मुबंई- मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले आहे. शनिवार पासून मुसळधार पाऊस मुंबई आणि परिसरात पडत आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेला पाऊस २४ तास उलटले तरी पडतच आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 146 मिमी, पूर्व उनगरात 195 मिमी, पश्चिम उनगरात 195 मिमी पावसाची नोंद झाली आहे.आज सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मुंबईत सलग दिवस पडलेल्या पावसाने रेल्वेसेवा, रस्ते बंद आहे. सलगच्या पावसाने जनजिवन विस्कळीत झाले आहे. सकाळी 9 वाजता पावसाचा जोर कमी झाला आहे. सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. याच बरोबर मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक १५ मिनीटे उशिराने सुरू आहे. सखल भागातील पाण्याच्या निचरा अजून झालेला नाही. संध्याकाळपर्यत पावसाचा जोर कायम राहील असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.