ETV Bharat / state

Leopard Entered In Film City : मालिकेचे शूटिंग सुरू असताना सेटवर शिरला बिबट्या; गोरेगाव फिल्मसिटीतील घटना - बिबट्या शिरल्याने खळबळ

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीमध्ये आज (सोमवारी) सकाळी बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. बिबट्याने फिल्मसिटीमध्ये प्रवेश केला, त्यावेळी एका टीव्ही मालिकेच्या सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते.

Leopard Entered In Film City
बिबट्याचा संचार
author img

By

Published : Jul 17, 2023, 11:04 PM IST

मालिकेच्या सेटवर बिबट्याचा मुक्त संचार

मुंबई : मालिकेच्या सेटवर गोंधळ आणि दहशतीच्या वातावरणात बिबट्याने एका कुत्र्याला आपली शिकार बनवले. चित्रपटाच्या सेटवर बिबट्या घुसल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिरियलच्या सेटवर बिबट्या कसा बेधडकपणे फिरत आहे, हे पाहायला मिळत आहे. सेटवर त्याने एका कुत्र्यावर कसा हल्ला केला आणि त्याला ठार मारले हे पाहण्यात आले आहे. बिबट्या घुसल्याने सेटवर घबराटीचे वातावरण पसरले. येथे अंजू मालिकेचे शूटिंग सुरू होते. लोकांनी सांगितले की, ते दृश्य खूप भीतीदायक होते.

शूटिंग सुरू असताना घुसला बिबट्या : व्हिडिओमध्ये बिबट्या टीव्ही सीरियलच्या सेटवर फिरताना दिसत आहे. वृत्तानुसार, एका मराठी मालिकेच्या सेटवर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शूटिंग सुरू होते. तेवढ्यात सेटवर एक बिबट्या आला. तेव्हा जवळपास 200 लोक तिथे काम करत होते. सेटवर उपस्थित असलेल्या एका कुत्र्याचीही बिबट्याने शिकार केली.

याआधीही दिसला बिबट्या: या घटनेमुळे मालिकेचे शूटिंगही काही काळ थांबवावे लागले. सध्या वनविभाग आणि पोलिसांचे पथक बिबट्याच्या शोधात आहे. यापूर्वीही येथे बिबट्या दिसला होता. त्यानंतर त्याची सुटका करून पुन्हा जंगलात पाठवण्यात आले.

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पण...: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते गावातील शेतकरी छत्रीमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट 50 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती पसरतात नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. याबाबतची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. त्या अगोदर स्थानिक नागरिक सुनील आव्हाड, संजय आव्हाड, शरद आव्हाड या शेतकऱ्याने दोरखंडाला खाट बांधत विहिरीत सोडली. स्वतःचा बचाव करण्यासाठी बिबट्या या खाटेवर स्वार झाला आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिरीत पिंजरा सोडत बिबट्याला बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महोदरी येथील वनोउद्यानात आणून पोटाला जखम झालेल्या बिबट्यावर उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित बोडके, वनरक्षक गोविंद पंढरे, संजय गीते यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

हेही वाचा:

  1. Leopard Attack On Farmer: छत्रीमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले शेतकऱ्याचे प्राण; बिबट्या थेट पडला विहिरीत
  2. Leopard Movement In Gaulane : शिकारीच्या शोधत गौळाणे परिसरात बिबट्याचा संचार
  3. leopard Hunted The Dog: बिबट्याने तरुणाच्या उशाशी झोपलेल्या कुत्र्याची केली शिकार; पहा सीसीटिव्ही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.