मुंबई: टाटा कन्सल्टन्सी सर्विस आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सर्विस या दोन कंपन्यांच्या मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे काही प्रमाणात स्वागत करीत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने शासनाला प्रश्न देखील केलेला आहे.आता भरती परिक्षासाठी उमेदवारांना सराव करता यावा म्हणून लिंक उपलब्ध केली गेली आहे. (Link available for MPSC candidates for practice, Good News For MPSC Candidates)
विद्यार्थ्यांना फायदा होईल: या बाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समिती चे राहुल गोठेकर म्हणाले, बायोमेट्रिक तसेच व्हेरिफिकेशन, शारीरिक तपासणी या संदर्भातल्या अनेक सूचना स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून शासनाला सुचविण्यात आल्या होत्या. त्याचा विचार शासनाने केला. त्याबाबत समितीने स्वागत केले. मात्र परीक्षांच्या पेपरचे सेटिंग्स त्याबाबतचे काय याचे उत्तर अद्यापही शासनाकडून मिळाले नाही. आम्ही अनेक मागण्या केल्या आहे. आता सरावासाठी लिंक उपलब्ध केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होईल. https://mpsc.gov.in संकेतस्थळावर ONLINE FACILITY मेन्यू मध्ये जाऊन computer based examination/mocktest येथे क्लिक करून हा सराव उमेदवारांना करता येणार आहे. अशी माहिती सह सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांनी पत्राद्वारे दिली आहे.