मुंबई - मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने रात्री चांदीवली संघर्ष नगर येथील जमीन खचली आहे. जवळच्या ३ इमारती खाली करण्यात येत आहेत. या ठिकाणी इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने येथील रहिवाशी भयभीत झाले आहेत.
मुंबईत आज पावसाचा ५ वा दिवस आहे. सलग चार दिवसांपासून मुसळधार पावसाने सखल भागात मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. या पावसामुळे लोकलसेवादेखील ठप्प झाल्या आहेत. तसेच वाहतुकही खोळंबली आहे.
मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच खाजगी आणि सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आलेले आहे.