1.34 - डी एस के चे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे कोर्टात सुनावणी होऊन 17 ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी 10 दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती.
1.20 - परभणीत 13 कोटी रुपयांच्या नूतन बस स्थानक इमारतीचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
1.10 - रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडीचा २६ आॅगस्ट ला नाशिक येथे होणार
1.00 रक्षाबंधन निमित्त एसटी सोडणार उद्या आगार निहाय जादा गाड्या
12.40 - रत्नागिरी राज्य सरकारने केंद्राकडे मागितलेली मदत तुटपुंजी - खा. सुनील तटकरे हे सरकार संवेदनाहीन - तटकरे
12.00 - पुण्यातील कात्रज पुढील वेळू येथे एका कंपनीमधे बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगार ठार. बॉयलरमुळे लागलेली आग आटोक्यात. इतर कोणी मृत वा जखमी याचा शोध सुरु.
11.30 - सांगली आणि कोल्हापूर येथे लाखो पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडून वेळ प्रसंगी कर्ज देखील काढेल जाईल- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
11.00 - विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र जाहीर. स्वातंत्र्यदिनी प्रदान करणार पुरस्कार.
10.45 - काँग्रेसचे शिष्टमंडळ सह्याद्रीवर पोहोचले
9.30 - सांगलीत पूरग्रस्त मदत केंद्रावर भाजप नगरसेविका व पूरग्रस्तांमध्ये राडा, दोन जखमी
सांगली - शहरातील एका पूरग्रस्त मदत केंद्रावर भाजप नगरसेविका गीता सुतार व पूरग्रस्तांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. या हाणामारीमध्ये 2 जण जखमी झाले आहेत. शहरातील मराठा सेवा संघ येथे हा प्रकार घडला. यामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. सविस्तर वाचा...
9.20 - Article 370 : राहुल या मुद्द्याचे राजकारण करताहेत, त्यांना बोलावताना अटी घातल्या नव्हत्या - मलिक
जम्मू-काश्मीर - राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जम्मू-काश्मीरला येण्याचे आमंत्रण दिल्याच्या मुद्द्याचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधींनी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा घडत असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर मलिक यांनी 'राहुलजी स्वतः येथे येऊन पहा, मी तुम्हाला खास विमान देतो,' असे म्हटले होते. राहुल या आमंत्रणाचे राजकारण करत असून ते विरोधकांचे शिष्टमंडळ येथे आणू पाहत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. सविस्तर वाचा...
9. 00 - उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले
8. 30 - मुसळधार पावसामुळे उत्तर गडचिरोली भागात दुसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम असून गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-हैदराबाद, आष्टी-चंद्रपूर या राष्ट्रीय मार्गासह प्रमुख बारा मार्ग बंदच
8.15 किरकोळ वादातून पत्नीची चाकूने भोसकून हत्या, पुण्याच्या बुधवार पेठेतील आज सकाळची घटना..मीना शेख (वय 30) मृत महिलेचे नाव..तर आरोपी पती खून करून फरार...