ETV Bharat / state

Lions Released : गुजरातचे सिंह महाराष्ट्रात; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले - सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले

गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी (Gujarat Lions in Mumbai) आज मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना पुन्हा सिंह सफारीचा आनंद घेता येणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 6, 2022, 9:14 PM IST

Updated : Dec 6, 2022, 10:28 PM IST

मुंबई - गुजरातमधून आणलेली सिंहांची जोडी (Gujarat Lions in Mumbai) आज मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सोडण्यात आली आहे. ही सिंहांची जोडी काही दिवसांपूर्वी गुजरातेतील सक्करबाग प्राणी संग्रहालयातून मुंबईत (Sanjay Gandhi National Park Lion) दाखल झाली होती. हे दोन्ही नर व मादी सिंह प्रत्येकी दोन ते अडीच वर्षे वयाचे आहेत.

सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले

मुंबईतील वातावरणाशी परिचित होण्यासाठी काही काळ जाऊ देण्यात आला होता. आता त्यांना मुंबईतील वातावरणाची पुरेशी सवय झाल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात त्यांना आज सोडण्यात आले आहे. हे सिंह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल झाल्याने येथील बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरू होणार आहे.

गुजरातबरोबर अदलाबदली - ही सिंहांची जोडी अवघ्या दोन ते अडीच वर्षांची असल्याने पुढील अनेक वर्षे सिंह सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल. तसेच या सिंहांच्या पुढच्या पिढ्याही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निर्माण होतील असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ३ वर्ष वयांची वाघांची नर व मादी जोडी गुजरातला देण्यात येणार आहे. त्या बदल्यात ही सिंहांची जोडी आणण्यात आली आहे.

सिंह सफारी पुन्हा सुरू होणार - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे १२ हेक्टर कुंपण क्षेत्रामध्ये १९७५-७६ मध्ये सिंह सफारी सुरू करण्यात आली होती. सिंह सफारीमुळे उद्यानाच्या महसुलात मोठी वाढ झाली होती. परंतु केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने सिंहाचे प्रजनन करण्यास मनाई केल्याने येथील सिंहाची संख्या कमी झाली. गेल्या महिन्यात १७ वर्षे वयाच्या सिंहाचा मृत्यू झाल्याने उद्यानात एकही सिंह शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे आता दोन सिंह आल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची शान आणखी वाढणार आहे.

Last Updated : Dec 6, 2022, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.