ETV Bharat / state

क्षितीज प्रसाद अन् गॅब्रियल यांना एनसीबीकडून अटक; तर करिष्मा प्रकाशची पुन्हा चौकशी - करिश्मा प्रकाशची चौकशी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीकडून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात क्षितिज प्रसाद व गॅब्रियल डिमेट्रिडेज यांना अटक केली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या करिश्मा प्रकाशची पुन्हा चौकशी करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ प्रकरण
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ प्रकरण
author img

By

Published : Nov 5, 2020, 2:45 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या संदर्भात कारवाई करण्यात आली. यात पकडण्यात आलेल्या नायजेरियन अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींकडून क्षितिज प्रसाद व गॅब्रियल डिमेट्रिडेज या दोघांची नावं समोर आली. त्यावर आता पुन्हा एकदा त्यांना एका नवीन प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी अटक करण्यात आलेल्या नायजेरियन आरोपींच्या सतत संपर्कात असल्याचेही एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.

क्षितीज प्रसाद अन् गॅब्रियल यांना एनसीबीकडून अटक; परिस्थितीचा आढावा घेताना प्रतिनिधी

चित्रपट व मालिका कलाकारांना देत होते अमली पदार्थ -

एनसीबीकडून अटक करण्यात आलेले ड्रग्स पेडलर हे चित्रपट व मालिकांमधील अनेक कलाकारांना अमली पदार्थांचा पुरवठा करत होते. बुधवारी रात्री उशिरा अंधेरी परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान एनसीबीकडून एका अमली पदार्थ तस्कराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन, चरस व 2 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

करिश्मा प्रकाश हिची पुन्हा चौकशी -

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या करिश्मा प्रकाश हिला बुधवारी एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. दुपारी 12 वाजता ती एनसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झाली होती. बुधवारी तब्बल साडेसहा तास तिची चौकशी केल्यानंतर, गुरुवारी तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, करिष्मा प्रकाशने न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने करिश्मा प्रकाश हिला 7 नोव्हेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.