ETV Bharat / state

नवी मुंबई; वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त न्यायव्यवस्था सहभागी

कोणती घटना घडून गेल्यावर प्रकरण न्यायालयात जाते तेव्हा सगळं काही संपलेलं असतं. कोणाच्या तरी घरातील बळी गेलेला असतो. त्यामुळे आपण काही करू शकत नाही हे दुःख नेहमीच आमच्या मनात सलत होत. त्यामुळे आम्ही या अभियानात सहभागी होऊन जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरलो असे न्यायाधीश तृप्ती देसाई नाईक म्हणाल्या.

author img

By

Published : Jan 30, 2021, 9:59 AM IST

Updated : Jan 30, 2021, 10:56 AM IST

वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त वकिलांचा सहभाग

नवी मुंबई- वाहतूक शाखेकडून ३२वे रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे 'वन डे विथ पोलीस' उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानात वकिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी नियम पाळणाऱ्या चालकांना वकिलांनी धन्यवाद कार्ड दिले तर नियम न पाळणार्‍या वाहनचालकांवर ई चलनाद्वारे कारवाई करत इशारा कार्ड दिले.

वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त न्यायव्यवस्था सहभागी
वन-डे विथ पोलीस संकल्पनानवी मुंबई पोलिसांच्या व वाहतूक शाखेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक दिवस पोलिसांसोबत ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अनेक स्तरातील मान्यवर व्यक्ती या अभियानात सहभागी होत आहेत. या अभियानात सहभाग घेत न्यायव्यवस्था चक्क रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली आहे.

वकिलांनी बजावली पोलिसांची भूमिकारस्ते अपघातात कित्येक नागरिकांचा बळी गेला आहे, यामुळे पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस आपल्या परीने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमात वकिलांनी सक्रिय सहभाग म्हणून चक्क एका दिवसासाठी ते वाहतूक पोलीस बनले व रस्त्यावर उतरून वाहतूकीचे नियम, रस्ते सुरक्षा, वाहतूकीची दिशा याबद्दल जनजागृती देखील केली. यावेळी वकिलांनी वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या दंड देखील आकारला.

Last Updated : Jan 30, 2021, 10:56 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

......
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.