वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी' टीम; अजित पवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
मुंबई - देशाच्या हितासाठी आम्ही काही पक्षांना महाआघाडीत सामावून घेऊ इच्छित होता. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केले. मात्र, तथ्यहीन कारणे देऊन आघाडी होऊ नये, यासाठी भाजपची बी-टीम कार्यरत होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता लगावला. ते आघाडीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
आघाडीचे अखेर जमले; काँग्रेस 24 तर राष्ट्रवादी 20 जागांवर लढणार, मित्रपक्षांना 4 जागा
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेस २४, राष्ट्रवादी २० तर मित्रपक्षांना ४ जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत ही घोषणा केली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील गैरहजर होते. वाचा सविस्तर
भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही - नरेंद्र भोंडेकर
भंडारा - केंद्रात आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. तरीही भंडारा-गोंदिया लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला मदत करणार नाही, असे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जाहीर करून युतीच्या राजकारणात वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा सविस्तर
पुतण्याच्या प्रचारासाठी छगन भुजबळ नाशिकमध्ये तळ ठोकून
नाशिक - लोकसभा निवडणुकीत माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहे. समीर भुजबळ यांनी गेल्या २ महिन्यापासून निवडणूकीसाठी मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. भुजबळ कुटुंबांतील सर्वांनीच प्रचारात स्वतःला झोकून दिल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर
नाईलाज म्हणून सुनिल तटकरेंना पाठिंबा- मधुकर ठाकूर
रायगड - आमचा सुनिल तटकरे यांच्यावर भरवसा नाही, परंतु काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हावे यासाठीकाळजावर दगड ठेवून, नाईलाज म्हणून सुनिल तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँगेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वाचा सविस्तर
आमच्यातला तो संवाद खासगी, अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण
या क्लिप संदर्भात बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले, की मी तो ऑडिओ टेप ऐकलेला नाही. चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल काही मतभेद आहेत. कार्यकर्ते नाराज आहेत. निवडणुकीच्या काळात अशा अडचणी येत असतात. त्या पक्ष सोडवतही असतो. पक्षाचे कार्यकर्ते आणि माझ्यातला संवाद हा खासगी आहे. तो असा पब्लिक व्हायला नको. आम्हालाही एकांत असायला हवा. वाचा सविस्तर
रणजितसिंह नाईक-निंबाळकर काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या साथीला, माढ्यातून उमेदवारीची शक्यता
सातारा - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. याची माहिती त्यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. रणजितसिंह यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचा सविस्तर
तन-मन-धनाने शिवसेना माझ्या सोबतच - आमदार प्रताप पाटील चिखलीकर
नांदेड - गेल्या १५ दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. आमचे सर्व मतभेद मिटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणेही झाले आहे. त्या दोघांनी मिळून मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खात्री आहे, की शिवसेना तन-मन-धनाने माझ्या सोबत राहील, असे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर म्हणाले. भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वाचा सविस्तर
माझ्या प्रचारात काकडेंचा 'क्रिम' रोल - गिरीश बापट
पुणे - गिरीश बापट यांना पुण्यामध्ये सातत्याने खासदार संजय काकडे यांनी विरोध केला. तसेच काकडे हे भाजपकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. बापट यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर संजय काकडे यांचा प्रचारात काय रोल असेल असे बापट यांनी विचारले असता त्यांनी काकडे यांचा माझ्या प्रचारात क्रीम रोल असेल असे उत्तर दिले. उमेदवारी घोषित झाल्यानंतर पुण्यातल्या भाजप पक्ष कार्यालयात बापट यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वाचा सविस्तर
माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, त्यामुळं मी राजीनामा देणार, अशोक चव्हाणांची क्लिप व्हायरल
चंद्रपुर - काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये रणकंदन माजले असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते विनायक बांगडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, यामुळे स्थानिक पातळीसह वरीष्ठ नेतेही नाराज असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
रवींद्र गायकवाड समर्थकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, तिकिट नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक
उस्मानाबाद - रवींद्र गायकवाड समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळीच सेनेच्या कार्यकर्त्यांनी समर्थकाला रोखल्याने अनर्थ टळला. रवींद्र गायकवाड यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वाचा सविस्तर
उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज नाही - अनिल शिरोळे
पुणे - भाजपचे नेते अनिल शिरोळे यांना लोकसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यावर बोलताना, उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज होण्याइतका मी कमजोर नसल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर
जानकरांचे पंख छाटले; बारामतीतून रासप आमदाराच्या पत्नीला भाजपकडून तिकीट
पुणे - बारामती लोकसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना टक्कर देण्यासाठी अखेर भाजपला उमेदवार सापडला आहे. भारतीय जनता पक्षाकडून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना बारामती लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. कांचन कुल यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांच्या सहयोगी पक्ष रासपचे नेते महादेव जानकर यांचे पंख छाटले आहेत. त्यामुळे आता महादेव जानकर भाजपच्या या खेळीवर काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गत निवडणुकीत बारामतीमधून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती. वाचा सविस्तर
'तुमच्या बायकोला आम्ही बायको म्हणायचे असेल तर लग्नच कशाला केले'
पुणे - भाजपने लोकसभेसाठी नुकतीच उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. यामध्येही मित्रपक्षांना जागा सोडली नसल्याने रासपचे अध्यक्ष महादेव जानकर चांगलेच संतापले आहेत. भाजपच्या या वागणुकीने अस्वस्थ झालेल्या जानकर यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांनी बैठक बोलविली होती. यामध्ये त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत ३० ते ३५ उमेदवार उतरवण्याचा इशारा भाजपला दिला. तुमच्या बायकोला जर आमची बायको म्हणायचे असेल, तर लग्नच केले कशाला? असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. वाचा सविस्तर