ETV Bharat / state

महिला काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागावे - सुश्मिता देव

विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी खासदार सुश्मिता देव यांनी केले.

author img

By

Published : Jun 29, 2019, 8:14 PM IST

महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी खासदार सुश्मिता देव यांनी आज मुंबईतील टिळक भवनात केले.

टिळक भवन येथे प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेऊन यापुढेही अध्यक्ष म्हणून कायम रहावे, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. तो लवकरच केंद्रीय कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे.

या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या अॅड. चारुलता टोकस, प्रवक्ते सचिन सावंत, ममता भूपेश यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महिलांच्या हक्कासाठी सातत्याने लढत असून, महिला काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु सध्याच्या काळात केवळ उमेदवारी किंवा पदाच्या मागे न जाता काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून महिलांनी काम केले पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस सक्षमपणे काम करीत असून, महिलांचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे चारुलता टोकस यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले.

या बैठकीला महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी तसेच राजस्थानच्या महिला व बाल कल्याण मंत्री ममता भूपेश, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जेनेट डिसुझा, राष्ट्रीय सचिव नुरी खान, आकांक्षा ओला, संध्या सव्वालाखे, आमदार हुस्नबानो खलिफे आदी उपस्थित होते.

Intro:

महिला काँग्रेसने राज्यात निवडणुकीच्या कामाला लागावे- सुश्मिता देव
मुंबई, ता. २९ :

राज्यात येत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महिला काँग्रेसने सज्ज व्हावे आणि राज्यात पुन्हा एकदा महिलांना न्याय देणारे काँग्रेसचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व माजी खासदार सुश्मिता देव यांनी आज मुंबईतील टिळक भवन केले.
टिळक भवन येथे प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीच्या सुरूवातीला राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा आपला निर्णय मागे घेऊन यापुढेही अध्यक्ष म्हणून कायम रहावे, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. तो लवकरच केंद्रीय कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे.
या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या अॅड. चारुलता टोकस, प्रवक्ते सचिन सावंत, ममता भूपेश यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महिलांच्या हक्कासाठी सातत्याने लढत असून, महिला काँग्रेस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे सांगितले. जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत परंतु सध्याच्या काळात केवळ उमेदवारी किंवा पदाच्या मागे न जाता काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून महिलांनी काम केले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तर महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस सक्षमपणे काम करीत असून, महिलांचे संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे चारुलता टोकस यांनी सांगितले. निवडणुकीला सामोरे जात असताना महिलांनी सशक्त उमेदवार म्हणून स्वतःला सिद्ध केले पाहिजे, असे सचिन सावंत म्हणाले.
या बैठकीला महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी तसेच राजस्थानच्या महिला व बाल कल्याण मंत्री ममता भूपेश, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जेनेट डिसुझा,राष्ट्रीय सचिव नुरी खान, आकांक्षा ओला, संध्या सव्वालाखे, आमदार हुस्नबानो खलिफे आदी उपस्थित होते.Body:महिला काँग्रेसने राज्यात निवडणुकीच्या कामाला लागावे- सुश्मिता देवConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.