Mumbai Local ) आहे की, भोंदूबाबांची जाहिराती एजेन्सी हेच लक्षात येत नाही? बहुतांश रेल्वेच्या डब्यात ही जाहिराती झळकत आहेत.

local
लोकल
author img

By

Published : Feb 28, 2022, 2:29 PM IST

मुंबई - तुम्हाला प्रेमात अपयश आले का, तुमला लव्ह मॅरेज करायचे आहे का? असे प्रश्न उपस्थिती करीत तुमचे सगळे प्रश्न सोडविण्याचे खात्रीने सांगणाऱ्या भोंदू बाबांची जाहिराती मुंबईच्या लोकल डब्यात दिसून येत आहे. ( Advertisement in Local Train ) त्यामुळे ही मुंबईची लोकल ( Mumbai Local ) आहे की, भोंदूबाबांची जाहिराती एजेन्सी हेच लक्षात येत नाही? बहुतांश रेल्वेच्या डब्यात ही जाहिराती झळकत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. वाचा, ईटीव्ही भारतने घेतलेला याबाबतचा आढावा.

local train
लोकलमधील जाहिरात

भोंदूबाबांची ‘बाबू’गिरी तर रेल्वेत वाढली -

बेकायदेशीर रित्या लव्ह मॅरेज, प्रेम भंगाच्या जाहिराती लोकल मध्ये लावणे हा एक प्रकारच्या गुन्हा आहे. यावर प्रतिबंध असूनही रेल्वे प्रशासन यावर पूर्णपणे प्रतिबंध लावू शकले नाही. या बाबांविरोधात रेल्वेने कठोर कारवाई सुद्धा करित असते. मात्र, आज भोंदू बाबांकडून लोकलच्या डब्यात जाहिरातीचे स्टिकर चिकाटीवले जात असते. त्यामुळे भोंदूबाबामध्ये रेल्वे प्रशासनाच्या काही वचक राहला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. भोंदूबाबांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यांना आळा घालण्यास राज्य शासनाला अपयशच येत आहे. तर पोलीसही हतबल दिसत आहेत. या भोंदूबाबांकडून फसवणूक होतानाच नरबळी, आर्थिक फसवणूक तसेच बलात्काराच्याही घटना घडल्या आहेत. तरीही त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होताना दिसत नाही. या भोंदूबाबांची ‘बाबू’गिरी तर रेल्वेतही सर्रासपणे वाढलेली दिसते.

जाहिरात काढण्यासाठी रेल्वेला आर्थिक भुर्दंड -

लोकल डब्यात जाहिराती चिटकविण्याचे संपूर्ण प्रकार रात्री ११नंतर सुरू असतात. जेव्हा अशा जाहिराती लोकल किंवा रेल्वे एक्स्प्रेसवर चिकटविल्या जाता तेव्हा या जाहिराती लोकलमधून काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाला स्वत:चे कर्मचारी कामाला लावावे लागतात. या जाहिराती काढण्यासाठी रेल्वेला लाखो रुपये खर्चसुद्धा येतो. जेव्हा-जेव्हा अशा जाहिराती रेल्वेच्या निदर्शनात आल्या आहे. तेव्हा त्या जाहिरातीवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून त्यांना रेल्वेकडून नोटीस देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - International flights : पुढील आदेशापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदच राहणार

आतापर्यत दहा आरोपींना अटक -

याबाबत ईटीव्ही भारतने मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, लोकलमध्ये अथवा रेल्वे परिसरात कोणतीही जाहिरात, फलक लावायचा असल्यास त्याची पूर्व परवानगी रेल्वे प्रशासनाकडून घ्यावी लागते. मात्र, कोणत्याही परवानगी विना अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा, बुवांच्या जाहिराती लावणाऱ्यांवर आमची सतत कारवाई सुरू असते. जाहिरातीतील संपर्क क्रमांकाद्वारे संपर्क साधून आतापर्यत दहा जणांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांची रात्रपाळीला गस्त वाढवली -

रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनचा महिल्या डब्यात अश्लील आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा, बुवांच्या जाहिराती लावल्याचा आम्हाला तक्रारी आल्या होता. तेव्हा आम्ही तत्काळ या जाहिरातींवरील असलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आरोपीना पकडण्यात आले आहे. याशिवाय लोकल ट्रेन रात्री जिथे उभी असते. त्या स्थानकात किंवा कारशेडमध्ये सुद्धा रात्रपाळीवर आरपीएफ जवानाची गस्त वाढवली आहेत. तसेच देखभाल दुरुस्तीसाठी लोकल ट्रेन कारशेडमध्ये जाते तेव्हा अश्लील आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या बाबा, बुवांच्या जाहिराती काढण्यात येते अशी माहिती ही जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.