ETV Bharat / state

अरे बापरे.. देवेंद्र फडणवीस ‘लेडीज बार' तर  महापालिका आयुक्तांच्या नावे ‘हुक्का पार्लर’

पडताळणीविना ऑनलाइन प्रमाणपत्रे दिली गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ‘लेडीज बार अँड रेस्टॉरंट’ आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे ‘हुक्का पार्लर’चे नोंदणी प्रमाणपत्र पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने जारी केले आहे.

author img

By

Published : Mar 27, 2019, 11:53 AM IST

Updated : Mar 27, 2019, 1:21 PM IST

महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत पालिकेने सुरू केलेल्या ऑनलाइन प्रमाणपत्र प्रक्रियेतील सावळागोंधळ उघड झाला आहे. पडताळणीविना ऑनलाइन प्रमाणपत्रे दिली गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ‘लेडीज बार अँड रेस्टॉरंट’ आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे ‘हुक्का पार्लर’चे नोंदणी प्रमाणपत्र पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने जारी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘लेडीज बार अॅण्डरेस्टॉरंट’साठी '०२, ०२, वर्षा, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, मुंबई- ४०००२६,'तर आयुक्तांच्या ‘हुक्का पार्लर’साठी 'पालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, मुंबई ४००००१' या पत्त्याची नोंद प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे. तर दोघांच्या नोंदणी प्रमाणपत्रावर अनुक्रमे १० व १५ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. दोघांनाही २४ ऑगस्ट २०१८ ते २३ ऑगस्ट २०१९ या कालावधीसाठी ही नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. ही प्रमाणपत्रे पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयातून देण्यात आली आहेत.

Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ‘लेडीज बार अँड रेस्टॉरंट’चे प्रमाणपत्र

बांधकाम परवानगीपासून आस्थापनांच्या नोंदणीपर्यंत विविध सुविधा पालिकेने ऑनलाइन सुरू केल्या आहेत. यात आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र अर्थात गुमास्ता परवान्यांचाही समावेश आहे. मात्र, परवाने देण्याची प्रक्रिया सदोष असल्याचे आता दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजोय मेहता यांच्या नावे मिळवण्यात आलेल्या परवान्यांमुळे परवाना देण्यापूर्वी अर्जाची पडताळणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही प्रमाणपत्रे महापालिकेकडून वितरीत झाली असल्याच्या वृत्ताला महापालिका अधिकारी, डी विभाग यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Ajoy Mehta
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे दिलेले ‘हुक्का पार्लर’चे नोंदणी प्रमाणपत्र

Intro:Body:

पडताळणीविना ऑनलाईन प्रमाणपत्र देतांना मुंबई महापालिकेचा सावळागोंधळ...

चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावे ‘लेडीज बार' तर  महापालिका आयुक्तांच्या नावे ‘हुक्का पार्लर’

 ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत पालिकेने सुरू केलेल्या ऑनलाइन प्रमाणपत्र प्रक्रियेतील सावळागोंधळ  

पडताळणीविना ऑनलाइन प्रमाणपत्रे दिली गेल्यानं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ‘लेडीज बार अँड रेस्टॉरंट’ आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे ‘हुक्का पार्लर’चे नोंदणी प्रमाणपत्र पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने जारी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘लेडीज बार अॅ्ण्ड रेस्टॉरंट’साठी ०२, ०२, वर्षां, नेपीअन्सी रोड, मलबार हिल, मुंबई- ४०००२६,

तर आयुक्तांच्या ‘हुक्का पार्लर’साठी ‘हुक्का पार्लर’करिता पालिका मुख्यालयातील कार्यालय, दुसरा मजला, महापालिका मार्ग, मुंबई ४००००१ या पत्त्याची नोंद या प्रमाणपत्रावर करण्यात आली आहे.

 तर उभयतांच्या नोंदणी प्रमाणपत्रावर अनुक्रमे १० व १५ कामगारांची नोंद करण्यात आली आहे.

 दोघांनाही २४ ऑगस्ट २०१८ ते २३ ऑगस्ट २०१९ या कालावधीसाठी ही नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.

ही प्रमाणपत्रे पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयातून देण्यात आली आहेत.

बांधकाम परवानगीपासून आस्थापनांच्या नोंदणीपर्यंत विविध सुविधा पालिकेने ऑनलाइन सुरू केल्या आहेत.

 यात आस्थापना नोंदणी प्रमाणपत्र अर्थात गुमास्ता परवान्याचाही समावेश आहे.

 मात्र, परवाने देण्याची प्रक्रिया सदोष असल्याचे आता दिसून येत आहे

 देवेंद्र फडणवीस आणि अजोय मेहता यांच्या नावे मिळवण्यात आलेल्या परवान्यांमुळे परवाना देण्यापूर्वी अर्जाची पडताळणीच होत नसल्याचे दिसून येत आहे.

*मात्र, सदर सदर प्रमाणपत्रे महापालिकेकडून वितरीत झाली असल्याला महापालिका अधिकारी, डि विभाग यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही*

Conclusion:
Last Updated : Mar 27, 2019, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.