मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या भिंतीची दुरुस्ती करताना काही दिवसांपूर्वी एका कामगाराचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी कामगार कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीसांच्या अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.
कामगाराचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू : बुधवारी शिवराम वर्मा (32) हे 10 - 12 फूट उंच भिंतीला टेकलेल्या शिडी वर असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडला. त्यानंतर त्यांना जवळच्या गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे खेरवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. वर्मा यांचा शुक्रवारी रुग्णालयात मृत्यू झाला. परिणामी कामगार कंत्राटदार दत्ता पिसाळ (30) यांच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम 304 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची पुढील चौकशी सुरु : या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. वर्मा यांना काही बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामासाठी रोजंदारीवर कामावर ठेवण्यात आले होते. त्यांच्या सह मजुरांचे जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
- Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मुंबई विमानतळ कस्टम्सने केली भारतीय नागरिकाला अटक; २.२८ कोटी रुपयांचे केले सोने जप्त
- Reel Shooting On Bike: धावत्या दुचाकीवर आंघोळीचा 'रील' शूट करणे तरुण-तरुणीच्या अंगलट; जाणून घ्या रिलस्टारचा काय आहे प्रकरण
- Buldhana Crime News: लग्न वरातीत वाजलेले गाणे पडले महागात; दोन गटात झालेल्या वादात पोलिसांचा लाठीचार्ज, अनेकजण जखमी तर दंगलीचा गुन्हा दाखल