ETV Bharat / state

Lata Mangeshkar Acting skills : लता मंगेशकर यांनी अभिनयातही दाखवली होती चुणूक - Hindi film by Lata Mangeshkar

लता मंगेशकर यांनी गायनाच्या कलेबरोबर आपली चुणूक अभिनयातही (Lata Mangeshkar Besides singer also actor) दाखवली होती

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
author img

By

Published : Feb 6, 2022, 11:03 AM IST

मुंबई- 1929 मध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) या मराठी संगीतकार पंडित दीनानाथ मंगेशकर आणि त्यांची गुजराती पत्नी शेवंती यांची थोरली मुलगी होत्या. भारताच्या नाइटिंगेलने तिच्या मंत्रमुग्ध आवाजाने हजारो बॉलीवूड आणि प्रादेशिक गाणी सुशोभित केली आहेत. परंतु बहुसंख्य लोकांना हे माहित नाही की त्यांनी 1942 ते 1948 या कालावधीत आठ चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला होता. एक अभिनेत्री म्हणून त्यांच्या योगदानाची एक झलक पाहूया.

मास्टर विनायकच्या 1942 मध्ये आलेल्या पहिली मंगला-गौर या मराठी चित्रपटात लता मंगेशकर यांनी अभिनयाची सुरुवात (Lata Mangeshkar's debut in Marathi film) केली होती. यात त्यांनी एक छोटीशी भूमिका केली होती. याशिवाय लता दिदींनी मास्टर विनायक यांच्या पहिल्या हिंदी (Hindi film by Lata Mangeshkar) चित्रपट बडी मां (1945) मध्ये (Lata Mangeshkar's Hindi film Buddy Maa) त्यांची धाकटी बहीण आशा भोसले यांच्यासोबत एक छोटी भूमिकाही केली होती. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील सर्वात मोठी असल्याने लतादीदींनी सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या. त्यामुळे त्यांनी गायनासोबतच वयाच्या १३व्या वर्षापासून चित्रपटांमध्येही अभिनय करण्यास सुरुवात केली. मात्र लवकरच त्यांनी अभिनय सोडून दिला.

लताजींनी त्यांच्या एका मुलाखतीत नमूद केले होते की, जेव्हा त्या मेकअप करून सेटवर गेल्या तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन मिळत असत. त्यांना हा प्रांत आपला आहे असे वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी संगीत करिअरवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची भूमिका असलेल्या पुकार चित्रपटामधील एक गाणे गाताना त्यांनी एक विशेष भूमिका देखील केली. एका गाण्यात त्या काही मुलांसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसल्या होत्या.

लता मंगेशकर यांनी 3 हिंदी आणि 1 मराठीसह 4 चित्रपटांची निर्मिती केली आहे. पण निर्माता म्हणून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्या या प्रवासात पुढे गेल्या नाहीत.

हेही वाचा : Lata Mangeshkar Passed Away : लतादिदींच्या काही खास गाण्यांचे खास किस्से

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.