ETV Bharat / state

Threatening Mail : माऊंट मेरी चर्चवर लष्कर-ए-तोयबाकडून हल्ल्याचा ई-मेल, वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा - वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा

माऊंट मेरी चर्चवर हल्ल्याची धमकी प्राप्त झाली ( Attack threat on Mount Mary Church ) आहे. वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लष्कर ए तैय्यबाकडून धमकीचा ई मेल प्राप्त झाला ( Lashkar e Taiba Threatening Mail ) आहे. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Mount Merry church
माऊंट मेरी चर्च
author img

By

Published : Dec 30, 2022, 5:06 PM IST

मुंबई : ऐन थर्टी फर्स्टच्या आदल्या दिवशी वांद्रे येथील प्रसिद्ध माऊंट मेरी चर्चवर लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला ( Attack threat on Mount Mary Church ) होणार असल्याचा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेसेज पाठवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला ( Lashkar e Taiba Threatening Mail ) आहे. याबाबतची माहिती वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोणतेही तथ्य नसल्याचा मेसेज : पोलिसांच्या तपासणीत त्या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे आढळले. तरीदेखील याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. माऊंट मेरी चर्चचे अधिकृत छायाचित्रकार पीटर डॉमनिक डिसोझा (५८) यांच्या ई-मेल चर्चच्या अधिकृत संकेतस्थळाशी जोडण्यात आला आहे. माऊंट मेरी चर्चच्या अधिकृत संकेतस्थळावर येणारे सर्व ई-मेल त्यांच्या मोबाइलवर येतात.

लष्कर-ए-तोयबाकडून ई-मेल प्राप्त : बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ‘टेररिस्ट’ या युजर आयडीवरून लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून हल्ला होणार असल्याचा ई-मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर आणखी एक ई-मेल आला असून त्यात माझ्या मुलाची मानसिक स्थिती ठीक नसून त्याला क्षमा करावी आणि त्याचप्रमाणे त्याने केलेला दावा खोटा असल्याचे देखील दुसऱ्या मेलमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र, डिसोझा यांनी आलेल्या ईमेलबाबत खबरदारी म्हणून याबाबत चर्च प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ५०५ (३) अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपासणीत वेबसाईटच्या क्लासिफाईडमध्ये मेसेज पाठवण्यात आला आहे. डिसोझा यांचा ई-मेल वेबसाईटशी जोडल्यामुळे त्यांना संबंधित मेल त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला. याप्रकरणी पोलीस तपासणीत कोणतेही तथ्य नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने ( Case Field Bandar Police Station ) सांगितले.

वाहतूक नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ल्याची धमकी : याआधी देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश आले आहेत. त्याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून मेसेज प्राप्त झाला आहे. सोमालियातील मोबाइल क्रमांकावरून हा मेसेज पाठवण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.