ETV Bharat / state

लै खास, लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी; आजचा एपिसोड - अमरावती

लोकसभा मतकंदन...

लै खास, लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी; आजचा एपिसोड
author img

By

Published : Apr 4, 2019, 2:06 PM IST

लोकसभेच्या प्रचारासाठी नेते मत व्यक्त करताना काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. तर काही वेळामजेशीर वक्तव्यही आपल्याला पहायला मिळत आहेत. ही सर्व वक्तव्येआम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. लै खास! याच्या माध्यमातून पहा आजचा एपिसोड....

लै खास, लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी; आजचा एपिसोड

लोकसभेच्या प्रचारासाठी नेते मत व्यक्त करताना काही वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. तर काही वेळामजेशीर वक्तव्यही आपल्याला पहायला मिळत आहेत. ही सर्व वक्तव्येआम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. लै खास! याच्या माध्यमातून पहा आजचा एपिसोड....

लै खास, लोकसभेच्या रिंगणात नेत्यांच्या वाणीची तलवारबाजी; आजचा एपिसोड
Intro:
अमरावती पोपटपंची
2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवार आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा कडून अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवली होती.परंतु देशात असलेली मोदी लाट आणि आणि मतदार संघात काँग्रेसने ने केलेली गटबाजी ही शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पथ्यावर पडली होती. आणि त्यांचा विजय झाला होता .2014 च्या निवडणुकीत पराभव झालेल्या नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि पराभवाचे खापर हे स्थानिक काँग्रेस नेत्यांवर फोडले होते .यातच आमदार रवी राणा यांच्या तोंडी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर याचे देखील नाव होते .मागील पाच वर्षात आमदार राणा व आमदार ठाकूर यांच्यात असलेलं राजकीय वैर उभ्या अमरावती मतदार संघाने पाहिले.पण म्हणतांत न की राजकारणात कोणी कायमचा मित्रही नसतो तर कायमचा शत्रूही नसतो हेच वाक्य सध्या आ राणा व आ ठाकूर यांच्या साठी तंतोतंत खरे ठरते त्याचे कारण असे की आ यशोमती ठाकुरांवर पराभवाचे खापर फोडून विविध आरोप करणारे आमदार रवी राणा यांनी आपली पत्नी नवनीत राणा यांना खासदार करण्याच्या हेतूने आमदार यशोमती ठाकूर यांच्या सोबत असलेल्या वादात एक पाऊल मागे घेऊन झाले गेले विसरल्याची भाषा त्यांच्या मुखातून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे .तीन दिवस पूर्वी नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत बोलताना आ यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत आ रवी राणा यांनी आ यशोमती ठाकूर यांच्यावर स्तुती सुमने उधळत आता आम्ही बहीण भाऊ असल्याचे बोलून दाखवले.
परंतु या निवडणुकीत भावासाठी बहीनीने केलेली कामगिरी किती खरी ठरणार हे निवडणूकीच्या निकाल नंतरच कळणारBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.