ETV Bharat / state

lampi virus: राज्यात लंपी रोगामुळे दगावलेल्या जनावरांचा आकडा वाढला

author img

By

Published : Sep 29, 2022, 7:29 PM IST

राज्यात सध्या लंपी रोगाचा (lampi virus) प्रसार जलद गतीने सुरू असून राज्यातील गोवंशामध्ये हा आजार बळावत आहे. राज्यात आत्तापर्यंत 33 हजार 310 जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याचे दिसून आले असून या रोगामुळे दगावलेल्या जनावरांचा आकडा 1114 वर पोहोचला आहे (lampi virus in maharashtra)

Lampi
Lampi

मुंबई: राज्यात सध्या लंपी रोगाचा (lampi virus) प्रसार जलद गतीने सुरू आहे. राज्यातील गोवंशामध्ये हा आजार बळावत असून आत्तापर्यंत 33 हजार 310 जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. या रोगामुळे राज्यात दगावलेल्या जनावरांचा आकडा 1114 वर पोहोचला आहे. राज्यात लसीकरणाला वेग आला असून लंपी रोगाच्या एक कोटींहून अधिक लसमात्रा उपलब्ध आहेत (lampi vaccination in maharashtra). मात्र दुसरीकडे कोरोना बूस्टर डोसच्या लसीकरणाचा वेग मात्र काहीसा मंदावला आहे (booster dose rate fall in maharashtra).

किती जिल्ह्यात पशुधन बाधित? : राज्यातील 31 जिल्ह्यांमधील एकूण 1976 गावांमध्ये 3306 जनावरे बाधित आहेत, त्यापैकी 13859 जनावरे उपचाराने बरी झालेली आहेत तर उर्वरित बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील अकोला जिल्ह्यात 178, जळगाव जिल्ह्यात 165, अहमदनगर जिल्ह्यात 107, बुलढाणा जिल्ह्यात 123 तर अमरावती जिल्ह्यात 144 जनावरे दगावली आहेत.

लसीकरणाला वेग: पशुधनाला जास्तीत जास्त प्रमाणात लस देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले असून 4850 पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एक कोटी सहा लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत (lampi virus vaccination). आतापर्यंत राज्यातील 1976 गावातील 81 लाखांहून अधिक पशुधनाला लस देण्यात आली आहे. राज्यातील सर्व जनावरांना लस देण्यात येणार असून ही लस मोफत देण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

अन्य प्राण्यांमध्ये लागण नाही: राजस्थानात काही हरणांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे समोर आले आहे. मात्र राज्यात अद्याप गोवंश वगळता अन्य कोणत्याही प्राण्यांमध्ये लंपी रोगाची लागण झाल्याचे दिसून आलेले नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे काहीही कारण नाही असेही पशुसंवर्धन आयुक्तांनी म्हटले आहे. लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी माश्या, डासं, गोचीडं या कीटकांचा फवारणी करून नायनाट करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना बूस्टर डोसचा वेग मंदावला: राज्यातील नागरिकांना कोरोना लसीकरणाचे दोन डोस दिल्यानंतर बूस्टर डोस देण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत राज्यात बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मे महिन्यापासून राज्यात 25 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 46 लाख 66 हजार 896 नागरिकांनी हा डोस घेतला आहे. राज्यात दररोज केवळ साडेतीन हजार नागरिकच बूस्टर डोसचा लाभ घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आत्तापर्यंत साठ वर्षांवरील 30 लाख 16 हजार 559 नागरिकांनी बूस्टर डोसचा लाभ घेतला आहे.

लसीकरणाचे प्रमाण: राज्यात आतापर्यंत 9 कोटी 15 लाख 75 हजार 601 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 7 कोटी 63 लाख 69 हजार 911 नागरिकांनी कोविड लसीचा दुसरा डोस घेतला आहे (covid vaccination in maharashtra). यानंतर सरकारने नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले होते मात्र आतापर्यंत केवळ 90 लाख 28 हजार 976 लाभार्थ्यांनी हा डोस घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.