मुंबई Mumbai Murder Case : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या तरुणीचे, दुसऱ्या तरुणांबरोबर अफेअर सुरु असल्याच्या संशयावरून, प्रियकराने तिची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये (Dead Body In Suitcase) भरला. रविवारी पहाटेच्या सुमारास कुर्ल्यातील सीएसटी ब्रिजखाली दोन बॅरिकेट्समध्ये सुटकेस टाकून आरोपी फरार झाला होता. मात्र, या सुटकेसमध्ये मृतदेह असल्याची माहिती कुर्ला पोलिसांना (Kurla Police) रविवारी सकाळी ११.३५ वाजताच्या सुमारास माहिती मिळाली होती. त्यानंतर कुर्ला येथे असलेल्या गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने हत्या करणाऱ्यास ३६ तासात अटकी केली आहे.
महिनाभर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये : मृत महिलेचे नाव प्रतिमा पावल किस्पट्टा (वय- 25 वर्षे) आहे. तर आस्कर मनोज बरला (वय २२ वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील धारावी परिसरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपीला तरुणीच्या चारित्र्यावर संशय होता. यापूर्वी मृत तरुणी घरकाम करत होती. अलीकडे ती नोकरी सोडल्यानंतर बेरोजगार होती. या कारणावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. दोघेही मूळचे ओडिसा राज्यातील रहिवासी आहेत. ओडिसातून मुंबईत कामासाठी आले होते. शनिवारी रात्री उशिरा ही हत्या करण्यात आली. आरोपीच्या घरात ही हत्या करण्यात आली.
36 तासात आरोपीला अटक : आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक ठिकाणी फिरला, पण अखेर कुर्ल्याच्या एसएलआर रोडवरील मेट्रो स्टेशनजवळील एका दगडी शेडमध्ये मृतदेह टाकला. या हत्येचे गूढ उकलल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली. एकीकडे मुंबई विश्वचषक पाहत होते, तर दुसरीकडे सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ शोधण्यासाठी मुंबई पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे 8 पथक सक्रियपणे तपास करत होते. अवघ्या 36 तासात सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकललं. या हत्येबाबत मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम ३०२ आणि २०१ अन्वये कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या हत्येची माहिती मृत महिलेच्या कुटुंबीयांनाही दिली आहे. तसेच याप्रकरणी अस्कर मनोज बरला याला अटक करण्यात आली आहे.
तरुणीच्या चारित्र्यावर घेतला संशय : 19 नोव्हेंबरला मुंबईतील कुर्ला परिसरात सीएसटी ब्रिजखाली एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला होता. माहिती मिळताच या मृतदेहाचे गूढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांची सुमारे 8 पथके तात्काळ तैनात करण्यात आली होती. अवघ्या 36 तासात मुंबई पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपी आणि मृत तरुणी गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत राहत होती. ती महिला कोठेतरी घर सांभाळण्याचं काम करत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिने ही नोकरी गमावली होती. दोघांची भेट कोरोनादरम्यान झाली होती. तेव्हापासून दोघेही मुंबईत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा दाबून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी दिली आहे.
हेही वाचा -