मुंबई Life Imprisonment For Murder: 10 फेब्रुवारी 2017 रोजी आरोपी हा सायंकाळी पत्नीच्या माहेरी म्हणजे त्याच्या सासरी बायकोला भेटण्यासाठी गेला. त्यांच्यात आधी आपसात भांडणं व्हायची. त्या दिवशी देखील भांडण झालं आणि रागाच्या भरात त्यानं तिचा खून केला. त्यानंतर तिला दवाखान्यात दाखल केलं असता तिथे तिचे प्राण गेले; अशा प्रकारचा आरोप नवऱ्यावर बायकोच्या नातेवाईकांनी केला होता. त्याबाबत मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) आरोपी सूरज पुजारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नवऱ्याचा बायकोच्या चारित्र्यावर संशय: 2015 पासून आरोपी सुरज पुजारी आणि त्याची बायको यांच्यामध्ये सातत्यानं भांडणं व्हायची. त्याला तिच्या चारित्र्यावर संशय होता. सततच्या भांडणामुळं अनेकदा त्यांच्यामध्ये मारामारी देखील व्हायची. त्यामुळे नेहमीची कटकट दूर व्हावी म्हणून तिनं नवऱ्याच्या घरी राहणं काही काळ सोडलं आणि थोड्या दिवसांसाठी ती तिच्या आईकडे माहेरी वर्सोवा येथे राहायला आली.
संशयी नवऱ्यामुळे बायको गेली माहेरी: नवऱ्याच्या अशा वागण्यामुळं बायको कंटाळली होती आणि त्याच्याशी वाद नको, कटकट नको म्हणून ती बाळ जन्माच्या काही दिवस आधीच माहेरी आईकडे राहायला आली होती. बायको माहेरी गेल्यानंतर देखील त्याने बायकोवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मनात बायको बद्दलचा प्रचंड राग आणि क्रूर भावना ठासून भरलेली होती.
आरोपीचा दावा फेटाळला: मुंबई सत्र न्यायालयामध्ये या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी आणि तक्रारदार दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, आरोपीच्या मनात आधीपासूनच मत्सर आणि द्वेष होता. त्यामुळेच तो क्रूरपणे बायकोशी वागला आणि चूक झाली. याचं कारण नवऱ्यानं दिलं आहे की, तो बारा वर्षांचा असताना त्याला एका मोठ्या माणसाने थप्पड मारली. त्यामुळे त्याच्या मनात बालपणीच्या घटनेचा राग साचून होता, असा आरोपीचा दावा आहे. पण अशा कारणामुळे कोणी आत्मसमर्पण करत नाही. तेव्हा आरोपीच्या पूर्व आयुष्यातील घटनेचा आणि त्याने केलेल्या अपराधाचा काही एक संबंध नाही. त्यामुळे सत्र न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हेही वाचा: