मुंबई : राजनैतिक किंवा इतर कारणाने विभक्त झालेल्या मूळ शिवसेनेचे अनेक नेते (Leaders of Thackeray group Shinde group and MNS appeared together) आज मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) एकत्र आले होते. मात्र वर्ष 2005 मध्ये दादर पोलीस ठाण्यात दाखल एक गुन्हा (criminal case at same time) हे एकत्र येण्याचे निनित्त होते. आणि मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणातल्या आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
न्यायालयात सुनावणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्यमंत्री शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना ह्या तिन्ही पक्षात मूळ शिवसेनेचे नेते गेले आहेत. मात्र त्यावेळी शिवसेनेत एकत्र असताना ह्या नेत्यांवर हा गुन्हा दादर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. वर्ष 2005 मध्ये दादर पोलीस ठाण्यात निदर्शने आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होती.
काय म्हणाले परब ? : न्यायालयात शिवसेनेचे जुने नेते आज कोर्टात एकत्र आले. याबाबत जेव्हा उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना विचारला तर ते म्हणाले की, वर्ष 2005 मध्ये सामना कार्यालयावर काही लोक हल्ला करणार, असल्याची माहिती आम्हाला मिळली होती. सामनाचा रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे, म्हणून त्यावेळी आम्ही संरक्षणासाठी सामना कार्यालय समोर उपस्थित उपस्थित होतो. त्या प्रकरणात आमच्यावर दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाला तो एकच प्रकरणात, म्हणून आज सर्वजण कोर्टात आरोपी म्हणून एकत्र हजर होतो, त्यात नवीन काही नाही.
काय आहे प्रकरण ? : सामना कार्यालय जवळ शिवसेना सोडून बाहेर निघालेले नारायण राणे यांची सभा शुरू असताना, शिवसेने तर्फे निदर्शन करण्यात आले होते. कारण सामना कार्यालयावर तेव्हा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मात्र त्यावेळी नारायण राणे यांच्या कार्यकर्ते आणि उपस्थित शिवसैनिक, शिवसेना नेते यांच्यात संघर्ष झाल्याने या प्रकरणात 24 जुलै 2005 मध्ये तेव्हा मूळ शिवसेनेत असताना एकूण 48 नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता .
नेते कोर्ट रूम सगळेच एकत्रित : त्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पेडणेकर, जितेंद्र जानवले तर मनसेचे वरिष्ठ नेते, प्रवक्ते बाळा नांदगावकर आणि इतर अनेक नेत्यांनी आज कोर्टात येऊन हजेरी लावली. थोड्या वेळातच का होईना एकेकाळी मूळ शिवसेनेत काम करणारे हे नेते कोर्ट रूम मध्ये एकत्रित झाले होते.
सुनावणी 16 डिसेंबर नंतर : मात्र या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर जे या प्रकरणात आरोपी नंबर एक आहे आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या बाळा साहेबांची शिवसेनेत असलेले दादरचे आमदार सदा सरवणकर हे आज काही कारणास्तव हजर झाले नव्हते. त्यांना धरून एकूण 17 आरोपी या प्रकरणात आज अनुपस्थित होते. त्याच बरोबर कोर्टात आज अशी माहिती देण्यात आली की, या प्रकरणात 48 आरोपी पैकी 10 आरोपींचा निधन झालं आहे. राहिलेले 38 आरोपी पैकी फक्त 21 आरोपीच उपस्थित होते, तर 17 आरोपी आज हजर नव्हते. म्हणून या प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पुढच्या सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील सर्व आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .